एक्स्प्लोर

Pune Bypoll Election : कसबा, चिंचवडमध्ये आज सभा, रोड शोचा धडाका; भाजप, मविआकडून प्रचाराचा धुरळा, कोणकोणते नेते पुण्यात?

Pune Bypoll Election : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आज नेत्यांच्या सभांची शेवटची संध्याकाळ असणार आहे. त्यामुळे आज प्रचारासाठी दोन्ही बाजूचे सर्वोच्च नेते मैदानात उतरणार आहेत.

Pune Bypoll Election : पुण्यातील कसबा (Kasba Bypoll Election) आणि चिंचवड (Chinchwad Bypoll Election) पोटनिवडणुकीचा प्रचार (Election Campaign) शुक्रवारी (24 फेब्रुवारी) संध्याकाळी पाच वाजता संपणार आहे. त्यामुळे आजची (23 फेब्रुवारी) संध्याकाळ ही नेत्यांच्या सभांची शेवटची संध्याकाळ असणार आहे. त्यामुळे आज प्रचारासाठी दोन्ही बाजूचे सर्वोच्च नेते मैदानात उतरणार आहेत.

पुण्यात आज कोणकोणते नेते प्रचाराला?

* कसबा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भिडे पुलापासुन पदयात्रा काढणार आहेत. त्यानंतर डेक्कनच्या नदीपात्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.

* कॉंग्रेसचे कसब्याचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी आदित्य ठाकरे हे रोड शो करणार आहेत. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची चिंचेची तालीम इथे एकत्रित सभा होणार आहे.

* तर दुसरीकडे चिंचवड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्यासाठी अजित पवार यांचा रोड शो आणि सभेची तयारी राष्ट्रवादीकडून सुरु आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून आज छगन भुजबळ, एकनाथ खडसे, जयंत पाटील हे चिंचवडमध्ये प्रचार करणार आहेत. 

* याशिवाय रोहित पवार यांचा सकाळी रोड शो देखील चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
 
* त्यासोबतच चिंचवडच्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे संध्याकाळी सभा घेणार आहेत. 

* याशिवाय इतरही नेते या दोन मतदारसंघात आज दिवसभर प्रचार करणार आहेत.

भाजप आणि महाविकास आघाडीची जोरदार तयारी

पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.  कसबा आणि चिंचवड निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष ताकदीनिशी प्रचार सभा, बाईक रॅली आणि पदयात्रेवर भर दिला जात आहे. कसब्यातील भाजप उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार सुरु आहे. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आणि नाना काटे यांच्यासाठी भाजप तसंच महाविकास आघाडी जोर लावत आहेत. शिवाय इथे बंडखोर राहुल कलाटे यांचाही जोरदार प्रचार सुरु आहे.

पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान, 2 मार्चला निकाल

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. तर कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर पोटनिवडणूक होत आहे. पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी येत्या 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर करण्यात येईल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SIP vs Lump sum :1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती

व्हिडीओ

Mumbai Pune Express Way Traffic : पुणे-मुंबई वेवरील वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? Special Report
Loksabha Drama : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळाचा कळस Special Report
Nashik Mayor : नाशिकमध्ये मिसळीवर ताव, सत्तेचा डाव Special Report
Ajit pawar NCP : 9 फेब्रुवारी... अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरू होतं? Special Report
Ajit Pawar NCP : अजित पवारांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SIP vs Lump sum :1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
Akola Accident News : अकोल्याच्या मूर्तिजापूर -कारंजा मार्गावर होंडा सिटी कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी
अकोल्याच्या मूर्तिजापूर -कारंजा मार्गावर होंडा सिटी कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून तीन नावे समोर, उपमहापौरपदी शिवसेनेतील दोन महिलांच्या नावांची चर्चा
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून तीन नावे समोर, उपमहापौरपदी शिवसेनेतील दोन महिलांच्या नावांची चर्चा
मालेगावात सत्तास्थापनेत ट्विस्ट, एमआयएमच्या आमदाराने घेतली दादा भुसेंची भेट; शिवसेना पाठिंबा देणार?
मालेगावात सत्तास्थापनेत ट्विस्ट, एमआयएमच्या आमदाराने घेतली दादा भुसेंची भेट; शिवसेना पाठिंबा देणार?
Rahul Gandhi : प्रश्नांची इतकी भीती, मोदी जी सत्याला इतके घाबरले की असत्याचा आसरा घेतला : राहुल गांधी
प्रश्नांची इतकी भीती, मोदी जी सत्याला इतके घाबरले की असत्याचा आसरा घेतला : राहुल गांधी
Embed widget