एक्स्प्लोर

Nashik West Assembly Constituency : नाशिक पश्चिममध्ये सीमा हिरेंची विजयाची हॅटट्रिक, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांचा पराभव

Nashik West Assembly Constituency : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अपूर्व प्रशांत यांचा सीमा हिरे यांनी 10 हजार मतांनी पराभव केला होता. 

Nashik West Assembly Constituency : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघातून महायुतीतून (Mahayuti) भाजपने (BJP) विद्यमान आमदार सीमा हिरे (Seema Hiray) यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. तर राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) दिनकर पाटील (Dinkar Patil) यांना उमेदवारी दिली. 

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे यांचा तिसऱ्यांदा विजय झाला आहे.  68116 मतांनी ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांचा सीमा हिरे यांनी पराभव करत विजय मिळवला. सीमा हिरे यांच्या उमेदवारीमुळे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचा अंतर्गत वाद उफाळून आला होता. मात्र सीमा हिरे यांनी निवडणुकीत बाजी मारली.

सीमा हिरे - 140773
सुधाकर बडगुजर - 72661
दिनकर पाटील - 46390

सन 2009 मधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर नाशिक शहरातील मतदारसंघांचे विभाजन होऊन नाशिक पश्चिम मतदारसंघ तयार झाला. पहिल्या विधानसभा निवडणुकीत येथे मनसेचा उमेदवार विजयी झाला होता. मनसेचे उमेदवार नितीन भोसले हे 2009 साली विजयी झाले होते. मात्र गेल्या दोन विधानसभा निवडणुकांपासून येथे भाजपच्या सीमा हिरे यांचे वर्चस्व कायम आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अपूर्व प्रशांत यांचा सीमा हिरे यांनी 10 हजार मतांनी पराभव केला होता. 

नाशिक पश्चिम विधानसभेत सीमा हिरेंचा विजय

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात एकूण 3,82,131 मतदार आहेत. अनुसूचित जमातींची संख्या 55,065 आहे. तर अनुसूचित जमातीच्या लोकांची संख्या 21,094 आहे. मुस्लिम मतदारांची संख्या 16,814 आहे. येथे राखीव प्रवर्गातील लोकसंख्या खूपच कमी आहे, मात्र येथील तरुण मतदानात महत्त्वाची भूमिका बजावतात. या मतदारसंघात भाजपच्या आमदार सीमा हिरे हॅटट्रिक करण्याच्या तयारीत होत्या. तर शिवसेना ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांचे सीमा हिरे यांच्या समोरे तगडे आव्हान होते. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी देखील या निवडणुकीतून रंगत वाढवली. अलीकडेच दिनकर पाटील यांना मुस्लीम बांधवांनी पाठींबा दर्शवला. मनसे पक्षाला नव्हे तर उमेदवाराला पाठींबा देत आहोत, अशी भूमिका मुस्लीम बांधवांनी घेतली. आता नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सीमा हिरे विजयाची हॅटट्रिक केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gauri Palave Death : लेकींच्या गळ्यात फास, किती सोसायचा त्रास Special Report
KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report
Gen Z In Election : 'जेन झी'ची भाषा, राजकारणाची दिशा; फडणवीसांचा हुकार, GEN Z ला संधी Special Report
Dharmendra Demise : रोमॅन्टिक हीरो ते बॉलिवूडचा सुपरस्टार..धर्मेंद्र! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
IND vs SA  : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
Embed widget