एक्स्प्लोर

Narhari Zirwal : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? नरहरी झिरवाळांच्या वक्तव्याने भूवया उंचावल्या; म्हणाले...

Narhari Zirwal on Maharashtra Next CM : महायुतीच्या विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत चर्चांना उधाण आले असताना नरहरी झिरवाळ यांनी मोठं वक्तव्य केलंय.

मुंबई :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) मोठी मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसलाय. महायुतीचा 236 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. महायुतीत एकट्या भाजपने 132 जागा जिंकल्या. 1990 नंतर विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप (BJP) हा पहिला पक्ष ठरला आहे. महायुतीच्या विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत चर्चांना उधाण आले आहे. आता यावरून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

नरहरी झिरवाळ म्हणाले की,  मी उद्यापर्यंत उपाध्यक्ष आहे. जनतेने मला पुन्हा एकदा संधी दिली. पण राज्यभरातून अनेकांनी मला शुभेच्छा दिल्या. महायुती सरकारने अडीच वर्षात अनेक चांगल्या योजना राबवल्या. माणूस सकाळी जेवला की रात्री वेगळ जेवण लागतं, तसं मला ही वाटतं. पाच वर्ष मी विधान भवनात काढले. आता रस्त्याच्या अडून पलीकडे गेलं पाहिजे, असे म्हणत त्यांनी मंत्रि‍पदाची इच्छा बोलावून दाखवली. याबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा झाली का? असे विचारले असता नरहरी झिरवाळ म्हणाले की, मला आतापर्यंत न मागताच सगळं मिळालं आहे. त्यामुळे माझा आत्मविश्वास न मागण्यावर सुद्धा आहे. मला न मागता काही न काही मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

मुख्यमंत्री कोण होणार? नरहरी झिरवाळ म्हणाले... 

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? असे विचारले असता नरहरी झिरवाळ म्हणाले की, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तीनही सक्षम नेते आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कोणीही झाले तरीदेखील आम्हाला चालणार आहे. अजितदादा 11 वेळी अर्थमंत्री राहिले आहेत. दोन-चार-पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेत. त्यामुळे आमची इच्छा आहे की, अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे. राज्याने अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहावे, अशी सर्वसामान्य जनतेची देखील इच्छा आहे. मात्र महायुतीतील वरिष्ठ नेते मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील, त्या निर्णयाचे आमची स्वागत करू, असे नरहरी झिरवाळ म्हणाले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra Next CM: नरेंद्र मोदी, अमित शाह नव्हे...महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण निवडणार?, अखेर नाव आलं समोर, 29 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणार

Eknath shinde : शिंदेंच्या आमदारांची मागणी, साहेब तुम्हीच मुख्यमंत्री व्हा; त्यावर काम सुरू असल्याचं एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी ओढले राज ठाकरेंच्या नातवाचे गाल, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी ओढले राज ठाकरेंच्या नातवाचे गाल, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी ओढले राज ठाकरेंच्या नातवाचे गाल, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी ओढले राज ठाकरेंच्या नातवाचे गाल, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी
एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका
एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका
Baba Adhav health: बाबा आढावांची प्रकृती बिघडली, शरद पवार रुग्णालयात भेटीला पोहोचले
Baba Adhav health: बाबा आढावांची प्रकृती बिघडली, शरद पवार रुग्णालयात भेटीला पोहोचले
Embed widget