एक्स्प्लोर

चिंचवडमध्ये पंकजा मुंडेंच्या सभेत गोंधळ, घर बचाव कृती समितीचं आंदोलन

हे सरकार फसवं आहे, आमच्या घरं नियमित केली नाहीत. अशा आशयाच्या त्यांनी घोषणा दिल्याची माहिती स्थानिक भाजप नेत्यांनी दिली. या सर्वांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघात आयोजित पंकजा मुंडे यांच्या प्रचारसभेत गोंधळ झाला. भाजप उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी ही सभा सुरू होती, तेव्हा हा प्रकार घडला. पिंपरी चिंचवड शहर कसं स्मार्ट होतंय असं पंकजा मुंडे सांगत असताना जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. घोषणाबाजी करणारे घर बचाव कृती समितीचे सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात प्रस्तावित रिंग रोड मार्गात अनेकांची बेकायदा घरं आहेत. त्यावर पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण त्यावर हातोडा चालवणार आहेत. ती घरं नियमित करावीत अशी बाधितांची भाजपकडे मागणी आहे. घर बचाव कृती समिती संघटना यासाठी वेगवेगळे आंदोलन करते. त्याच आंदोलनानंतर भाजपने योग्य तो तोडगा काढू असं आश्वासन दिलं होतं. ते अद्याप पूर्ण न झाल्याने कृती समितीच्या सदस्यांनी आज पंकजा मुंडेंच्या सभेत गोंधळ घातला. हे सरकार फसवं आहे, आमच्या घरं नियमित केली नाहीत. अशा आशयाच्या त्यांनी घोषणा दिल्याची माहिती स्थानिक भाजप नेत्यांनी दिली. या सर्वांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पंकजा मुंडेंच्या सभेतील गोंधळात आता भाजप कनेक्शन समोर आलं आहे. भाजपचे स्वीकृत सदस्य संदीप गाडे यांच्या भगिणी सुनीता फुले ह्या देखील घोषणाबाजी करत होत्या. यामुळे शहरात आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. वाकड पोलिसांनी तीन महिला आणि तीन पुरुष अशा सहा जणांना ताब्यात घेतल्यानंतर ही माहिती समोर आली. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. गाडे हे स्वीकृत सदस्य आहेत. दरम्यान, मराठवाड्यातून या भागात मोठा वर्ग आला आहे. त्यांनी भाजपलाच मतं द्यावीत, असं आवाहन यावेळी मुंडे यांनी केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget