एक्स्प्लोर

Nashik Vidhan Parishad Election 2026: ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?

Nashik Vidhan Parishad Election 2026: ऐनवेळचा दगाफटका टाळण्यासाठी महायुतीला 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'चा अवलंब करावा लागला आहे. आता ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झालाय.

Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election 2026) अनुषंगाने राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. नाशिक जिल्ह्यात महायुतीकडे तब्बल 450 मतदारांचे स्पष्ट आणि प्रचंड बहुमत आहे, तसेच विरोधी पक्षाचा कोणताही अधिकृत उमेदवार मैदानात नाही. असे असतानाही महायुतीमध्ये कमालीची धाकधूक पाहायला मिळत असून, ऐनवेळचा दगाफटका टाळण्यासाठी थेट 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'चा अवलंब करावा लागला आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे (Shiv Sena UBT) पक्षाचे नेते वसंत गीते यांच्या एका वक्तव्याने निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

Vasant Gite: नेमकं काय म्हणाले वसंत गीते? 

अपक्ष उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांनी माघार घेतली असली, तरी ठाकरे सेनेचे नेते वसंत गीते यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नव्या खेळीची चर्चा सुरू झाली आहे. वसंत गीते म्हणाले, "आम्ही पक्ष नेतृत्वासोबत बोलून स्थानिक महाविकास आघाडीच्या बैठकीत युतीच्या विरोधात मतदानाचा अजेंडा राबवणार आहोत. नाशिक विधान परिषद निवडणुकीसंदर्भात लवकरच महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतील." वसंत गीतेंच्या या विधानामुळे गोकुळ गीते यांच्या उमेदवारीची चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा सुरू झाली असून महाविकास आघाडी युतीच्या उमेदवाराविरोधात छुपे मतदान घडवून आणण्याची मोठी खेळी खेळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Nashik Vidhan Parishad Election 2026: तांत्रिक बाबीचा फायदा महाविकास आघाडी उचलणार?

दरम्यान, नाशिक विधान परिषद निवडणुकीत मागील काही दिवसांत अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्या कार्यपद्धतीवर मित्रपक्ष भाजपचे बंडखोर, अपक्ष उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि खुद्द शिंदे गटातील काही नेत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांची बंडखोरी शमवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे आणि मंत्री उदय सामंत या तीन बड्या मंत्र्यांना नाशिकमध्ये ठाण मांडावे लागले होते. दीर्घ चर्चेनंतर गोकुळ गिते यांनी माघार घेतली आहे, तरी तांत्रिक अडचण (Technical Issue) अशी आहे की, गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे या दोन्ही बंडखोरांची नावे मतपत्रिकेवर कायम असणार आहेत. याच तांत्रिक बाबीचा फायदा महाविकास आघाडी घेण्याच्या तयारीत आहे.

Nashik Vidhan Parishad Election 2026: महायुतीचे 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'

शनिवारी शिवसेना शिंदे गटाचे शहरी आणि ग्रामीण भागातील नगरसेवक ठाण्याच्या दिशेने रवाना झाले होते, तर सोमवारी भाजपचे (BJP) नगरसेवक देखील ठाण्याकडे सहलीसाठी रवाना झाले आहेत. 18 जून रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी कोणतीही जोखीम न पत्करण्यासाठी या सर्व लोकप्रतिनिधींना थेट मतदानाच्या दिवशीच नाशिकमध्ये आणले जाणार आहे. आता एकीकडे महायुतीने नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलवले असले, तरी दुसरीकडे महाविकास आघाडी कोणती छुपी रणनीती आखणार आणि 18 जूनला नेमकं काय घडणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिक विधान परिषदेसाठी बहुमत असूनही महायुतीची धाकधूक का वाढली? कुठं बिघडू शकतं समीकरण, जाणून घ्या सविस्तर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget