Anushakti Nagar Vidhan Sabha constituency: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत, अणुशक्ती नगरमधून फहाद अहमद की सना मलिक; कोण मारणार बाजी?
Anushakti Nagar Vidhan Sabha constituency: अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून फहाद अहमद विरुद्ध सना मलिक अशी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत होणार आहे.
Anushakti Nagar Vidhan Sabha constituency: मुंबईतील महत्त्वाच्या लढतींपैकी एक मानली जाणारी अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाची (Anushakti Nagar Vidhan Sabha constituency) लढत ही यंदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी होत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक या रिंगणात उतरल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अभिनेत्री स्वरा भास्करचा नवरा फहाद अहमद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अणुशक्तीनगरची ही लढत चुरशीची होणार असल्याचं चित्र आहे.
2019 च्या निवडणुकांचं चित्र
नवाब मलिक यांनी 2019 साली अणुशक्तिनगर या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी या जागेवरून शिवसेनेचे (संयुक्त) उमेदवार तुकाराम काटे यांना पराभूत केलं होतं. मलिक यांना 65217 तर काटे यांना 52466 मतं मिलाली होती. या दोघांनाही मिळालेल्या मतांची टक्केवारी अनुक्रमे 46.8 आणि 37.7 टक्के एवढी होती. 2009 सालच्या निवडणुकीतही नवाब मलिक यांनी याच जागेवरून निवडणूक लढवत विजय संपादन केला होता. आता मात्र कन्येसाठी ते हा मतदारसंघ सोडण्याची शक्यता आहे. सना मलिक या अणुशक्तिनगर येथून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर नवाब मलिक हे शिवाजीनगर-मानखुर्दमधून येथून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.