एक्स्प्लोर

मराठवाड्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार, पहिली जाहीर सभा हिंगोलीत होणार 

राज ठाकरे (Raj Thackeray) मराठवाड्यातील हिंगोलीमध्ये (Hingoli) त्यांच्या प्रचाराची पहिली सभा घेणार आहेत. हिंगोली विधानसभेचे मनसेचे उमेदवार बंडू कुटे यांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत.

Hingoli Raj Thackeray Rally : विधानसभा निवडणुकांच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सुरुवातीपासूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कंबर कसली होती. आता महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अगोदरच राज ठाकरे (Raj Thackeray) मराठवाड्यातील हिंगोलीमध्ये (Hingoli) त्यांच्या प्रचाराची पहिली सभा घेणार आहेत. हिंगोली विधानसभेचे मनसेचे उमेदवार बंडू कुटे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे 5 नोव्हेंबरला हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौकामध्ये राज ठाकरे यांची सभा होणार आहे.

राज ठाकरेंची पहिली सभा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात होणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्यातील विविध मतदारसंघामध्ये जाहीर सभा घेणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची महाराष्ट्रातील पहिली सभा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात होणार आहे. मनसेचे विद्यमंान आमदार राजू पाटील यांच्यासाठी ही पहिली सभा राज ठाकरे घेणार आहेत. 

मनसेचा 'एकला चलो रे'चा नारा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले असून राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सामना रंगणार आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) विधानसभा निवडणुकीत 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. 

माहिममधून अमित ठाकरे मैदानात 

माहिम विधानसभा मतदारसंघातून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत निवडणूक लढवत आहेत. अशातच  सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठामच आहेत. कोणत्याही परिस्थितीत मी निवडणूक लढवणार असल्याची भूमिका सदा सरवणकरांनी घेतली आहे. त्यामुळं या मतदारसंघात चुरशीची तिरंगी लढत होणार आहे. 

विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच पेटल्यांच चित्र पाहायला मिळत आहे. ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षातील इच्छुकांनी तिकीट न मिळाल्यामुळं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये अनेकांनी बंडखोरी करण्याचा निर्णय देखील जाहीर केला आहे. ही बंडखोरी महाविकास आघाडीसह महायुतीत देखील आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असा निर्णय अनेक नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळं नेत्यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख होती. तर 4 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे. त्यामुळं कोणते उमेदवार निवडणूक लढवणार आणि कोणते उमेदवार निवडणूक लढवणार नाहीत, हे सगळं चित्र येत्या 4 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. त्यामुळं कोण कोणाविरुद्ध लढणार हे आपल्याला 4 नोव्हेंबरलाच समजणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

माहीममध्ये राज ठाकरेंचं टेन्शन वाढणार? माघार न घेण्याचे शिंदेंचेही संकेत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Embed widget