एक्स्प्लोर

Bhagwant Maan : आई माझी 'भगवंत'! भावूक क्षण, विजयानंतर आईला मिठी मारुन दिला 'मान'; व्हिडीओ व्हायरल 

Punjab Election Results 2022 LIVE: पंजाबमधील विजयानंतर आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Maan) यांनी सर्वात आधी त्यांनी आपल्या आईला मिठी मारली आणि त्यानंतरच भाषणाला सुरुवात केली.

Punjab Election Results 2022 LIVE:  देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. या निवडणुकीच्या निकालामध्ये पंजाबमध्ये (Punjab Election Result 2022 ) आम आदमी पार्टीने (AAP)मोठी आघाडी घेतली आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागा आहेत. यामध्ये आप तब्बल 91 जागांवर आघाडीवर आहे. या विजयानंतर आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Maan) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  भगवंत मान भाषण करण्यासाठी उभे राहिले असताना सर्वात आधी त्यांनी आपल्या आईला मिठी मारली आणि त्यानंतरच भाषणाला सुरुवात केली.

यावेळी मान म्हणाले की, तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडली आता माझी जबाबदारी आहे. मला मतदान केलं त्यांचे आभार आणि ज्यांनी नाही केलं त्यांचेही आभार. भगतसिंह आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो सरकारी कार्यालयात लावणार आहे. एकाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिली आणि दुसऱ्यांनी संविधान दिलं आहे असं ते म्हणाले.  

भगवंत मान म्हणाले की, आपल्या मुलांना शिक्षणासाठी युक्रेनमध्ये जायची  गरज का पडते? युक्रेन लाखात आरोग्य शिक्षण देऊ शकतो तर आपण का नाही. निवडणुकीच्या दरम्यान माझ्यावर वैयक्तिक आरोप करण्यात आले,  अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील खालच्या पातळीवर जाऊन आरोप-प्रत्यारोप केले.  आता आम्ही पंजाबमध्ये रोजगार वाढवण्याचा प्रयत्न करू, पंजाबमध्ये वीज पाणी रस्ते आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे, असं मान म्हणाले. 

केजरीवाल यांनी मानले कार्यकर्ते आणि जनतेचे आभार 

विजयावर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली .  केजरीवाल यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, या सत्तांतरासाठी पंजाबच्या नागरिकांचं खूप खूप आभार मानतो. या ट्वीटमध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्यासोबतचा एक फोटो ट्वीट केला आहे. 

पंजाबमधील आपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला

पंजाबमधील आपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. विजयाचं सेलिब्रेशन देखील आपनं सुरु केलं आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. काँग्रेस आतापर्यंत केवळ 12 जागांवर आघाडीवर आहे. तर अकाली दल 10  जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर भाजप मात्र निष्प्रभ दिसून येत आहे. 

काँग्रेसच्या हातून पंजाब का गेलं? 

काँग्रेसच्या हातात असलेले हे राज्य हातातून जाण्याची अनेक कारणं आहेत. यामध्ये महत्वाचं म्हणजे क्रिकेटर आणि मूळचे भाजपवासी नवज्योतसिंह सिद्धू यांना प्रदेश अध्यक्ष बनवले आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यापुढे आव्हान उभे केले. या दोघांमधून विस्तवही जात नसल्याने अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसने लगेचच चन्नी यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. अमरिंदर सिंह यांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला असून भाजपसोबत युती करून निवडणुक लढवली. दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधन कमिटीचे मनजिंदर सिंह सिरसाही भाजपमध्ये सामिल झाले.  

भाजपवर नाराजीचं कारण काय?

ऐतिहासिक शेतकरी आंदोलनातील पंजाबचा सहभाग जास्त होता. त्यामुळं भाजपवर लोकांची नाराजी सहाजिकच होती. याचा फटका भाजपला बसला.  पंजाब काँग्रेसमधला अंतर्गत वादाचा फटका काँग्रेसला बसला. याचा फायदा आपला झाल्याचं दिसून येत आहे. पंजाबमध्ये सत्ता आल्यास आपला सत्ता मिळालेलं हे दुसरं राज्य असेल. भगवंत मान हे आपचे पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केले आहेत. पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये सत्ता येणार असल्याचा दावा अनेकदा केला होता. 

2017 मध्ये कुणाला किती मिळाल्या होत्या जागा? - 
2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती. 117 जागापैकी काँग्रेसने 77 जागावर विजय मिळवला होता. तर अकाली दल 15, भाजप 3 आणि आम आदमी पार्टीला 20 जागांवर विजय मिळाला होता. तर दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारली होती.  

या ठिकाणी पाहा लाईव्ह निकालाचे अपडेट्स 

https://marathi.abplive.com/live-tv 

https://twitter.com/abpmajhatv 

https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA 

संबंधित बातम्या

Punjab Election Results : पंजाबमधील सत्तांतरानंतर अरविंद केजरावालांची प्रतिक्रिया, खास फोटो शेअर करत म्हणाले...

Share Market : पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकाला दिवशी सेन्सेक्स 1000ने वधारला, निफ्टी देखील 321 अंकांनी वर

Goa Election Result : गोव्यात चुरस वाढली! सुरुवातीचे सर्व कल हाती; काँग्रेस-भाजपमध्ये घासून सामना, उत्पल पर्रीकर पिछाडीवर

Election Result 2022 : सुरुवातीच्या कलांमध्ये यूपी, उत्तराखंडमध्ये भाजप, पंजाबमध्ये आप आघाडीवर तर गोव्यात घासून!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget