Municipal Corporation Election Reservation 2022 : 14 महापालिकांच्या आरक्षणाची आज सोडत; कोणत्या प्रभागांत? कोणतं आरक्षण असेल?

Municipal Corporation Election Reservation 2022 : मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूरसह 14 महापालिकांसाठी आज आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. ही सोडत ओबीसी आरक्षणाशिवाय जाहीर होणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 31 May 2022 12:20 PM
Aurangabad Election Reservation 2022 : औरंगाबाद महानगरपालिका प्रभाग रचनाच नाही, त्यामुळे आजच्या आरक्षण सोडतमध्ये औरंगाबादचा समावेश नाही

Aurangabad Election Reservation 2022 : औरंगाबाद महानगरपालिका प्रभाग रचनाच अजून झाल्या नसल्याने आजच्या आरक्षण सोडतमध्ये औरंगाबाद नाही

Pune Election Reservation 2022 : पुणे महापालिका अनुसुचीत जाती महिला आरक्षित प्रभाग

पुणे महापालिका अनुसुचीत जाती महिला आरक्षित प्रभाग



  • प्रभाग 9 यरवडा

  • प्रभाग 3 - लोहगाव विमाननगर

  • प्रभाग 42 रामटेकडी सय्यदनगर

  • प्रभाग 47-कोंढवा बुद्रुक

  • प्रभाग 49 - मार्केटयार्ड महर्षीनगर

  • प्रभाग 46- महम्मदवाडी उरळी देवाची

  • प्रभाग 20 पुणे स्टेशन आंबेडकर रोड

  • प्रभाग 26 - वानवडी वैदुवाडी

  • प्रभाग - 21 कोरेगाव पार्क मुंढवा

  • प्रभाग 48 - अप्पर इंदिरानगर 
    प्रभाग- 10 शिवाजीनगर गावठाण - संगमवाडी

  • प्रभाग - 4 खराडी वाघाली


अनुसूचित जमाती 



  • प्रभाग 1 क्र. 1 ब महिला

  • प्रभाग 14 अ - एसटी खुला

Nagpur NMC Elections 2022 : सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आरक्षित प्रभाग

Nagpur NMC Elections 2022 : सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आरक्षित प्रभाग


इश्वर चिठ्ठीद्वारे सोडविण्यात आलेल्या महिला प्रभागांमध्ये प्रभाग 31मधून जागा क्र. ब, प्रभाग 22 मधून जागा क्र. ब, प्रभाग 23 मधून जागा क्र. ब, प्रभाग 40 मधून जागा क्र. ब, प्रभाग 32 मधून जागा क्र. ब, प्रभाग 49 मधून जागा क्र. ब, प्रभाग 29 मधून जाग क्र. ब, प्रभाग 35 मधून जागा क्र. ब, प्रभाग 17 मधून जागा क्र. ब, प्रभाग 17 मधून जागा क्र. ब, प्रभाग 48 मधून जाग क्र. ब, प्रभाग 6 मधून जागा क्र. ब, प्रभाग 2 मधून जागा क्र. ब या जागांचा समावेश आहे.

Nagpur NMC Elections 2022 : अनुसूचित जमाती महिला आरक्षणाच्या 6 जागा

Nagpur NMC Elections 2022 :  अनुसूचित जमाती महिला आरक्षणाच्या 6 जागा


अनुसूचित जामाती महिलांकरिता प्रभाग क्र 24 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 11 मधील जागा क्र.  अ, प्रभाग क्र. 37 मधील जागा क्र. ब, प्रभाग क्र. 12 मधील जागा क्र. ब, प्रभाग क्र. 4 मधील जागा क्र. ब आणि प्रभाग क्र. 51मधील जाग क्र. ब या जागांचा समावेश आहे.

Nagpur NMC Elections 2022 : महिलांकरिता आरक्षित प्रभाग जाहीर

Nagpur NMC Elections 2022 : अनुसूचित जाती महिलांकरिता जागा


6 जागांसाठी असलेल्या सोडतीत प्रभाग क्र 2 मधील जागा क्र अ, प्रभाग क्र. 10 मधील जागा क्र. क, प्रभाग क्र. 43 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 13 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र, 20 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 30 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र 27 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र 39 मधील जागा क्र. 16, प्रभाग क्र. 16 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 37 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 45 मधील जाग क्र. अ, प्रभाग क्र. 1 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 14 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 38 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 15 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 52 मधील जाग क्र. अ या 16 जागांचा समावेश आहे.

Kolhapur Municipal Corporation elections 2022 : प्रभाग आरक्षण सोडत आज, इच्छुकांचे देव पाण्यात

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत आज काढली जाणार आहे. आरक्षण सोडतीसाठी महापालिकेने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, जमाती,त्याचबरोबर सर्वसाधारण प्रभागातील महिलांसाठी आरक्षण काढले जाईल. या आरक्षणानंतर इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला आणखी वेग येईल.


कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महिलांना 50 टक्के आरक्षण असेल. मनपाची प्रभाग रचना त्रिसदस्यीय असून 92 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. प्रभाग रचना करताना लोकसंख्येचा विचार करण्यात आला आहे. दरम्यान, निश्चित करण्यात आलेल्या सर्व 31 प्रभागामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील 1 महिला आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्यानुसार 46 जागा महिलांसाठी राखीव असतील. 

Akola Election Reservation 2022 : अकोला महापालिकेचं प्रभागनिहाय आरक्षण जाहीर, नव्या आरक्षणामुळे दिग्गजांना फटका

Akola Election Reservation 2022 : अकोला महापालिकेचं प्रभागनिहाय आरक्षण जाहीर. नव्या आरक्षणामुळे दिग्गजांना फटका. अकोल्याच्या भाजप  महापौर अर्चना मसने, उपमहापौर राजेंद्र गिरी यांचे प्रभाग आरक्षित. भाजपचे सभागृहनेते राहूल देशमुखांचा प्रभाग महिलेसाठी राखीव. आरक्षणामूळे 25 वर विद्यमान नगरसेवकांना रहावे लागेल निवडणुक रिंगणाबाहेर. अकोला महापालिकेत एकू़ण 91 जागा. एकूण 46 जागा महिलांसाठी राखीव. 15 जागा अनुसुचित जाती तर दोन जागा अनसुचित जमातीसाठी राखीव. 

Nashik Election Reservation 2022  : नाशिक महापालिकेसाठी आरक्षण सोडत : सर्वसाधारण महिला आरक्षण 

Nashik Election Reservation 2022  : नाशिक महापालिकेसाठी आरक्षण सोडत : सर्वसाधारण महिला आरक्षण 
नाशिक मनपा निवडणुकीमध्ये सर्वसाधारण महिलांच्या १२ जागेसाठी सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये 5 ब, 10 ब, 16 ब, 18 ब, 21 ब, 30 ब, 31 ब , 32 ब, 33 ब, 36 ब, 37 ब या प्रभागांत सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. 


 

BMC Election Reservation 2022 : माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित

BMC Election Reservation 2022 : माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचा 117 क्रमांक वार्ड सर्वसाधारण महिला आरक्षित झालाय. माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा 96 प्रभाग देखील सर्वसाधारण महिला म्हणून आरक्षित. 

BMC Election 2022: अनुसुचित जाती महिलांसाठी आरक्षित प्रभाग जाहीर, हे वॉर्ड झाले आरक्षित

BMC Election Reservation 2022:  अनुसुचित जाती महिलांसाठी 139, 190,194, 165, 107, 85, 119, 204 हे प्रभाग राखीव

Nashik Election Reservation 2022  : नाशिक महापालिकेसाठी आरक्षण सोडत : अनुसूचित जमाती महिला 

Nashik Election Reservation 2022  : नाशिक महापालिकेसाठी आरक्षण सोडत : अनुसूचित जमाती महिला                     


अनुसूचित जमाती महिलांसाठी एकूण पाच जागा असून 7 ब अनुसूचित जमाती 11 ब अनुसूचीत जमाती थेट आरक्षित राखीव असतील. तर 02 अ, 04 अ, 34 ब या जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. 

