एक्स्प्लोर

लढाई संपल्यावर फडणवीसांनी वैर बाजूला ठेवलं, शरद पवारांना फोन करुन शपथविधीचं निमंत्रण, पण....

मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन कॉल केला आहे. शरद पवार यांना शपथविधीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

मुंबई : भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी साडे पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा होईल. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीही शपथ घेतील. फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. आझाद मैदानावर जमा होणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेता या परिसरात एकूण 1500 पोलिसांची फौज तैनात करण्यात येणार आहे. दरम्यान, शपथविधीच्या या कार्यक्रमाल अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये खासदार शरद पवार यांचादेखील समावेश आहे. त्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन केला आहे. 

देवेंद्र फडणवीसांकडून शरद पवारांना फोन

मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी आज शरद पवार यांना फोन करून शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. मात्र सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. त्यामुळे शरद पवार यांना शपथविधीच्या कार्यक्रमला येता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली होती. फडणवीस यांचा भाजपा हा पक्ष महायुतीमध्ये आहे तर शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीचा सदस्य आहे. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. हा विरोध निवडणुकीदरम्यान प्रखरतेने दिसला होता. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या पक्षांवर सडकून टीका केली होती. मात्र आता निवडणूक संपली आहे. त्यामुळे राजकीय वैर बाजूला ठेवून फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन कॉल करून शपथविधीच्या कार्यक्रमाला निमंत्रित केले आहे. त्यांच्या या भूमिकेचे राजकीय वर्तुळातून स्वागत केले जात आहे. 

उद्धव ठाकरे यांनाही आमंत्रण

राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनादेखील आजच्या शपथविधी कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांनादेखील या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. 

शपथविधी कार्यक्रमाची जोरदार तयारी

दरम्यान, आज संध्याकाळी साडे पाच वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. याच कार्यक्रमात अजित पवार हेदेखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत अस्पष्टता होती. मात्र आता शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची तयारी दाखवल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे तेदेखील याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या शपथविधीच्या कार्यक्रमामुळे भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात उत्साह संचारला आहे. संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील येणार आहेत. त्यामुळे त्यांच्याही स्वागताचे बॅनर्स लागले आहेत. त्यामुळे आता शपथविधीच्या कार्यक्रमात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

Devendra Fadnavis-Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!

Devendra Fadnavis : एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?

Devendra Fadnavis Oath Ceremony LIVE Updates : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार यांना फोन 

महत्त्वाच्या बातम्या

Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget