Mankhurd Shivaji Nagar Vidhan Sabha Constituency: मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अबू आझमी की नवाब मलिक, कोण मारणार बाजी?
Mankhurd Shivaji Nagar Vidhan Sabha Constituency:
Mankhurd Shivaji Nagar Vidhan Sabha Constituency मुंबई: मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक यांना तिकीट देण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून सुरेश (बुलेट) पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे विद्यामान आमदार अबू आझमी यांनी विजय मिळवला होता.
मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवाब मलिक तर सपाचे अबू आझमी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे बुलेट पाटील हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बुलेट पाटील हे या विभागातून नगरसेवक होते. पोलीस खात्यात आणि मुख्यत्वे क्राईम ब्रॅंचमध्ये काम करताना त्यांची ओळख एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी पडली होती.
2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय घडलेलं?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत अबू आझमी यांना 69,036 मते मिळाली होती. तर 2014 च्या निवडणुकीत अबू आझमी यांना 41,072 मते मिळाली होती.