एक्स्प्लोर
Advertisement
तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात, 53 लाखांची रोकड हस्तगत
या कारवाईत चार वर्ष अटकेत असलेला आमदार रमेश कदम घटनास्थळी सापडल्याने बऱ्याच चर्चानां उधाण आलं आहे. या प्रकरणावरुन तुरुंगात असलेल्या रमेश कदम याला खासगी ठिकाणी पोलीस घेऊन जाऊच कशी शकते असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
ठाणे : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील एका इमारतीतून लाखो रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे कारवाई कराताना पोलिसांना घटनास्थळी अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी तुरुंगात असलेले रमेश कदम देखील सापडले. ठाणे गुन्हे शाखा युनिट एक आणि निवडणूक विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली.
या कारवाईच्या प्राथमिक चौकाशीत, रमेश कदम यांना जेजे रुग्णालयात तपासणीसाठी ठाणे कारागृहातून नेण्यात आले असल्याचे समजले. मात्र तपासणी झाल्यावर पुन्हा तुरुंगात नेण्याऐवजी पोलीस इस्कॉर्ट पार्टी अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्याला ओळखीच्या एका माणसाच्या घरी नेले. त्याच वेळी गुन्हेशाखेच्या पोलिसांनी तिकडे धाड टाकली. त्यामुळे रोख रक्कमेसह रमेश कदम आणि एक व्यक्ती पोलिसांना सापडले.
Ramesh Kadam | जामीनावर सुटलेल्या आमदाराचं मतदारसंघात जंगी स्वागत, 500 किलोचा हार घालणार
रमेश कदम सध्या मोहोळ इथून अपक्ष निवडणूक देखील लढवत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने ही रक्कम जप्त करुन आयकर विभागाकडे सोपवली आहे. तर रमेश कदम यांना नियमाबाहेर जाऊन खासगी ठिकाणी नेल्याप्रकरणी पोलीस इस्कॉर्ट पार्टी मधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
या कारवाईत चार वर्ष अटकेत असलेला आमदार रमेश कदम घटनास्थळी सापडल्याने बऱ्याच चर्चानां उधाण आलं आहे. या प्रकरणावरुन तुरुंगात असलेल्या रमेश कदम यांमा खासगी ठिकाणी पोलीस घेऊन जाऊच कशी शकते असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
VIDEO | काय आहे अण्णाभाऊ साठे महामंडळाचा महाघोटाळा?
दरम्यान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना बोगस लाभार्थी दाखवून रमेश कदमांनी शेकडो कोटींचा घोटाळा केला आहे. याप्रकरणी रमेश कदमांसह एकूण 12 जणांना अटक केली आहे. याच घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना पक्षातून निलंबित केलं आहे. डिसेंबर 2018 मध्ये कारागृहातील असभ्य वर्तन आणि संबंधित खटल्यातील साक्षीदारांचं संरक्षण या मुद्यांवर मुंबई उच्च न्यायालयानं आमदार रमेश कदम यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. मात्र याप्रकरणी पोलीस तपासांत जाणून बुजून दिरंगाई करत असल्याचा आरोप कदमांच्या वतीने करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement