एक्स्प्लोर
Narendra Modi Cabinet 2 : मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, राजनाथ सिंह संरक्षण मंत्री, तर अमित शाहांकडे गृहखातं
देशाच्या पहिल्या पूर्ण वेळ महिला संरक्षण मंत्री राहिलेल्या निर्मला सीतारमण देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्रीही असतील. म्हणजेच महिलेने देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याची तुरळक घटना यंदा घडेल.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं खातेवाटप जाहीर झालं आहे. अमित शाह यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राजनाथ सिंह आणि निर्मला सीतारमण यांच्या मंत्रालयाचा खांदेपालट करण्यात आला आहे. राजनाथ सिंह संरक्षण मंत्रालयाची धुरा सांभाळतील, तर निर्मला सीतारमण यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. सुब्रह्मण्यम जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालय सुपूर्द करण्यात आलं आहे. पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे, तर नितीन गडकरी यांच्याकडील भूपृष्ठ वाहतुकीची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेल्या स्मृती इराणी महिला आणि बालकल्याण विभागाचं कामकाज पाहतील. देशाच्या पहिल्या पूर्ण वेळ महिला संरक्षण मंत्री राहिलेल्या निर्मला सीतारमण देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्रीही असतील. म्हणजेच महिलेने देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याची तुरळक घटना यंदा घडेल. प्रकाश जावडेकर यांना पर्यावरण आणि वने विभाग पुन्हा देण्यात आला आहे.
शिवसेनेच्या वाट्याला पुन्हा अवजड उद्योग मंत्रालय आलं आहे. अनंत गितेंनंतर यंदा सेना खासदार अरविंद सावंत या मंत्रालयाची जबाबदारी सांभाळतील. गेल्या वेळी गितेंना अवजड उद्योग मंत्रिपद दिल्यामुळे शिवसेनेत नाराजी होती. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा राज्यमंत्री आहेत. तर अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना मनुष्यबळ विकास, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्रिपद मिळालं आहे.
जनता दल युनायटेड मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचं नितीश कुमार यांनी सांगितलं आहे. एक मंत्रीपद दिलं गेल्यानं जदयू नाराज असल्याची चर्चा होती.
मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी दुसऱ्यांदा मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यात 24 कॅबिनेट मंत्री आणि 9 स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री तर 24 राज्यमंत्र्यांचा समावेश होता.
VIDEO | मोदींच्या मंत्रिमडळात नसलेले चेहरे | ABP Majha
पाहा कोणाकडे कोणती खाती?
नरेंद्र मोदी - पंतप्रधान, कार्मिक, अवकाश,
राजनाथ सिंह - संरक्षण
अमित शाह - गृह
नितीन गडकरी - भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग
सदानंद गौडा - रसायने आणि खते
निर्मला सीतारमन - अर्थ, कॉर्पोरेट अफेअर्स
रामविलास पासवान - ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा
नरेंद्र सिंह तोमर - कृषी, ग्रामविकास आणि पंचायत राज
रवीशंकर प्रसाद - विधी आणि न्याय, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया उद्योग
थावरचंद गहलोत - सामाजिक न्याय
सुब्रह्मण्यम जयशंकर - परराष्ट्र व्यवहार
रमेश पोखरियाल निशंक- मनुष्यबळ विकास
अर्जुन मुंडा - आदिवासी विकास
स्मृती इराणी - वस्त्रोद्योग, महिला आणि बालकल्याण
डॉ. हर्षवर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूगर्भ संशोधन
प्रकाश जावडेकर - पर्यावरण आणि वने, माहिती आणि प्रसारण
पियुष गोयल - रेल्वे, वाणिज्य उद्योग
धर्मेंद्र प्रधान - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, पोलाद
मुख्तार अब्बास नक्वी - अल्पसंख्याक विकास
प्रल्हाद जोशी - संसदीय कामकाज, कोळसा आणि खाण
महेंद्रनाथ पांडे - कौशल्य विकास, उद्योजकता विकास
अरविंद सावंत - अवजड उद्योग
गिरीराज सिंह - पशुपालन, दुग्धविकास, मत्सोद्योग
गजेंद्र सिंह शेखावत - जलशक्ती
राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
संतोष गंगवार - कामगार
इंद्रजीत सिंह - सांख्यिकी, कार्यान्वयन, नियोजन
श्रीपाद नाईक - आयुष, संरक्षण राज्यमंत्री
जितेंद्र सिंह - ईशान्य भारत विकास, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, अणूशक्ती विकास, अवकाश संशोधन
किरन रीजिजू - क्रीडा आणि युवा कल्याण, अल्पसंख्याक
प्रल्हाद पटेल - सांस्कृतिक आणि पर्यटन
आर के सिंह - ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा, कौशल्यविकास
हरदीपसिंह पुरी - गृहनिर्माण आणि नगरविकास, हवाई वाहतूक, वाणिज्य उद्योग
मनसुख मांडवीय - जल वाहतूक, रसायन आणि खते
राज्यमंत्री
फग्गनसिंह कुलस्ते - पोलाद
अश्विनीकुमार चौबे - आरोग्य आणि कुटुंब कल्याण
अर्जुन मेघवाल - संसदीय कार्य आणि अवजड उद्योग
व्ही के सिंह - भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग
कृष्णपाल गुर्जर - सामाजिक न्याय
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा
किशन रेड्डी - गृह
पुरुषोत्तम रुपाला - कृषी
रामदास आठवले - सामाजिक न्याय
साध्वी निरंजन ज्योती - ग्रामविकास
बाबुल सुप्रियो - वने पर्यावरण
संजीव कुमार बालियान - पशुपालन, दुग्धविकास, मत्सोद्योग
संजय धोत्रे - मनुष्यबळ विकास, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
अनुराग ठाकूर - अर्थ आणि कॉर्पोरेट अफेअर्स
सुरेश अंगडी - रेल्वे
नित्यानंद राय - गृह
रतनलाल कटारिया - जलशक्ती आणि सामाजिक न्याय
वी मुरलीधरन - परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कार्य
रेणुका सिंह सरुता - आदिवासी विकास
सोमप्रकाश - वाणिज्य आणि उद्योग
रामेश्वर तेली - अन्नप्रक्रिया उद्योग
प्रतापचंद्र सारंगी - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि पशुपालन, दुग्धविकास, मत्सोद्योग
कैलाश चौधरी - कृषी
देबश्री चौधरी - महिला आणि बालकल्याण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement