एक्स्प्लोर

Punjab Election Result 2022: ‘आप’चा दबदबा, मोगामधून सोनू सूदची बहीण मालविका पिछाडीवर!

Punjab Election Result 2022: चित्रपट अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद निवडणूक रिंगणात उतरली आहे. काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरलेली मालविका सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये पिछाडीवर आहे.

Punjab Election Result 2022:  बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) बहीण मालविका सूद (Malvika Sood)  मोगा मतदारसंघातून (Moga Assembly Seat) सध्या पिछाडीवर आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपर्यंत ती तिसऱ्या क्रमांकावर होती. आम आदमी पक्षाच्या उमेदवार डॉ.अमनदीप कौर पहिल्या क्रमांकावर आहेत. तर, अकाली दलाचे बरजिंदर सिंह ब्रार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मोगा ही पंजाबमधील (Punjab Election) हायप्रोफाईल जागांपैकी एक असून, चित्रपट अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद निवडणूक रिंगणात उतरली आहे. काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरलेली मालविका सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये पिछाडीवर आहे.

मालविकाची टक्कर भारतीय जनता पक्षच्या विद्यमान आमदार हरजोत कमल यांच्याशी आहे. तर, आम आदमी पक्षाच्या डॉ.अमनदीप कौर अरोरा आणि शिरोमणी अकाली दलाचे बरजिंदर सिंह ब्रार हेही आव्हान उभे करत आहेत.

मोगा विधानसभेची जागा सुरुवातीपासूनच पंजाबची महत्त्वाची जागा मानली जाते. 5 वर्षांपूर्वी 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ही जागा जिंकली होती. काँग्रेसच्या हरजोत कमल सिंग यांनी चुरशीच्या लढतीत आम आदमी पार्टीच्या रमेश ग्रोवर यांचा 1764 मतांनी पराभव केला होता. मोगा विधानसभा जागा फरीदकोट जिल्ह्यात येते. या जागेवरून काँग्रेसचे मोहम्मद सादिक खासदार आहेत. त्यांनी शिरोमणी अकाली दलाच्या गुलजार सिंह यांचा 83,356 मतांनी पराभव केला.

मालविकाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका हिने 10 जानेवारी रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या उपस्थितीत मालविकाला काँग्रेसचे सदस्यत्व मिळाले. यावर सीएम चरणजीत सिंह चन्नी म्हणाले, 'एवढ्या चांगल्या कुटुंबातील व्यक्ती आमच्या पक्षात येणे ही भाग्याची गोष्ट आहे.' तर नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले, 'सोनू सूद त्याच्या माणुसकीसाठी आणि दयाळूपणासाठी जगभरात ओळखला जातो आणि आज त्या कुटुंबातील एक सदस्य आमच्यासोबत आहे. ती एक सुशिक्षित महिला आहे.’

कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात सोनू सूद ‘मसीहा’ बनून लोकांच्या मदतीला धावून आला. अन्न धान्य असो वा वैद्यकीय मदत, राहण्याचा आसरा असो वा घरी जाण्यासाठीची मदत सोनू सूदने लोकांना शक्य ती सगळी मदत पुरवली. त्याच्या याच इमेजचा मालविका फायदा होईल असे वाटत होते.

या ठिकाणी पाहा लाईव्ह निकालाचे अपडेट्स 

https://marathi.abplive.com/live-tv 

https://twitter.com/abpmajhatv 

https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA 

महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Nashik : 'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव :19 मे 2024TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Nashik : 'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
Rohit Pawar: ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
Weather Update : सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
हवामान अपडेट: सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
Pune Khed Gas Cylinder Blast : गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
Embed widget