एक्स्प्लोर

पुण्यात टेम्पोत सोनं,कुठून आलं-कुठे निघालं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती; IT विभागाचे अधिकारीही दाखल

पुणे पोलिसांनी आज नाकाबंदी दरम्यान एक टेम्पो पकडला असून तब्बल 138 कोटी रुपये किमतीचे सोने या टेम्पोमध्ये आढळून आलं आहे.

पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात असून भरारी पथकेही तैनात करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात पोलिसांनी एक गाडी अडवली असता, त्यात कोट्यवींची रोकड सापडली होती. निवडणुकांच्या कामासाठीच ही रोकड पाठविण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी या रोकडचे वाहन पाहून केला होता. त्यानंतर, आज पुण्यात सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटींचे सोने पकडले गेले आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. सातारा रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास नाकाबंदी पोलिसांनी कोट्यवधीचे सोने जप्त केले आहे. याबाबत, आता पुढील तपासणी सुरू असून पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे.  सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तपासणीवेळी हा टेम्पो अडवला. त्यामध्ये पांढऱ्या पोत्यात बॉक्स आढळले, त्यानंतर चालक आणि आणखी एक जण यामध्ये होता, त्यांच्याकडे चौकशी केली, त्याची तपासणी अद्याप चालू आहे. हे जवळपास १३८ कोटी रूपयांचं सोनं असल्याची माहिती समोर आली आहे. 

पुणे पोलिसांनी आज नाकाबंदी दरम्यान एक टेम्पो पकडला असून तब्बल 138 कोटी रुपये किमतीचे सोने या टेम्पोमध्ये आढळून आलं आहे. सहकार नगर परिसरातून ताब्यात घेतलेला हा टेम्पो एका खासगी लॉजिस्टिक कंपनीचा असून यामधील सोनं पुण्यातील कुठल्या व्यापाऱ्याकडे जात होतं, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी या संदर्भात सगळी माहिती आयकर विभाग तसेच निवडणूक आयोगाला कळवलेली आहे. पुण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात हा टेम्पो सध्या आणलेला आहे. याबाबत, पुण्यातील डीसीपी स्मार्तना पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पोलिसांकडून सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी व 24 तास तपासणी सुरू आहे. त्यानुसार, आज सकाळी तपासणी दरम्यान, आढळून आलेल्या टेम्पोची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये, पांढरे बॉक्स होते, या बॉक्समध्ये काहीतरी असल्याचे लक्षात येताच चालकाकडे अधिक चौकशी केली. त्यामध्ये दागिने असून मुंबईतून ते पुण्याच्या कार्यालयात आणले गेले आहेत. त्यामुळे, आपण आयकर विभाग आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन पुढील चौकशीसाठी त्यांनाही बोलवले आहे, अशी माहिती डीसीपी स्मार्तना पाटील यांनी दिली. 

