(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पहिल्या कलांमध्ये नागपुरातील काँग्रेसचे दिग्गजांची आघाडी; तर देवेंद्र फडणवीसांची सरशी कायम! सर्व अपडेट्स एका क्लिकवर
Maharashtra Assembly Election Results 2024 : उपराजधानी नागपूर ही राज्याच्या राजकीय पटलावर महत्त्वाचा जिल्हा समजला जातो. त्यामुळे नागपूरसह विदर्भात कुणाचं वर्चस्व असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Nagpur District Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 (Vidhan Sabha Election 2024) चे सुरुवातीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यानं अनुभवलेल्या अभूतपूर्व सत्तासंघर्षानंतर राज्यातील मतदार राजानं कुणाच्या पदरात मतांचं दान टाकलं? हे आज स्पष्ट होणार आहे. तर राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती सोपवणार? याचा फैसला आज होणार आहे. अशातच, आज राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला शनिवारी सकाळी आठ वाजता सुरु झाली. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी केली जाणार आहे. मात्र, मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात वेगाने आकडे बदलत आहेत. काहीवेळापूर्वीच पोस्टल मतांची मोजणी संपून आता ईव्हीएम मशीन मतमोजणीसाठी (EVM Votes Counting) उघडण्यात आली आहे. सुरुवातीच्या कलानुसार नागपूरच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे प्रत्यक्ष सहाव्यादा निवडनुकीच्या मैदानात उतरले आहेत.
देवेंद्र फडणवीसांसह काँग्रेसचे दिग्गजांची ही आघाडी
तर पहिल्या कलापासून फडणवीस हे आघाडीवर असल्याचे चित्र आहे. नागपूरच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ पहिला राऊंड मध्ये देवेंद्र फडणवीस तीन हजार मतांनी आघाडीवर असलीची माहिती पुढे आली आहे. तर त्या पाठोपाठ पश्चिम नागपूर मधील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे हे 4,364 मतांनी, उत्तर नागपूर मधून नितीन राऊत पोस्टल मतदानावर आघाडीवर, तर उमरेडमध्ये काँग्रेसचे संजय मेश्राम आघाडीवर असल्याची माहिती पुढे आली आहे.
नागपुरातील 12 विधानसभा क्षेत्रांपैकी 11 मतदारसंघात भाजपचाच वरचष्मा असून शिंदेंच्या शिवसेनेला अवघी एक जागा मिळाली आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेसनेही आपले तगडे उमेदवार रिंगणात उतरवर आव्हान दिले आहे. त्यामुळे नागपूरच्या 12 मतदारसंघात महायुती की मविआ बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर हाती आलेल्या कलानुसार आकडेवारी पुढे येते आहे.
नागपूर - दक्षिण पश्चिम मतदार संघ पहिली फेरी
भाजपचे देवेंद्र फडणवीस -4716
काँग्रेसचे प्रफुल गुडदे -2467
दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस आघाडीवर.
उमरेड मतदार संघ पहिली फेरी
सुधीर पारवे,(BJP) : 3650
संजय मेश्राम,(congres): 4463
प्रमोद घरडे,(अपक्ष) 2403
पश्चिम नागपूर मतदार संघ पहिली फेरी
विकास ठाकरे - 4364
सुधाकर कोळे- 4734
नरेंद्र चिचकार - 415
काटोल विधानसभा पहिली फेरी
भाजप चरणसिंग ठाकूर 6894
सलिल देशमुख तुतारी 3486
चरणसिंग ठाकूर 3408 पहिला राऊंड आघाडी वर
दूसऱ्या राऊंड नंतर भाजपचे चरणसिंग ठाकूर 7662 मतांनी आघाडी वर.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार सलिल देशमुख पिछाडीवर...
आणखी वाचा