एक्स्प्लोर

Prashant Kishore | दावा खरा ठरुनही प्रशांत किशोर यांचा निवडणूक व्यवस्थापनातून संन्यास घेण्याचा निर्णय

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सगळ्यांनाच जोरदार धक्का दिला आहे. प्रशांत किशोर यांनी निवडणूक व्यवस्थापनातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : आपल्या कारकीर्दीत पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील मोठा विजय जमा केल्यानंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सगळ्यांनाच जोरदार धक्का दिला आहे. प्रशांत किशोर यांनी निवडणूक व्यवस्थापनातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. "मी जे आता करत आहे ते यापुढे करण्याची इच्छा नाही. मी खूप काम केलं. आता ब्रेक घेऊन आयुष्यात वेगळं काहीतरी करण्याची वेळ आली आहे. मला निवडणूक रणनीतीकार संन्यास घ्यायचा आहे," असं ते म्हणाले.

राजकारणात पुन्हा प्रवेश करणार का याबाबत विचारला असता ते म्हणाले की, "मी अपयशी राजकारणी आहे. मला मागे जाऊन काय करु शकतो हे पाहायचं आहे." "आसाममध्ये जाऊन चहाची शेती करायची आहे," असं मजेशीर उत्तरही त्यांनी दिली.

प्रशांत किशोर म्हणाले की, "आजचा निकाल तृणमूल काँग्रेसच्या बाजूने एकतर्फी होता. अटतटीची लढत झाली, असं प्रशांत किशोर म्हणाले. आम्हाला खूप संघर्ष करावा लागलं. निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपातीपणाची होती, त्यामुळे आम्हाला प्रचारात अनेक अडचणी आल्या. तृणमूल काँग्रेस कामगिरी चांगली करेल, याची मला खात्री होती. पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेमुळे भाजप प्रत्येक निवडणूक जिंकेलच असं नाही."

"ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला करणं हे भाजपासाठी फायदेशीर ठरलं नाही. पराभव झाल्यावर आपलं कुठे चुकलं हे कबूल करण्यासाठी आपण तेवढे नम्र असायला हवं. ममता यांची जनतेशी संपर्क साधण्याची क्षमता कमी लेखण्यात आली. ममता बॅनर्जी यांनी व्हीलचेअरवरुन केलेला प्रचार पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप भाजपने केला. परंतु लोकांनीच स्पष्ट उत्तर दिलं," असं प्रशांत किशोर यांनी नमूद तेलं.

प्रशांत किशोर यांचा दावा खरा ठरला
"पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा गाठण्यासाठी संघर्ष करावा लागेल. याचाच अर्थ भाजपला 100 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. जर भाजपला यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम सोडेन," असं निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी निवडणुकीपूर्वी म्हटलं होतं. त्यांनी यासंदर्भातील ट्वीट पिन देखील करुन ठेवलं होतं. त्यांनी भाजपबाबत केलेल्या दाव्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, तो आज खरा ठरताना दिसत असून ते हिरो ठरले आहेत.

साडेचार वाजेपर्यंत आलेल्या कलांनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने 213 जागांवर आघाडी घेतली होती. तर भाजप 77 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय काँग्रेस 1 आणि इतर एक जागांवर पुढे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सोलापूर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा; विजयाचा निर्धार अधिक मजबूत
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सोलापूर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा; विजयाचा निर्धार अधिक मजबूत
पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणूक, शरद पवारांच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा, चंद्रकांत पाटील आणि जयकुमार गोरेंसोबत व्यासपीठावर उपस्थित
पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणूक, शरद पवारांच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा, चंद्रकांत पाटील आणि जयकुमार गोरेंसोबत व्यासपीठावर उपस्थित
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
अजितदादांचा आजचा पक्ष सक्षम नाही, पुणे पदवीधर जागा मिळायला हवी होती, रोहित पवारांचा टोला, तर अर्थमंत्रीपदावरुनही मुख्यमंत्र्यांवर टीका
अजितदादांचा आजचा पक्ष सक्षम नाही, पुणे पदवीधर जागा मिळायला हवी होती, रोहित पवारांचा टोला, तर अर्थमंत्रीपदावरुनही मुख्यमंत्र्यांवर टीका

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget