एक्स्प्लोर

Mamata Banerjee : सत्तेसोबत आमदारकीही गेली, ममता बॅनर्जींचा भवानीपुरातून मोठा पराभव, पश्चिम बंगालमध्ये उलटफेर

Mamata Banerjee Lost Bhowanipore : पश्चिम बंगालमध्ये तब्बल 208 जागांवर विजय मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून तृणमूल काँग्रेसला केवळ 79 जागा मिळाल्या आहेत. 

West Bengal Election Result : एकीकडे भाजपने पश्चिम बंगालमध्ये जोरदार मुसंडी मारत तृणमूल काँग्रेसचा गड उद्ध्वस्त केला. त्याचवेळी दुसरीकडे ममता बॅनर्जींनाही मोठा धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी यांची सत्तेसोबत आमदारकीही गेली आहे. भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा मोठा पराभव झाला आहे. भाजपच्या शुभेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा 15,111 मतांनी पराभव केला. 

ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्यानंतर भाजपमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शुभेंदु अधिकारी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पेढे वाटून आनंद साजरा केला. ममता बॅनर्जींचा पराभव होणं गरजेचं होतं. हा विजय बंगालच्या एकजुटीचा असल्याची प्रतिक्रिया शुभेंदु अधिकारी यांनी दिली. 

भाजपचे नेते आणि पश्चिम बंगालच्या विजयाचे शिल्पकार शुभेंदु अधिकारी यांनी नंदीग्राम आणि भवानीपूर अशा दोन ठिकाणी विजय प्राप्त केला आहे. भवानीपूरमधून त्यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. सुरुवातीपासून अटीतटीची लढाई सुरू असलेल्या भवानीपूरमध्ये अखेर ममता बॅनर्जींचा 15,111 मतांनी पराभव झाला. 

भाजपवर आरोप

दरम्यान, भवानीपूरमध्ये मतमोजणीवेळी मोठा गोंधळ झाल्याचं दिसून आलं. मतमोजणी सुरू असताना ममता बॅनर्जींना केंदावर सोडण्यात आलं नसल्याचा आरोप करण्यात आला. आपल्याला सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केली, लाथ मारली असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. तसेच आपल्या पोलिंग एजंटलाही आत सोडण्यात आलं नाही असाही आरोप त्यांनी केला. 

भाजपने 100 हून अधिक जागा लुटल्या. निवडणूक आयोग निष्पक्ष नाही, हा नैतिक विजय नाही, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली. त्यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांवरही अप्रत्यक्ष निशाणा साधत निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला.

भाजपच्या मुख्यालयात जल्लोष

पश्चिम बंगालच्या ऐतिहासिक विजयानंतर नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, जे.पी.नड्डा यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

पश्चिम बंगालमध्ये आता भयमुक्त झालं आणि विकासयुक्त सरकार सत्तेत आलं असं मोदी यावेळी म्हणाले. सोबतच केरळ, तामिळनाडूत विभाजनवादी सरकार सत्तेबाहेर गेल्यानं नवा सूर्योदय झाल्याची भावनाही मोदींनी यावेळी व्यक्त केली.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget