Ajit Pawar News : पंतप्रधान मोदींच्या उंचीचा दुसरा नेता देशात नाही, त्यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही : अजित पवार
Ajit Pawar On PM modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याइतका दुसरा मोठा राष्ट्रीय नेता नाही, असे वक्तव्य नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
Ajit Pawar On PM modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याइतका दुसरा मोठा राष्ट्रीय नेता कुणीच नाही, त्यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही, असे वक्तव्य नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अजित पवार आज मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिले होते. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना हाताशी धरत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाल्याचे चित्र आहे. अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटनही केले. अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांसह मंत्रालयात हजेरी लावली. त्यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केले. मोदींसारखा दुसरा नेता देशात नाही, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.
अजित पवार आज पहिल्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहिले. मंत्रिमंडळात आमचे कोणतेही मदभेद नाहीत, असे यावेळी त्यांनी सांगितले. अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांसोबत मंत्रालयात उपस्थिती दर्शवली. अजित पवार आणि आठ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर आज पहिलीच मंत्रिमंडळ बैठक पार पाडली.
No leader today of Modi's stature: Ajit Pawar
— Press Trust of India (@PTI_News) July 4, 2023
Edited video is available in video section on https://t.co/lFLnN4oaDV pic.twitter.com/TB9cV6ZCYh
सोमवारी पत्रकार परिषदेत छगन भुजबळ आणि अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाकामामुळेच आम्ही सरकारमध्ये सहभागी झाल्याचे भुजबळ यांनी सांगितलं होतं. अजित पवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केले होते. देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आगेकूच करतोय. केंद्र आणि राज्य वेगळ्या विचारांचं असतं तर विकास कामात आणि निधीत कमतरता राहाते, त्यामुळे आम्ही सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, असे अजित पवार यांनी सोमवारी सांगितले होते.
अजित पवार की शरद पवार, कार्यकर्त्यांमध्ये पेच -
अजित पवार आणि शरद पवार यांनी 5 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे. त्यामुळे अजित पवार की शरद पवार असा पेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला आहे.. अजित पवार यांनी एमआटी वांद्रे येथे आमदार, खासदार, जिल्हाअध्यक्ष यांच्यासह सर्वच पदाधिकाराऱ्यांना बोलवले आहे. तर शरद पवार यांनी वायबी चव्हाण सेंटर येथे बैठक बोलवली आहे.
No dissent within Maharashtra cabinet over any matter: Ajit Pawar
— Press Trust of India (@PTI_News) July 4, 2023
Edited video is available in video section on https://t.co/lFLnN4oaDV pic.twitter.com/WchguYIqSI
अजित पवारांनी नव्या कार्यालयाचे केले उद्घाटन -
अजित पवार यांनी आज नव्या कार्यालयाचे उद्घाटन केले. राष्ट्रवादी कांग्रेसच्या नव्या कार्यालयाची चावी नसल्याने कार्यकर्त्यांनी दरवाजा तोडावा लागला. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दरवाज्याचे कुलुप तोडले . राष्ट्रवादी कांग्रेसचं मंत्रालयासमोर विधिमंडळ पक्षाचं कार्यालय सुरु करण्यात आले. पण उद्घाटनाआधी कार्यालयाचा मुख्य दरवाज्याचे कुलुप तोडण्याची वेळ आल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे.