एक्स्प्लोर

Mumbai Graduate Constituency : मुंबईतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा निकाल आज; कशी होणार मतमोजणी?

Mumbai Vidhan Parishad: मुंबई पदवीधरमध्ये उद्धव सेनेचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात, तर कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसच्या रमेश किर यांच्यात सामना आहे.

Mumbai Vidhan Parishad Election : मुंबई : विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई (Mumbai News) शिक्षक आणि नाशिक शिक्षक (Teachers And Graduates Election) या चार मतदारसंघांसाठी 26 जून रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून नवी मुंबईतील कोकण भवन इथे मुंबई, कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी होईल.

मुंबई पदवीधरमध्ये उद्धव सेनेचे अनिल परब (Anil Parab) आणि भाजपचे किरण शेलार (Kiran Shelar) यांच्यात, तर कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसच्या रमेश किर यांच्यात सामना आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ज.मो. अभ्यंकर रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे संदिप गुळवे, महायुती शिंदें गटाचे किशोर दराडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महेंद्र भावसार आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या भवितव्याचा आज फैसला होईल. 

दरम्यान, लोकसभा निकालाच्या मतमोजणीचा ठाकरे गटानं धसका घेतला आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदानाच्या मतमोजणीवेळी चुकीचा प्रकार होऊ नये यासाठी ठाकरे गटाचे मोठं मोठे नेते मतमोजणी केंद्रावर पोहचले आहेत. 

मुंबई पदवीधर मतदारसंघ (Mumbai Graduate Constituency)

मुंबई पदवीधर मतदारसंघांमध्ये याआधी शिवसेना ठाकरे गटाचे विलास पोतनीस हे आमदार होते. आता मुंबई पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, महायुतीकडून किरण शेलार रिंगणात उतरले आहेत. 

मुंबई शिक्षक मतदारसंघ (Mumbai Teachers Constituency)

मुंबई शिक्षक मतदारसंघात या आधी शिक्षक भारतीचे कपिल पाटील हे आमदार होते. आता शिक्षक भारती कडून कपिल पाटील हे निवडणूक लढवणार नसून सुभाष मोरे यांना शिक्षक भारतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.  तर मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने ज. मो. अभ्यंकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. 

मुंबई शिक्षक मतदार संघामध्ये पाच उमेदवारांमध्ये लढत 

ज. मो. अभ्यंकर : शिवसेना ठाकरे गट 
शिवनाथ दराडे : भाजप 
सुभाष मोरे : शिक्षक भारती  
शिवाजी शेंडगे : शिवसेना शिंदे गट पुरस्कृत उमेदवार
शिवाजी नलावडे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 

कशी पार पडते निवडणूक प्रक्रिया? (How Is The Vidhan Parishad Election Process?)

विधानपरिषद निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. राज्यसभेत खुलं मतदान असल्यानं पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागतं. पण विधान परिषद आमदार गुप्त मतदान करतात, त्यामुळेच विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता असते. निवडणुकीसाठी जितके मतदार उभे असतील तेवढ्या उमेदवारांना पसंती क्रम देता येतो. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. विधान परिषद स्थायी सभागृह आहे. ते कधीही विसर्जित होत नाही. दर दोन वर्षांनी सभागृहाचे एकास तीन सदस्य निवृत्त होतात तेवढेच नव्यानं निवडतात.

विधानसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेत थेट निवडणूक प्रकिया होत नाही. राष्ट्रपती निवडणूक, सिनेट यासारख्या निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या पसंतीक्रमाची पद्धत इथं वापरली जाते. संबंधित मतदारसंघाची मतदारसंख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतो. निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकांची मतं मिळवणारा उमेदवार हा विजयी होतो. पहिल्या पसंतीची मतं कोट्याएवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मतं जो पूर्ण करील तो उमेदवार विजयी घोषित केला जातो. 

लोकसभा निकालाच्या मतमोजणीचा ठाकरेंना धसका

लोकसभा निकालाच्या मतमोजणीचा ठाकरे गटानं धसका घेतला आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदानाच्या मतमोजणीवेळी चुकीचा प्रकार होऊ नये यासाठी ठाकरे गटाचे मोठं मोठे नेते मतमोजणी केंद्रावर पोहचले आहेत. यामध्ये मुंबई पदवीधर मतदार संघाचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना आणि युवासेना सचिव वरून सरदेसाई, नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी मतमोजणी केंद्रावर पोहचले आहेत. 

लोकसभा निकालावेळी मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघात मतमोजणी वेळी फेरफार केल्याचा ठाकरे गटाने आरोप केला होता. यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला होता. शिक्षक आणि पदवीधर मतदानाच्या मतमोजणीवेळी चुकीचा प्रकार होऊ नये यासाठी ठाकरे गटाचे मोठं मोठे नेते मतमोजणी केंद्रावर पोहचले आहेत. यामध्ये मुंबई पदवीधर मतदार संघाचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना आणि युवासेना सचिव वरून सरदेसाई, नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी मतमोजणी केंद्रावर पोहचले आहेत. दरम्यान, लोकसभा निकालावेळी मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघात मतमोजणी वेळी फेरफार केल्याचा ठाकरे गटाने आरोप केला होता. यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025Satish Bhosale Family : अटकेनंतर सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाची पहिली प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 14 March 2025Sushma Andhare on Holi | देवाभाऊ, देवतारी त्याला कोण मारी, अंधारेंकडून फडणवीसांना अनोख्या शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget