एक्स्प्लोर

शिवसेनेकडून राजकारणाची सुरुवात, राष्ट्रवादीकडून खासदारकी अन् आता भाजपकडून संधी मिळण्याची शक्यता; कोण आहेत धनंजय महाडिक? 

Rajya Sabha Election : भाजपकडून राज्यसभेची तिसरी जागा लढवण्यासाठी हालचाली सुरू असून त्यासाठी कोल्हापूरच्या धनंडज महाडिकांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढण्याची शक्यता असून त्यासाठी भाजपकडून कोल्हापूरच्या धनंजय महाडिक यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. सोमवारी भाजपचे पियुष गोयल आणि अनिल बोंडे हे त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यावेळी भाजपकडून धनंजय महाडिक यांचाही अर्ज भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं जर झालं तर पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप आमने-सामने येण्याची शक्यता आहे. 

कोण आहेत धनंजय महाडिक?
धनंजय महाडिक हे एकेकाळचे काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे पुतणे आहेत. महादेवराव महाडिक यांचा त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व होतं. त्याचा फायदा धनंजय महाडिकांना झाला आणि महाविद्यालयीन वयापासूनच ते सामाजिक कार्यात सक्रिय राहिले. 

युवा शक्तीच्या माध्यमातून तरुणांचे संघटन
धनंजय महाडिक यांनी युवा शक्तीच्या माध्यमातून तरुणांचे संघटन केलं. त्या माध्यमातून जिल्हाभर त्यांनी युवकांचे जाळे उभारले. 2004 साली धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून लोकसभा लढले होते. पण त्यावेळी राष्ट्रवादीच्या सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून त्यांना केवळ 12 हजारांनी पराभर पत्करावा लागला. त्यानंतर धनंजय महाडिक यांनी आपले सामाजिक आणि राजकीय कार्य सुरूच ठेवलं. 

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2014 साली देशभरात मोदी लाट असताना देखील धनंजय महाडिक खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले. पण खासदार झाल्यानंतर त्यांचे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांशी काही पटलं नाही. दरम्यानच्या काळात ते मुंबई-दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत राहणारे धनंजय महाडिक हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्यासोबत जुळवून घ्यायचे. याचाच फटका त्यांना 2019 सालच्या निवडणुकीत बसला आणि त्यांचा शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्याकडून पराभव झाला. 

भाजपमध्ये प्रवेश
2019 सालच्या निवडणुकीआधीच धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी चंद्रकात पाटील यांनी प्रयत्न केला होता. अखेर तो योग निवडणुकीनंतर जुळून आला आणि धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपने त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. 

राज्यसभेसाठी कोल्हापूरचे दोन मल्ल झुंजणार? 
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप आमने-सामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. भाजपने जर धनंजय महाडिक यांच्या नावाची घोषणा केली तर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. शिवसेनेने या आधीच कोल्हापूरच्या संजय पवारांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन मल्ल झुंजण्याची शक्यता आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
Embed widget