NMC Election Reservation 2022  : नागपूर महापालिकेसाठी आरक्षण सोडत

NMC Election Reservation 2022  : नागपूर महापालिकेसाठी आरक्षण सोडत


नागपूर महापालिकेची महिला व जाती आरक्षण सोडत सुरेश भट सभागृहात सुरू आहे. 


नागपूर मनपा मध्ये एकूण 52 प्रभाग आणि 156 सदस्य असणार आहे. 


त्यापैकी 31 जागा अनुसूचित जाती च्या राहतील. (त्यापैकी 16 महिला असतील)


12 अनुसूचित जमातीच्या राहतील (त्यापैकी 6 महिला राहतील)

NMC Election Reservation 2022  : नागपूर महापालिकेसाठी आरक्षण सोडत

NMC Election Reservation 2022  : नागपूर महापालिकेसाठी आरक्षण सोडत


नागपूर महापालिकेची महिला व जाती आरक्षण सोडत सुरेश भट सभागृहात सुरू आहे. 


नागपूर मनपा मध्ये एकूण 52 प्रभाग आणि 156 सदस्य असणार आहे. 


त्यापैकी 31 जागा अनुसूचित जाती च्या राहतील. (त्यापैकी 16 महिला असतील)


12 अनुसूचित जमातीच्या राहतील (त्यापैकी 6 महिला राहतील)

BMC Election 2022 : शिवसेना नगरसेवक अमेय घोले, काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित

BMC Election 2022 : शिवसेना नगरसेवक अमेय घोले, काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित.

Nashik Election Reservation 2022  : नाशिक महापालिकेसाठी आरक्षण सोडत : अनुसूचित जाती महिला

Nashik Election Reservation 2022  : नाशिक महापालिकेसाठी आरक्षण सोडत : अनुसूचित जाती महिला
नाशिक महापालिका महिला अनुसूचित जातीसाठी आरक्षण सोडत झाली असून यामध्ये दाह जागा देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक 12 अ, 14 अ, 22 अ, 25 अ, 26 अ, 34 अ, 35अ, 41 अ, 42 अ या प्रभागाचा समावेश आहे. 

BMC Election 2022: अनुसुचित जातीसाठी राखीव प्रभागाची सोडत जाहीर, हे प्रभाग झाले आरक्षित

मुंबई महापालिका निवडणूक 2022: अनुसुचित जातीसाठी राखीव प्रभाग असलेले प्रभाग : 60, 85, 107, 119, 139, 153, 157, 162, 165, 190, 194, 204, 208, 215 आणि 221 हे प्रभाग अनुसुचित जातीसाठी राखीव. 

Thane Election Reservation 2022  : ठाणे महापालिकेसाठी आरक्षण सोडत

Thane Election Reservation 2022  : ठाणे महापालिकेसाठी आरक्षण सोडत


15 लाख 18 हजार 762


( sc)अनुसूचित जाती लोकसंख्या :- 1 लाख 26 हजार - त्यांच्या साठी 142  जागा आरक्षित ठेवणार आहे तर महिलांसाठी 5 जागा असणार राखीव .



अनुसूचित जमाती  लोकसंख्या :-  42 हजार 698- यांना 3 प्रभाग राखीव 2 महिलांसाठी


एकूण नगरसेवक - 142
एकूण पॅनल - 44
3 च्या पॅनलचे प्रभाग - 46
4 च्या पॅनल चा प्रभाग - 1
एकूण प्रभाग - 47

Nashik Election Reservation 2022  : नाशिक महापालिकेसाठी आरक्षण सोडत

नाशिक महानगर पालिकेच्या एकूण १३३ जागांसाठी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर आज महिला आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. जवळपास ६७ प्रभागांमध्ये महिला आरक्षण असून प्रत्येक प्रभागांमध्ये अ ब क असे गट पडले आहेत.  तर ४४ या प्रभागामध्ये दोन पुरुष आणि दोन महिला आरक्षण आहे. 

BMC Election Reservation 2022 : माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आरक्षण सोडतीत दिलासा. त्यांचा प्रभाग सर्वसाधारण झालाय

BMC Election Reservation 2022 : माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आरक्षण सोडतीत दिलासा. त्यांचा प्रभाग क्रमांक 206 हा सर्वसाधारण झाला आहे.

BMC Election Reservation 2022  : मुंबई महापालिकेसाठी 53 प्रभाग आरक्षित

BMC Election Reservation 2022  : मुंबई महापालिकेसाठी आरक्षण सोडत


प्राधान्यक्रम - 1


सन 2007, 2017 आणि 2017 या कोणत्याही निवडणुकीत सर्वसाधारण महिलांकरीता आरक्षित न झालेले प्रभाग प्राधान्यक्रम -2 ने खालीलप्रमाणे एकूण 53 प्रभाग आरक्षित झालेले असून ते खालीलप्रमाणे


प्रभाग क्रमांक - 2, 10, 21, 22, 23, 25, 33, 34, 49, 53, 54, 57, 59, 61, 86, 90, 95, 98, 100, 108, 106, 109, 111, 118, 121, 122, 134, 148, 145, 150, 156, 159, 169, 170, 171, 172, 175, 178, 182, 184, 189, 101, 102, 201, 202, 205, 207, 212, 213, 218, 229, 230 आणि 236

Thane Election Reservation 2022  : ठाणे महापालिकेसाठी आरक्षण सोडत

Thane Election Reservation 2022 : ठाणे महापालिकेसाठी आरक्षण सोडत


ठाणे महानगरपालिकेच्या सन 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता आरक्षण सोडत ठाणे महापालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सुरू करण्यात आली आहे. 


ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभाग आरक्षित होणार असल्याने ओबीसीच्या जागी खुल्या प्रवर्गातील इच्छुकाला संधी मिळणार आहे. या निवडणुकीत 71 महिला तर 71 पुरुष उमेदवार असणार आहेत. 


46 प्रभाग हे तिनचे तर एक प्रभाग चार सदस्यांचा असणार आहे. 


142 पैकी 10 जागा आरक्षित ठेवल्या जाणार आहे. त्यापैकी 5 जागा या महिलांसाठी असतील

BMC Election Reservation 2022 : मुंबई महापालिकेसाठी आरक्षण सोडत

BMC Election Reservation 2022 : मुंबई महापालिकेसाठी आरक्षण सोडत


अनुसुचित जातीसाठी राखीव प्रभाग 60, 85,107, 119, 139, 153, 157, 162, 165, 190, 195, 204, 208, 215 आणि 221 हे प्रभाग अनुसुचित जाती साठी राखीव झाले आहेत. 


यापैकी 139, 190, 194, 165, 107, 85, 119, 204 हे प्रभाग अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव झाला आहे.


अनुसुचित जमाती साठी प्रभाग क्रमांक 55 आणि 124 हे दोन प्रभाग आरक्षित झाले आहेत यापैकी 124 हा अनुसुचित जमाती महिलांसाठी आरक्षित झाला आहे.

BMC Election Reservation 2022 : बेस्टचे माजी अध्यक्ष आशिष चेंबुरकर यांचे वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव

BMC Election Reservation 2022 : बेस्टचे माजी अध्यक्ष आशिष चेंबुरकर यांचे वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव

BMC Election Reservation 2022 : 2011 नुसार मुंबईतील लोकसंख्येची आकडेवारी

BMC Election Reservation 2022 : 2011 नुसार मुंबईतील लोकसंख्या



  • मुंबईत एकुण लोकसंख्या : 1 कोटी 24 लाख 42 हजार 373 एकूण सदस्य संख्या - 236

  • अनुसुचित जाती लोकसंख्या : 8 लाख 3 हजार 236

  • राखीव जागा : 15  महिला - 8

  • अनुसुचित जमाती लोकसंख्या : 1 लाख 29 हजार 653

  • राखीव जागा : 2 महिलांना 1

KDMC  Election Reservation 2022  : कल्याण डोंबिवली महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सुरू

KDMC  Election Reservation 2022  : कल्याण डोंबिवली महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सुरू. आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती(महिला), अनुसूचित जमाती(महिला) आणि सर्वसाधारण(महिला). 



  • एकूण प्रभाग : 44

  • एकूण जागा : 133 


133 जागापैकी 13 जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती 4 जागा आणि सर्वसाधारण करता 166 जागा. 


यापैकी महिलांना 50 टक्के आरक्षण असल्यानं एकूण जागा 67 आहेत. त्यातील 7 जागा या अनुसूचित जाती आणि 2 जागा अनुसूचित जमातीसाठी आणि सर्वसाधारण महिलांसाठी 58 जागा राखीव आहेत. 


 त्यामुळे केडीएमसीत दिग्गज नगरसेवकांना कोणते आपल्या प्रभागात आरक्षण पडते याची उत्सुकता लागली आहे.  

पार्श्वभूमी

Municipal Corporation Election Reservation 2022 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणाशिवायच पार पडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राज्यात महापालिका निवडणुकांचं (Municipal Corporation Election 2022) बिगुल वाजलं आहे. अशातच आज राज्यातील 14 महापालिकांची (Municipal Corporation) आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. या 14 महापालिकांपैरी मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), कल्याण डोंबिवली, पुणे (Pune), नागपूर (Nagpur) आणि कोल्हापूरच्या (Kolhapur) सोडतीकडे विशेष लक्ष असणार आहे. अशातच इच्छुक उमेदवारांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. 


मुंबईसह 14 महापालिकांच्या प्रभागांची आरक्षण सोडत आज ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) होणार आहे. नगरसेवक होण्याचं स्वप्न बघणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण डोंबिवलीसह 14 महापालिकांची आरक्षण सोडत आज मुंबईत वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडणार आहे. या सोडतीवर सर्व पक्षांतील इच्छुक, संभाव्य उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीत कोणत्या प्रभागांत? कोणतं आरक्षण असेल? याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. सर्वच पक्षांतील नेते, संभाव्य-इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. 


आज कोणकोणत्या महापालिकांची आरक्षण सोडत काढली जाणार? 


मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे या महापालिकांची आरक्षण सोडत आज जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे नगरसेवक होण्याचं स्वप्न बघणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. 


राज्यातील 14 महापालिकांचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मुंबईसह राज्यातील नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे या महापालिकांची मुदत संपली आहे. या महापालिकांची आरक्षण सोडत आज म्हणजेच, 31 मे रोजी जाहीर होणार आहे. त्यापूर्वी 27 मे रोजी यासंदर्भातील नोटीस प्रसिद्ध करण्यात येईल. आरक्षण सोडतीवरील आक्षेप आणि हरकतींवर विचार करुन अंतिम आरक्षण सोडत 13 जून रोजी शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ओबीसीं आरक्षणाशिवाय


राज्य निवडणुक आयोगानं आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकल्यात जमा झालं आहे. राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून जोपर्यंत राज्य सरकार ओबीसी जनगणनेची त्रिस्तरीय चाचणी पूर्ण करत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागास वर्ग (OBC) प्रवर्गासाठी प्रभाग राखीव ठेवता येत नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ओबीसींच्या आरक्षणाशिवाय होणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.