लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ चिटर, मनसेला हरवण्यासाठी ठाकरे आणि शिंदेंची छुपी होती का? संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
मनसे किंग मेकर आहे हे 48 तासांनी कळेल असे मत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केले. मनसेला हरवण्यासाठी ठाकरे आणि शिंदेंची छुपी होती का? असा प्रश्न देखील उपस्थित होत असल्याचे देशपांडे म्हणाले.
Sandeep Deshpande : शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी मते मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर राज ठाकरेंच्या नावाने खोटं पत्र व्हायरलं केल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला आहे. या लाडक्या बहिणींचे हे लाडके भाऊ चिटर आहेत. त्यामुळं मिलिंद देवरा यांच्यावरही गुन्हा दाख व्हायला हवा असे देशपांडे म्हणाले. मनसे किंग मेकर आहे हे 48 तासांनी कळेल असेही ते म्हणाले. मनसेला हरवण्यासाठी ठाकरे आणि शिंदेंची छुपी होती का? असा प्रश्न देखील उपस्थित होत असल्याचे देशपांडे म्हणाले.
यावेळची निवडणूक मनसेसाठी अत्यंत महत्वाची
यावेळची निवडणूक मनसेसाठी अत्यंत महत्वाची आणि तितक्याच त्वेशाने लढवली आहे. मतदानासाठी उदासिनता का? हे सर्व राजकिय पक्षांना समजायला हवं, लोकांनी स्थानिक प्रश्नांना अनुसरुन मतं दिलेली आहेत असेही देशपांडे म्हणाले. वाढलेल्या मतांचा फायदा भाजपलाच का? मनसेलाही होऊ शकतो असेही संदीप देशपांडे म्हणाले. शिंदे साहेबांचा प्रचंड दबाव होता, निवडणूक अधिकाऱ्यांचे निरीक्षकांनी सांगितल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याचे देशपांडे म्हणाले.
वरळी विधानसभा मतदारसंघाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष
वरळी विधानसभा मतदारसंघाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुत्र युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. तसेच मनसेचे संदीप देशपांजडे हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून अमोल आनंद निकाळजे हे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात चौरंगी लढत होत असली तरी खरा सामना हा आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवर यांच्यातच असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या जागेकडे विशेष लक्ष दिलं आहे. मात्र, या मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणारे हे आपल्याला येत्या 23 नोव्हेंबरलाच समजणार आहे.
महत्वाच्या बातम्या: