एक्स्प्लोर
Advertisement
'...तेव्हा बलात्काराच्या घटनांचं राजकरण करून तुम्ही का मतं मागत होतात?', राज ठाकरेंचा मोदींना सवाल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा होती. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरे सध्या राज्यात विविध ठिकाणी सभा घेत आहेत.
पुणे : 'बलात्कारासारख्या दुर्दैवी घटनांचं राजकारण करु नये असं सांगणारे मोदी भाजप सरकार सत्तेत येण्यापुर्वी अशा घटनांच राजकारण करुन मतं मागत होते', असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. ते पुण्यातील सभेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरे सध्या राज्यात विविध ठिकाणी सभा घेत आहेत. नांदेड, सोलापूर, इचलकरंजी येथील सभांनंतर आज राज ठाकरे पुण्यातील खडकवासला परिसरात सभा घेतली.
यावेळी बोलताना राज ठाकरेंनी देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांवरुन सरकारवर टीका केली. "पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस सरकारच्या काळात देशातील बलात्काराच्या दुर्दैवी घटनांचं राजकारण करायचे मात्र तेच मोदी सत्तेत आल्यावर अशा घटनांच राजकारण करु नये असं म्हणतात. मग भाजप सरकार सत्तेत येण्याच्या आधी निर्भयाच्या बाबतीत जी दुर्दैवी घटना घडली, अशा घटनांचं राजकरण करून तुम्ही का मतं मागत होतात?" असा सवाल राज यांनी केला.
यावेळी राज ठाकरेंनी भाजप सरकार सत्तेत आल्यानंतरचे देशातील बलात्काराच्या घटनांचे आकडे सगळ्यांसमोर मांडले. 2012 साली बलात्काराच्या 24922 घटना होत्या तर 2016 ला हा आकडा 38811 पर्यंत गेल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच 2017-18 मध्ये किती बलात्कार झाले याची माहिती सरकारने दाबून टाकली असल्याचा आरोपही राज यांनी केला.
काय म्हणाले राज ठाकरे ?
- पुण्यात आल्यानंतर माझ्या रमेश वांजळे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, माझा वाघ गेला.
- माझ्या महाराष्ट्रातील भाषणातील क्लिप्स देशभर फिरत आहेत. मला उत्तर भारतात सभा घ्यायलाही विचारत आहेत.
- विकास झाल्यावर शहरं टुमदार होतात, पण आमची शहरं बकाल होत आहेत.
- शहरं छान राहावीत म्हणून धोरण आखायचं असतं आणि हे धोरण ठरवणारे लोकप्रतिनिधी असतात त्यांना निवडून देण्यासाठी ही निवडणूक आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आता जातीवर बोलू लागले आहेत. माझा मोदींना प्रश्न आहे की, गेल्या 5 वर्षात दलित बांधवांवर जो अत्याचार झाला, त्यावर का बोलला नाहीत?
- जर बीफ निर्यात करणारे तुमचे मित्र असू शकतात तर मग गो-हत्येच्या नावावर ५०, ६० लोकं मारले गेले तेंव्हा तुम्ही का गप्प बसलात?
- मोदी सरकारच्या काळात अमित शहाचा मुलगा सोडून ईतर कोणत्या बाबतीत बदल झाला?
- मोदी सत्तेत नसताना बलात्कारावरून राजकारण करायचे. आता मात्र त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या बलात्कारांची जबाबदारी झटकतायत.
- २०१७ -२०१८ मध्ये किती बलात्कार झाले याची माहिती सरकारने दाबून टाकलीय.
- देश पाण्यासाठी तडफडतोय आणि मोदी पुतळ्यांवर तीन तीन - चार चार हजार कोटी रुपये खर्च करतायंत. या देशाला पुतळ्यांची गरज आहे का?
- चीनी वस्तूंवर बंदी घाला असं वातावरण निर्माण केलं, पण सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा कुठून बनवून आणला?
- मोदी सरकारच्या काळात अनेक कंपन्या बंद पडल्या. कालच जेट एअरवेजमधे काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी गेली.
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर ह्या सरकारच्या दबावाला कंटाळून राजीनामे देऊन निघून गेले. असं भारताच्या इतिहासात आजपर्यंत कधी घडलं नाही.
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा अट्टहास का?
- 'बिझनेससाठी अहमदाबादलाच जावं लागतं. पुण्यात जायचं असेल तर फक्त शिक्षणासाठी', असं मोदींचं मत असेल तर गुजराती बांधव गुजरात सोडून महाराष्ट्रात का येतात? हे त्यांनी सांगावं
- एवढ्या देशांचे राष्ट्रप्रमुख भारतात आले पण मोदी सगळ्यांना फक्त गुजरातला घेऊन गेले. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू कुठेच त्यांना नेलं नाही.
- जगातलं सगळ्यात आलिशान असं राजकीय पक्षाचं कार्यालय भाजपने दिल्लीत सत्तेत आल्यावर उभारलं, त्यासाठी पैसे कुठून आणले?
- विजय मल्ल्या पैसे द्यायला तयार होता. पण त्याला पळून जायला लावलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement