एक्स्प्लोर

रामदास आठवलेंच्या RPI चा महाराष्ट्राबाहेर झेंडा; नागालँडमध्ये आठवले गट दोन जागांवर विजयी

Nagaland Election 2023 : रामदास आठवले गटानं थेट नागालँडमध्ये निवडणूक लढवली असून दोन जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले आहेत.

Nagaland Election 2023 : पुणे पोटनिवडणुकीसोबतच (Pune Bypoll Election) देशातील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकालही आज जाहीर होत आहेत. काही जागांचे निकाल हाती आले आहेत, तर काही ठिकाणी अद्याप मतमोजणी सुरु आहे. अशातच नागालँडमधील (Nagaland Assembly Election 2023)  दोन जागांवर रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (Republican Party of India) दोन आमदार निवडून आले आहेत. पहिल्यांदाच राज्याबाहेर रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या आरपीआयचे आमदार निवडून आले आहेत.

ईशान्येकडील तीन राज्य मेघालय, नागालँड आणि त्रिपुरामध्ये मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. तिनही राज्यांमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागा आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारी रोजी, तर नागालँड आणि मेघालयमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं होतं.

'या' दोन जागांवर आरपीआयच्या उमेदवारांचा विजय

रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाचे दोन उमेदवार नागालँडमध्ये विजयी झाले आहेत. RPI (आठवले) च्या Y. लिमा ओनेन चँग (Y. Lima Onen Chang) यांनी नागालँडमधील नोक्सेन जागा ( Noksen seat ) जिंकली आहे. तर इम्तीचोबा ( Imtichoba ) यांनी तुएनसांग सदर-II ( Tuensang Sadar-II seat ) ही जागा जिंकली आहे. 

मागील निकाल कसा होता?

नागालँडमधील गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजेच, 2018 च्या निवडणुकीत NPF ने 26 जागा जिंकल्या होत्या. एनडीपीपीला 17 जागा मिळाल्या होत्या. भाजपने 12 जागा जिंकल्या होत्या. बाकीच्या जागा इतरांनी जिंकल्या होत्या. काँग्रेसला मात्र गेल्या निवडणुकीत खातंही उघडता आलं नव्हतं. 2018 च्या निवडणुकीत त्रिपुरामध्ये भाजपने प्रथमच विजय मिळवला होता. 35 जागांवर भाजपने विजयाचा झेंडा फडकवला होता. सीपीएमच्या खात्यात 16 जागा आल्या होत्या. तर आयपीएफटीला 8 जागा मिळाल्या होत्या. तर त्रिपुरामध्ये काँग्रेसला मात्र खातंही उघडता आलं नव्हतं. 

नागालँडचं राजकीय समीकरण

नागालँडमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचं सरकार आहे आणि नेफियू रिओ हे मुख्यमंत्री आहेत. NDPP 2017 मध्ये अस्तित्वात आला. त्यानंतर एनडीपीपीने 18 तर भाजपने 12 जागा जिंकल्या होत्या. निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी युती केली होती. एनडीपीपी, भाजप, एनपीपी यांचा सरकारमध्ये समावेश आहे. गेल्या वर्षीच एनडीपीपी आणि भाजपने संयुक्त पत्रकार परिषदेत एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. एनडीपीपी 40 जागा आणि भाजप 20 जागांवर एकत्र लढणार असल्याचं दोन्ही पक्षांनी संयुक्त निवेदनात म्हटलं होतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, आवाजाचे नमुने
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 14 January 2025 06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 14 January 2025AI GirlFriend | आता मिळणार न सोडून जाणारी AI गर्लफ्रेंड, काय आहेत वैशिष्ट्ये? Special ReportNashik Accident | नाशिकमध्ये भीषण अपघात पाच जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, आवाजाचे नमुने
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Embed widget