एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sangola Vidhansabha Result : शहाजीबापू पाटलांना धक्का बसणार? सांगोल्यातून बाबासाहेब देशमुख आघाडीवर

सांगोला विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटाचे दीपक साळुंखे तसेच शेकापचे बाबासाहेब देशमुख मैदानात आहेत.

Sangola Vidhansabha Election result 2024 : सांगोला विधानसभा (Sangola Vidhansabha) मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण या मतदारसंघातून काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल या त्यांच्या वाक्यानं प्रसिद्ध असणारे शिवसेना शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे दीपक साळुंखे पाटील (Deepak Aaba Salunkhe patil) तर शेकपकडून बाबासाहेब देशमुख (Babasaheb Deshmukh) हे मैदानात आहेत. अत्यंत चुरशीची लढत होत असून, राज्यातील सर्वात मोठ्या काही लढतींपैकी सांगोला विधानसभा मतदारसंघाची ही एक लढत मानी जात आहे. सुरुवातीचे काही कल हाती आले आहेत. यामध्ये शेकापचे बाबासाहेब पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.  

शहाजीबापू पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई 

राज्यात यंदा महायुती व महाविकास आघाडी उदयास आल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वेगळीच रंगत असून जोरदार चुरसही पाहायला मिळणार आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शहाजी बापू पाटील  मैदानात आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून दीपक साळुंखे पाटील मैदानात आहेत. तर शेकापकडून अनिकेत देशमुख मैदानात आहेत. सांगोला मतदारसंघ हा पारंपरिक शेतकरी कामगार पक्षाचा राहिला आहे. येथील मतदारसंघात माजी आमदार आणि दिवंगत शेकाप नेते गणपत देशमुख यांनी तब्बल 11 वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा विक्रम केला आहे. मात्र, गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत येथील मतदारसंघातून शिवसेना युतीचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांना विजय मिळाला होता. शहाजी पाटील यांना 99,464 मतं मिळाली असून केवळ 768 मताधिक्यांनी ते आमदार बनले. पाटील यांनी शेकापच्या डॉ. अनिकेत देशमुख यांचा पराभव केला होता. अनिकेत देशमुख हे गणपत देशमुख यांचे नातू असून त्यांचा 2019 ला निसटता पराभव झाला होता. त्यामुळे, यंदाही विधानसभेच्या रणांगणात देशमुख कुटुंबीयांनी आपली ताकद लावली आहे. 

3 लाख 29 हजार  मतदार

सांगोला विधानसभा मदारसंघात एकूण 3 लाख 29 हजार 48 मतदारसंख्या आहेत. त्यापैकी, 1 लाख 70 हजार 690 पुरुष मतदार असून 1 लाख 58 हजार 353 स्त्री मतदार आहेत. मतदारसंघातील तृतीयपंथी मतदारांची संख्या 5 एवढी आहे. तसेच, मतदारसंघात एकूण 305 मतदान केंद्रांवर मतदानप्रक्रिया पार पडत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Sangola Vidhansabha : लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Eknath Shinde : हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
Maharashtra vidhansabha Results 2024 देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
Mahad Assembly Election results : ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
Embed widget