Nana Patole : मी बंडखोरी मागे घ्यावी का? हाच नियम मावळमध्ये भाजपने पाळावा; बंडखोर नाना काटेंचा नवा डाव
राज्यात प्रत्येक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे, पण चिंचवडमधील नाना काटे हे असे बंडखोर आहेत, ज्यांना शरद पवार आणि अजित पवारांकडूनही संपर्क साधला जात आहे.
Nana Patole : अर्ज मागे घ्यायला काही तास उरले असताना चिंचवडमधील बंडखोर उमेदवार नाना काटेंनी नवा डाव टाकला आहे. मी बंडखोरी मागे घ्यावी असं वाटत असेल तर मावळमध्ये भाजपने बंडखोर बापू भेगडेंना दिलेला पाठिंबा काढून घ्यावा, असं म्हणत नाना काटेंनी भाजपाला कोंडीत पकडले आहे. भाजपचे शंकर जगताप आणि शरद पवार गटाचे राहुल कलाटे यांच्याविरोधात काटे यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळं शरद पवार आणि अजित पवारांकडून त्यांची मनधरणी सुरु आहे. अशातच काटे यांनी मावळ विधानसभेचा संदर्भ देत, नवी खेळी केलीय आहे. त्यामुळं दुपारी तीन वाजेपर्यंत नेमकं काय घडतं? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
नाना काटेंनी माघार घ्यावी म्हणून शरद पवार अन अजित पवारांकडून मनधरणी
दरम्यान, राज्यात प्रत्येक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे, पण चिंचवडमधील नाना काटे हे असे बंडखोर आहेत, ज्यांना शरद पवार आणि अजित पवारांकडूनही संपर्क साधला जात आहे. तरीही काटे मात्र बंडखोरीवर ठाम आहेत. आज त्यांची मनधरणी करण्यासाठी पुन्हा एकदा महायुती आणि मविआकडून संपर्क साधला जाणार आहे. चिंचवड विधानसभेतून बंडखोरी मागे घ्यायची का? हा निर्णय नाना काटे समर्थकांशी चर्चा करून घेणार आहेत. बैठकीपूर्वी काटे समर्थकांशी संवाद साधला असता काटेंनी आता माघार घेऊ नये, अशी आग्रही भूमिका त्यांनी लावून धरली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या