राऊतांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, प्रकाश आंबेडकरांची संजय राऊतांवर जळजळीत टीका
Prakash Ambedkar : शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
![राऊतांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, प्रकाश आंबेडकरांची संजय राऊतांवर जळजळीत टीका Prakash Ambedkar criticises Sanjay raut Vanchit Bahujan Aaghadi VBA President press conference in Akola mahavikas aghadi seat sharing maharashtra politics news राऊतांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, प्रकाश आंबेडकरांची संजय राऊतांवर जळजळीत टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/19/8c64dcd1e1d24a4a34a760153ed4f4831710859583152322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अकोला : वंचित बहुजन आघाडी (Vanchit) आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा (Seat Sharing तिढा अद्याप कायम आहे. त्यामुळे वंचित महाविकास आघाडी सामील होण्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. भाजपाबरोबर राहिलेत त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. वंचितने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास त्याला पाठिंबा देणार असल्याच्या राऊतांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांनी हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरेंशी कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट
गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेसने माझ्याविरोधात मुस्लिम उमेदवार दिला. असं झाल्याने काँग्रेसचा जनाधार कमी झाल्याचं अकोल्यातील मुस्लिम समाजाचं मत, यावेळी असं झालं तर मुस्लिमांचे मत असेच राहील, असं आंबेडकरांनी म्हटलं आहे. चंद्रहार पाटलांवरून उद्धव ठाकरेंशी कोणतेही मतभेद नसल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.
पक्ष आणि आंबेडकरांचं मत-मतांतरे
मी पक्षाने सांगितलं तसेच निर्णय घेतो. पक्षाच्या आदेशाने काम करतो. माझ्या मताने झाले असते, तर कधीचाच निर्णय घेतला असता. युतीला विलंबाबत पक्ष आणि आंबेडकरांचं मत-मतांतरे आहेत का, असा प्रश्न निर्माण करणारे हे आंबेडकरांचं वक्तव्य आहे.
महाविकास आघाडी सोबतच्या युतीबाबत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं की, महाविकास आघाडीतील पक्षांत भांडणे आहेत, तेच भांडण मिटवत नाहीत. त्यांनी दिलेला तीन जागेचा प्रस्ताव आम्ही फेटाळून लावला आहे. भाजपला हरवण्यासाठी जी पाऊले उचलायला लागतील ती आम्ही उचलणार, असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं आहे.
वंचितचा 7 जागांचा प्रस्ताव
सात जागांचा प्रस्ताव आम्ही काँग्रेसकडे दिला आहे. मल्लिकार्जुन खरगेंना आम्ही एक पत्र लिहिलं आहे. महाविकास आघाडीमध्ये आजपर्यंत 10 जागांवरती काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. पाच जागा शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आघाडीसंदर्भात आमचं काही मत नाही. आम्ही काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. काँग्रेस त्यावर निर्णय घेईल.
शेवच्या क्षणापर्यंत ऑफर कायम राहिल
आमची ऑफर शेवच्या क्षणापर्यंत कायम राहिल. अखेरच्या दिवसापर्यंत आम्ही वाट पाहू त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. संजय राऊतांवर निशाणा साधला आंबेडकरांनी म्हटलं आहे की, आधी भाजपसोबत राहिलेल्या संजय राऊतांनी त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
राज ठाकरेंनी अमित शाहांना कोणता प्रस्ताव दिला? दिल्ली भेटीची इनसाईड स्टोरी नांदगावकरांनी सांगितली!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)