हेही वाचा

देवेंद्र फडणवीसांसोबत गडकरी, सामंत कार्यकर्त्यांच्या खांद्यावर, तटकरेंसोबत गोगावले; कुठून भरले अर्ज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या मोसमात वाढल्या नोकऱ्या; गणपती ते दिवाळी, BSFI क्षेत्रात 4 महिन्यात लक्षवेधी वाढ
सणासुदीच्या मोसमात वाढल्या नोकऱ्या; गणपती ते दिवाळी, BSFI क्षेत्रात 4 महिन्यात लक्षवेधी वाढ
मोठी बातमी : शेअर बाजारात त्सुनामी, गुंतवणूकदारांना 10 लाख कोटीचा झटका, या 12 शेअर्सना फटका!
मोठी बातमी : शेअर बाजारात त्सुनामी, गुंतवणूकदारांना 10 लाख कोटीचा झटका, या 12 शेअर्सना फटका!
सुहास कांदे इरेला पेटले, भुजबळांच्याही मतदारसंघात स्वत:च भरला अर्ज;  दोन ठिकाणाहून ठोकला शड्डू
सुहास कांदे इरेला पेटले, भुजबळांच्याही मतदारसंघात स्वत:च भरला अर्ज; दोन ठिकाणाहून ठोकला शड्डू
Uddhav Thackeray:  भायखळा मतदारसंघाचा मविआतील तिढा सुटला, ठाकरेंचा शिलेदार लढणार, मनोज जामसुतकर विरुद्ध यामिनी जाधव असा सामना रंगणार
भायखळा विधानसभा ठाकरेंकडेच, मनोज जामसुतकर मशाल चिन्हावर लढणार, यामिनी जाधव यांना तगडं आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Balasaheb Thorat On Vidhansabha Seat Sharing : महाविकास आघाडाीचा फॉर्म्युला 90-90.-90 जागांचाJalogan Vidhansabha : जळगाव जिल्ह्यात महायुतीला बंडखोरीचे ग्रहण1 Min 1 Constituency | Vidhan Sabha | 1 मिनिट 1 मतदारसंघ | कोणाची बाजी?Amit Thackeray : राज ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंसाठी सभा घेतली, पण शिंदेंनी माझ्याविरोधात उमेदवार दिला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सणासुदीच्या मोसमात वाढल्या नोकऱ्या; गणपती ते दिवाळी, BSFI क्षेत्रात 4 महिन्यात लक्षवेधी वाढ
सणासुदीच्या मोसमात वाढल्या नोकऱ्या; गणपती ते दिवाळी, BSFI क्षेत्रात 4 महिन्यात लक्षवेधी वाढ
मोठी बातमी : शेअर बाजारात त्सुनामी, गुंतवणूकदारांना 10 लाख कोटीचा झटका, या 12 शेअर्सना फटका!
मोठी बातमी : शेअर बाजारात त्सुनामी, गुंतवणूकदारांना 10 लाख कोटीचा झटका, या 12 शेअर्सना फटका!
सुहास कांदे इरेला पेटले, भुजबळांच्याही मतदारसंघात स्वत:च भरला अर्ज;  दोन ठिकाणाहून ठोकला शड्डू
सुहास कांदे इरेला पेटले, भुजबळांच्याही मतदारसंघात स्वत:च भरला अर्ज; दोन ठिकाणाहून ठोकला शड्डू
Uddhav Thackeray:  भायखळा मतदारसंघाचा मविआतील तिढा सुटला, ठाकरेंचा शिलेदार लढणार, मनोज जामसुतकर विरुद्ध यामिनी जाधव असा सामना रंगणार
भायखळा विधानसभा ठाकरेंकडेच, मनोज जामसुतकर मशाल चिन्हावर लढणार, यामिनी जाधव यांना तगडं आव्हान
हॅलो, तिकीटासाठी 50 लाख द्या, भाजप आमदाराला दिल्लीतून फोन; नाशिक पोलिसांनी घेतला शोध
हॅलो, तिकीटासाठी 50 लाख द्या, भाजप आमदाराला दिल्लीतून फोन; नाशिक पोलिसांनी घेतला शोध
Amal Mahadik Net Worth : माजी आमदार अमल महाडिकांच्या संपत्तीत पाच वर्षात किती कोटींनी वाढ झाली?
माजी आमदार अमल महाडिकांच्या संपत्तीत पाच वर्षात किती कोटींनी वाढ झाली?
Maharashtra Assembly Elections 2024 : सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक मतदानाचा हक्क कसा बजावतात? जाणून घ्या सविस्तर
सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक मतदानाचा हक्क कसा बजावतात? जाणून घ्या सविस्तर
अमित शाह, याला दारात तरी उभं करतील का?; इंदापुरातूनच हर्षवर्धन पाटलांवर जोरदार हल्ला
अमित शाह, याला दारात तरी उभं करतील का?; इंदापुरातूनच हर्षवर्धन पाटलांवर जोरदार हल्ला
Embed widget