Maharashtra Vidhan Sabha Election 2024: देशाचं आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईतील 36 मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचं मतदान अन् निकाल कधी?
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: संपूर्ण महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान, तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Elections 2024) मतदान होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान, तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
राज्यभरात विधानसभेसाठी (Maharashtra Vidhan Sabha Elections 2024) एकाच टप्प्यात मतदान होणार असल्यामुळे मुंबई आणि मुंबई उपनगरात देखील 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. मुंबईतील 36 विधानसभा मतदार संघासाठी 20 नोव्हेंबरला मतदान होईल. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.
Maharashtra to vote in a single phase on 20th November. Counting of votes on 23rd November.#MaharashtraElection2024 pic.twitter.com/U48nySwK41
— ANI (@ANI) October 15, 2024
महाराष्ट्र विधानसभेचं संपूर्ण वेळापत्रक-
अर्ज भरण्याची तारीख - 29 ऑक्टोबर
अर्ज माघार घेण्याची तारीख - 4 नोव्हेंबर
मतदानाची तारीख - 20 नोव्हेंबर
मतमोजणीची तारीख - 23 नोव्हेंबर
288 जागांसाठी किती मतदार असतील?
एकूण मतदार - 9 कोटी 59 लाख
नव मतदार - 19.48 लाख
पुरूष मतदार - 4.95 कोटी
महिला मतदार - 4.64 कोटी
तृतीयपंथी मतदार - 56 हजारांहून जास्त
85 वर्षावरील मतदार - 12. 48 लाख
शंभरी ओलांडलेले मतदार - 49 हजारांहून जास्त
दिव्यांग मतदार - 6.32 लाख
मुंबईतील 36 आमदारांची संपूर्ण यादी-
1. बोरीवली विधानसभा : सुनिल राणे (भाजप)
2. दहिसर विधानसभा : मनिषा चौधरी (भाजप)
3. मागाठणे विधानसभा : प्रकाश सुर्वे (शिवसेना - एकनाथ शिंदे)
4. मुलुंड विधानसभा : मिहीर कोटेचा (भाजप)
5. विक्रोळी विधानसभा : सुनील राऊत (शिवसेना - उद्धव ठाकरे)
6. भांडुप पश्चिम विधानसभा : रमेश कोरगावकर (शिवसेना - उद्धव ठाकरे)
7. जोगेश्वरी पूर्व विधानसभा : रविंद्र वायकर (शिवसेना - एकनाथ शिंदे) : सध्या लोकसभेवर निवड
8. दिंडोशी विधानसभा : सुनील प्रभू (शिवसेना - उद्धव ठाकरे)
9. कांदिवली पूर्व विधानसभा : अतुल भातखळकर (भाजप)
10. चारकोप विधानसभा : योगेश सागर (भाजप)
11. मालाड पश्चिम विधानसभा : अस्लम शेख (काँग्रेस)
12. गोरेगाव विधानसभा : विद्या ठाकूर (भाजप)
13. वर्सोवा विधानसभा : भारती लवेकर (भाजप)
14. अंधेरी पश्चिम विधानसभा : अमित साटम (भाजप)
15. अंधेरी पूर्व विधानसभा : ऋतुजा लटके (शिवसेना - उद्धव ठाकरे)
16. विलेपार्ले विधानसभा : पराग अळवणी (भाजप)
17. चांदिवली विधानसभा : दिलीप लांडे (शिवसेना : एकनाथ शिंदे)
18. घाटकोपर पश्चिम विधानसभा : राम कदम (भाजप)
19. घाटकोपर पूर्व विधानसभा : पराग शाह (भाजप)
20. मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा : अबू आझमी (समाजवादी पक्ष)
21. अणूशक्तिनगर विधानसभा : नवाब मलिक (राष्ट्रवादी अजित पवार)
22. चेंबुर विधानसभा : प्रकाश फातर्पेकर (शिवसेना : उद्धव ठाकरे)
23. कुर्ला विधानसभा : मंगेश कुडाळकर (शिवसेना : एकनाथ शिंदे)
24. कलिना विधानसभा : संजय पोतनीस (शिवसेना : उद्धव ठाकरे)
25. वांद्रे पूर्व विधानसभा : झिशान सिद्दीकी (काँग्रेस)
26. वांद्रे पश्चिम विधानसभा : आशिष शेलार (भाजप)
27. धारावी विधानसभा : वर्षा गायकवाड (काँग्रेस) : सध्या लोकसभेवर निवड
28. सायन कोळीवाडा विधानसभा : कॅप्टन तमिळ सेल्वन (भाजप)
29. वडाळा विधानसभा : कालिदास कोळंबकर (भाजप)
30. माहिम विधानसभा : सदा सरवणकर (शिवसेना : एकनाथ शिंदे)
31. वरळी विधानसभा : आदित्य ठाकरे (शिवसेना : उद्धव ठाकरे)
32. शिवडी विधानसभा : अजय चौधरी (शिवसेना : उद्धव ठाकरे)
33. भायखळा विधानसभा : यामिनी जाधव (शिवसेना : एकनाथ शिंदे)
34. मलबार हिल विधानसभा : मंगल प्रभात लोढा (भाजप)
35. मुंबादेवी विधानसभा : अमीन पटेल (काँग्रेस)
36. कुलाबा विधानसभा : राहुल नार्वेकर (भाजप)