एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Voting : नागपूरमध्ये EVM मशीन घेऊन जाणाऱ्या कारवर हल्ला; निवडणूक प्रक्रियेचं उल्लंघन केल्याचा जमावाचा आरोप

Maharashtra Vidhan Sabha Voting : मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील झोनल अधिकारी मतदान केंद्रातून नियमबाह्य पद्धतीने ईव्हीएम दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात आहे या संशयातून हल्ला करण्यात आला आहे.

Nagpur Vidhan Sabha Election 2024 : मध्य नागपूर (Nagpur) विधानसभा क्षेत्रातील झोनल अधिकारी मतदान केंद्रातून नियमबाह्य पद्धतीने ईव्हीएम दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात आहे या संशयातून अज्ञात आरोपींच्या एका मोठ्या जमावाने निवडणूक कामासाठी लावण्यात आलेल्या दोन तवेरा कार वर हल्ला करत त्याची जबर तोडफोड केली आहे. मध्य नागपूरमधील किल्ला परिसरात काल संध्याकाळी (20 नोव्हेंबर) साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

नेमकं काय घडलं?

मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किल्ला परिसरातील एका मतदान केंद्राच्या आवारातून एक तवेरा गाडी बाहेर पडली. त्यामध्ये निवडणूक प्रक्रियेतील झोनल अधिकारी काही ईव्हीएम घेऊन जात असतानाचे जमावाला दिसले. मतदान केंद्रातून ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे, त्याचे हे उल्लंघन होत आहे या संशयातून जमावातील काही लोकांनी त्या तवेरा कारचा पाठलाग केला. आणि काही अंतरावर ती तवेरा थांबवून त्याची जबर तोडफोड केली. त्याच वेळेस पाठीमागून इतर निवडणूक कर्मचाऱ्यांना घेऊन येणारी तवेरा घटनास्थळी पोहोचली आणि जमावातील काही लोकांनी त्याच्यावर ही दगडफेक केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही दक्ष नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, त्यामुळे वाद वाढत गेला. सूचना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचला आणि जमावाच्या तावडीतून शर्थीचे प्रयत्न करून निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली.

भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे आरोप-प्रत्यारोप 

या घटनेनंतर मोठ्या संख्येने भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते कोतवाली पोलीस स्टेशनच्या समोर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत गोळा झाले होते. भाजप कार्यकर्त्यांचा आरोप होता की काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी तवेरा कारवर नाही तर त्यातील ईव्हीएमवर (अतिरिक्त evm) हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान नागपूरचे सह पोलीस आयुक्त निसार तांबोळी यांनी याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार ज्या पहिल्या तवेरा कारवर हल्ला झाला होता, त्यामध्ये झोनल अधिकारी उपस्थित होते आणि त्यांच्या गाडीमध्ये मतदानासाठी वापरलेली नव्हे, तर अतिरिक्त ईव्हीएम ठेवलेली होती. त्याच ईव्हीएमला मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम समजून जमावाने हल्ला केला असावा असा पोलिसांचा संशय आहे.

चंद्रपूरमध्येही घडला 'असा' प्रकार 

चंद्रपूर जिल्हातील भद्रावती येथे एका राजकीय पक्षाशी संबंधित महिलेने ईव्हीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या प्रयत्नात ईव्हीएम मशीनला कुठलंच नुकसान न झाल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. 65 वर्षीय लता शिंगाडे असं या महिलेचं नाव असून ती बहुजन मुक्ती पार्टीची कार्यकर्ता आहे. भद्रावती शहरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदानासाठी गेलेल्या शिंगाडे यांनी अचानक 'evm हटाव, संविधान बचाव' असा नारा देत evm मशीन फेकली. अचानक झालेल्या या गोंधळामुळे थोडा वेळ मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी धाव घेत या महिलेला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. भद्रावती पोलिसांनी या महिलेवर गुन्हा नोंदवून तिला ताब्यात घेतलं आहे.

हे ही वाचा : 

Vidhan Sabha Elections 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची अंतिम टक्केवारी, लोकसभेपेक्षा टक्का वाढला, कोणाला फायदा अन् कोणाला फटका?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget