एक्स्प्लोर

नोकरी-घराचं आश्वासन हवेत, भाजपची 'पोस्टर गर्ल' मोनिका मोरे मनसेच्या मंचावर

मोनिका मोरे स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अॅम्बेसेडर झाली. खु्द्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोनिकाच्या नावाचं ट्वीट करत तिचं कौतुक केलं होतं. मात्र पदवी मिळाल्यानंतर आपल्याला नोकरी-घर देण्याचं आश्वासन देऊनही सत्ताधाऱ्यांनी ते पूर्ण केला नसल्याचा दावा मोनिकाने केला आहे.

मुंबई : मुंबईतील लोकल अपघातात हात गमावल्यानंतर भाजपची 'पोस्टर गर्ल' झालेली मोनिका मोरे मनसेच्या व्यासपीठावर आली. स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अॅम्बेसेडर राहिलेल्या मोनिकाने भाजपने आपल्याला दिलेलं नोकरीचं आश्वासन हवेतच विरल्याची खंत बोलून दाखवली. 'एबीपी माझा'शी मोनिकाने एक्स्क्लुझिव्ह बातचित केली. पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकलच्या अपघातात मोनिका मोरेने दोन्ही हात गमावले होते. त्यानंतर भाजप खासदार किरीट सोमय्यांच्या पुढाकाराने  तिला कृत्रिम हात बसवण्यात आले. मोनिका मोरे स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अॅम्बेसेडर झाली. खु्द्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोनिकाच्या नावाचं ट्वीट करत तिचं कौतुक केलं होतं. मात्र पदवी मिळाल्यानंतर आपल्याला नोकरी-घर देण्याचं आश्वासन देऊनही सत्ताधाऱ्यांनी ते पूर्ण केला नसल्याचा दावा मोनिकाने केला आहे. काही महिन्यांपूर्वी मोनिकाच्या डोक्यावरील पितृछत्र हरपलं. त्यानंतर हाता-तोंडाची गाठ घालण्यात आपल्याला अडचणी येत आहेत. घराचा कारभार आपल्यालाच चालवावा लागत आहे, असं मोनिका सांगते. भाजपच्या पोस्टरवर झळकलेली मोनिका नोकरी नसल्यामुळे हतबल झाली आहे. मोनिकाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या मंचावर बोलावून तिच्या प्रश्नांना वाचा फोडली. VIDEO | मोदींच्या गावातचं पुरेशी शौचालय नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण | मुंबई  व्हिडिओ दाखवून भाजपची पोलखोल करण्याचा सपाटा राज ठाकरेंनी आजही काय ठेवला. राज ठाकरेंनी आपला मोर्चा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गावाकडेच वळवला आहे. मोदींचं मूळ गाव असलेल्या गुजरातमधल्या वडनगरमध्ये पुरेशी शौचालयं नसल्याचा दावा राज ठाकरेंनी व्हिडिओच्या माध्यमातून केला. मुंबईतल्या भांडुपमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींच्या गावातल्या महिलांच्या प्रतिक्रिया दाखवल्या. शहीद हेमंत करकरेंचा अपमान करणाऱ्या प्रज्ञा साध्वीला भाजप उमेदवारी कशी देऊ शकतं? असा सवालही यावेळी राज ठाकरेंनी उपस्थित केला. साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्याचे अमित शाह समर्थन करतात. भाजपाला सत्तेचा माज आला आहे अशा शब्दात राज ठाकरेंनी भाजपाचा समाचार घेतला. राज ठाकरे यांनी काल 'मोदी है तो मुमकीन है' या जाहिरातीची पोलखोल केली होती. त्यावेळी बोलावलेल्या चिले कुटुंबाला आज पुन्हा स्टेजवर बोलावण्यात आलं. गरीबीशी जोडण्यात आलेलं हे कुटुंब प्रत्यक्षात सधन आहे. मोदींनी जितक्या योजना सांगितल्या त्याच्या जाहिरातींवर 4500 ते 5500 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा राज ठाकरेंनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget