एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एससी आणि एसटीच्या जागेवर आपण उमेदवार देणार नाही, विचारधारा असणाऱ्यांना आपण निवडून आणायचं; मनोज जरांगेंनी रणशिंग फुंकले

ज्या ठिकाणी आपण उभा करायचं नाही, तिथे आपण जो 500 रुपयांच्या  बाँडवर लिहून देईल त्याला आपण निवडून आणायचे, बाकीचे सर्व पाडायचे असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येऊ शकतात, तिथं मराठा समाजाचे उमेदवार उभे करायचे आणि ज्या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही तेथील आपल्या विचारांच्या उमेदवारांकडून स्टॅम्प पेपरवर लिहून त्यांना निवडून आणायचं आहे. ज्यांना उमेदवारी अर्ज भरायचे आहे त्यांनी भरावे, पण 29 ऑक्टोबरला मी सांगितलेल्या ठिकाणी अर्ज कायम ठेवून निवडणुक लढवायची असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (20 ऑक्टोबर) अंतरवाली सराटीमध्ये सभा घेऊन केली. जरांगे पाटील यांनी उमेदवार देण्याची घोषणा केल्याने त्याचा फटका कोणाला बसणार? याचं उत्तर 23 नोव्हेंबर रोजी मिळणार आहे. 

एससी आणि एसटीच्या जागेवर आपण उमेदवार देणार नाही

मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, जिथं निवडून येतील तिथे उमेदवार उभे करणार आहे. एससी आणि एसटीच्या जागेवर आपण उमेदवार देणार नाही, आपल्या विचारधारेशी असणाऱ्यांना आपण निवडून आणायचं आहे. ज्या ठिकाणी आपण उभा करायचं नाही, तिथे आपण जो 500 रुपयांच्या  बाँडवर लिहून देईल त्याला आपण निवडून आणायचे, बाकीचे सर्व पाडायचे असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली. ते म्हणाले की, आता आपण सर्व जाती धर्माचे लोक उभे करायचे आहेत. कुठे मराठा, दलित मुस्लिम समीकरण जुळते का? याचाही अंदाज घ्यायचा आहे. एका जातीवर सीट निवडून येऊ शकत नाही. समीकरण जुळून येतोय का बघू, तुम्ही फॉर्म भरा, 29 तारखेला ज्याला फॉर्म काढायचा आहे त्यानं काढायचा. असेही त्यांनी सांगितले. 

2 ते 3 दिवसात मी मतदारसंघाची नाव सांगणार

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, संमिश्र ताकत ठेवली तर मराठा जिंकू शकतो. त्यामुळे काही निवडून आणू काही पाडू. 36 मतदारसंघ असे आहेत तिथे मराठाच निवडून आणू शकतो. त्यामुळे समीकरण नाही जुळल, तर पुढं जाण्यासाठी पाहून घेऊ. ज्याने मराठ्यान संपवले आहे त्याला संपवायचं आहे. तुम्ही फॉर्म भरून घ्या, त्यात मेरिट ठरवू, 2 ते 3 दिवसात मी मतदारसंघाची नाव सांगणार असल्याची घोषणा त्यांनी केली. जिथे मराठ्यांचे निवडून येथील त्याच ठिकाणी उभे करायचे, पण त्याला काही जातीचे समीकरण जुळून यायला पाहिजे. काही ठिकाणी जो आपली भूमिका मांडेल जो आपल्याला लिहून, देणार त्याला विजयी करणार असेही त्यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छ. संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात सर्व आंबेडकरी संघटना एकटवल्या, शाहांच्या पोस्टरला चपला मारल्या
छ. संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात सर्व आंबेडकरी संघटना एकटवल्या, शाहांच्या पोस्टरला चपला मारल्या
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा, अजित पवारांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, चांगल्या दरासाठी परदेशात कांद्याची निर्यात गरजेची
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा, अजित पवारांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, चांगल्या दरासाठी परदेशात कांद्याची निर्यात गरजेची
मुंबई केंद्रशासित करा, कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराने तोडले अकलेचे तारे, आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले, महाराष्ट्राचा अपमान केल्यास...
मुंबई केंद्रशासित करा, कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराने तोडले अकलेचे तारे, आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले, महाराष्ट्राचा अपमान केल्यास...
Gold Silver Rate : अमेरिकेतून बातमी येताच सोने अन् चांदीच्या दरात घसरण, MCX वर विक्रीचा ट्रेंड, जाणून घ्या नवे दर
शेअर मार्केट पाठोपाठ सोने चांदीच्या दरात घसरण, MCX बाजारात काय घडलं? जाणून घ्या दर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde Full Speech :राम भाऊ किती हळवे आहेत?पंकजा मुंडेंनी त्या भावनिक क्षणाचा किस्सा सांगितलाAaditya Thackeray : भाजप कार्यकर्त्यांना आदित्य ठाकरेंची क्रेझ; राम कदमांनी फोटोसाठी थांबवलंAjit Pawar Vidhan Parishad Speech : गिरीश, आता तरी सुधर ,कट होता होता वाचलास; दादांचं जोरदार भाषणSunil Prabhu on Beed Crime : एसआयटीपेक्षा सीटिंग जजमार्फत या प्रकरणाची चौकशी करा - सुनील प्रभू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छ. संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात सर्व आंबेडकरी संघटना एकटवल्या, शाहांच्या पोस्टरला चपला मारल्या
छ. संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात सर्व आंबेडकरी संघटना एकटवल्या, शाहांच्या पोस्टरला चपला मारल्या
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा, अजित पवारांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, चांगल्या दरासाठी परदेशात कांद्याची निर्यात गरजेची
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा, अजित पवारांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, चांगल्या दरासाठी परदेशात कांद्याची निर्यात गरजेची
मुंबई केंद्रशासित करा, कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराने तोडले अकलेचे तारे, आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले, महाराष्ट्राचा अपमान केल्यास...
मुंबई केंद्रशासित करा, कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराने तोडले अकलेचे तारे, आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले, महाराष्ट्राचा अपमान केल्यास...
Gold Silver Rate : अमेरिकेतून बातमी येताच सोने अन् चांदीच्या दरात घसरण, MCX वर विक्रीचा ट्रेंड, जाणून घ्या नवे दर
शेअर मार्केट पाठोपाठ सोने चांदीच्या दरात घसरण, MCX बाजारात काय घडलं? जाणून घ्या दर
Chhagan Bhujbal: भुजबळ नवीन पक्ष काढणार की भाजपमध्ये जाणार? एबीपीच्या मुलाखतीवेळी म्हणाले, 'पक्ष काढणं...'
भुजबळ नवीन पक्ष काढणार की भाजपमध्ये जाणार? एबीपीच्या मुलाखतीवेळी म्हणाले, 'पक्ष काढणं...'
Nana Patole on Beed: वाल्मिक कराड हाच बीडचं शासन चालवतो, पोलिसांच्या बदल्याही त्याच्या मर्जीने, मंत्र्याचा वरदहस्त; नाना पटोले विधानसभेत काय म्हणाले?
नाना पटोलेंनी सभागृहात वाल्मिक कराडची कुंडली मांडली, 200 गुन्हे अन् मंत्र्यासोबतचं कनेक्शन सांगितलं
Raju Shetti : तर मग न्यायाधीशांना सुद्धा तीन टप्प्यात पगार द्या, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना राजू शेट्टींचं खरमरीत पत्र
तर मग न्यायाधीशांना सुद्धा तीन टप्प्यात पगार द्या, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना राजू शेट्टींचं खरमरीत पत्र
IPO Update : रेखा झुनझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ लिस्ट, GMP चा अंदाज पार करत लिस्टिंग , गुंतवणूकदार मालामाल
IKS च्या आयपीओचं GMP चा अंदाज पार करत लिस्टिंग, गुंतवणूकदारांना 42 टक्के परतावा
Embed widget