Manipur Election : काँग्रेसचा भर केवळ राज्य लुटण्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निशाणा
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मणिपूरच्या मतदारांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा लगावला.
Manipur Election 2022 : मणिपूर विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून, आता दुसऱ्या टप्प्यासाठी 5 मार्चला मतदान होणार आहे. त्यासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मणिपूरच्या मतदारांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा लगावला. काँग्रेसचा भर हा केवळ राज्य लुटण्यावर असल्याचा आरोप यावेळी मोदींनी केला.
काँग्रेस राज्याची लूट करण्यात इतकी गुंतली आहे, की त्यांना लोकांसाठी काम करायला वेळ नाही. मणिपूरच्या जनतेत राहून विकासकामे करण्यावर भाजप नेत्यांचा भर असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. काँग्रेस पक्षाने मणिपूरच्या विकासासाठी काम केले नाही. त्यांनी फुटीरतावादाला प्रोत्साहन दिले. मणिपूरच्या जनतेने याची जाणीव ठेवली पाहिजे. भाजप ईशान्येकडील विशेषतः मणिपूरच्या विकासासाठी काम करत आहे. काँग्रेसची फूट पाडा आणि राज्य करा ही योजना भाजप उद्ध्वस्त करेल असेही मोदी यावेळी म्हणाले.
मणिपूरमध्ये एम्स स्थापन करण्याची योजना
आम्ही मणिपूरमध्ये एम्स बांधण्याची योजना आखत आहोत. हीच वेळ स्वावलंबी भारताची आहे. हे दशक विकास आणि प्रगतीचे दशक आहे. आज मणिपूर वेगाने वाटचाल करत आहे. मणिपूरमध्ये क्रिडा विकासासाठी आम्ही राज्यात क्रीडा विद्यापीठही उभारणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. मणिपूरची ओळख आता कौशल्य, स्टार्टअप आणि खेळ यातून होत आहे. भविष्यात आमचे सरकार 100 कोटी रुपयांचा स्टार्ट-अप फंड तयार करण्यास तयार असल्याचेही यावेळी मोदींनी सांगितले.
राज्यात रेल्वे सेवा सुरु करण्याचे काम भाजपने केलं
स्वातंत्र्यानंतरही मणिपूर राज्यात पहिल्या ट्रेनची वाट पाहत होता. मात्र, भाजपने राज्यात रेल्वे सेवा सुरू करण्याचे काम केले. मणिपूरला भारताच्या रेल्वे नेटवर्कशी जोडले. नवीन रेल्वे मार्ग देखील बांधले जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: