राज ठाकरेंचा एकेकाळचा बालेकिल्ला उमेदवारीपासून वंचित; मनसेच्या दुसऱ्या यादीत नाशिकचा एकही शिलेदार नाही
एकेकाळी नाशिक हा मनसेचा गड होता मुंबईनंतर नाशिक मध्येच मनसेची ताकद होती. मात्र या निवडणुकीत मनसेला अद्याप आपला उमेदवार जाहीर करता आला नाही.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यासा दुसऱ्या यादीतही स्थान नाही. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 15 मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघावर मनसेना अद्याप उमेदवार दिला नाही. एकेकाळी नाशिक हा मनसेचा गड होता मुंबईनंतर नाशिकमध्येच मनसेची ताकद होती. मात्र या निवडणुकीत मनसेला अद्याप आपला उमेदवार जाहीर करता आला नाही. मात्र नाशिक मधल्या एकाही उमेदवाराचा उमेदवार यादीत समावेश नाही. मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक मधील मनसेची पकड कमी होत आहे का? असा सवाल यादीतून उपस्थित होत आहे.
नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघावर मनसेना अद्याप उमेदवार दिला नाही. एकेकाळी नाशिक हा मनसेचा गड होता मुंबईनंतर नाशिक मध्येच मनसेची ताकद होती. मात्र या निवडणुकीत मनसेला अद्याप आपला उमेदवार जाहीर करता आला नाही. सोलापूर, नागपूर, गेवराई, औसा तासगाव आष्टी, जळगाव शहर, या भागातले उमेदवार मनसेने जाहीर केले . मात्र नाशिकमधल्या एकाही उमेदवाराचा उमेदवार यादीत समावेश नाही.
मनसेची वेट अँड वॉचची भूमिका
वास्तविक पाहता मुंबई, ठाणेनंतर नाशिक मधील उमेदवार मनसेना जाहीर करणं अपेक्षित होतं असं जाणकारांना वाटत आहे. मनसेला नाशिकमधून 2009 मध्ये तीन आमदार मिळाले होते. नाशिक महानगरपालिकेवर 40 नगरसेवकांसह मनसेन सत्ता प्रस्थापित केली होती. मात्र आता पहिल्या दोन याद्या जाहीर झाल्या त्यात नाशिकच्या एकाही मतदारसंघाचा उमेदवार जाहीर नाही. नाशिकमध्ये मोजके चर्चेतील चेहरे वगळता तुल्यबळ उमेदवार नसल्याने मनसेची वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे का? असा सवाल उपस्थित होतो. इतर पक्षातील नाराज आणि आयारामांना मनसे पक्षात घेणार का आणि उमेदवारी देणार का ?याकडे लक्ष लागले आहे.
राज ठाकरेंनी इच्छुकांना तयारीला लागण्याच्या दिल्या सूचना
मनसेची स्थापना झाल्यानंतर सर्वाधिक तीन आमदार नाशिकमधून निवडून आले होते. त्यामुळे नाशिक (Nashik News) हा मनसेचा बालेकिल्ला बनला होता. नाशिक महापालिकेत सत्ता आणि तीन आमदार अशी भक्कम स्थिती मनसेची होती. मात्र, गटबाजीमुळे मनसेला मोठा धक्का बसला आणि मनसेचा नाशिकची सत्ता गेली. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी पुन्हा आपला मोर्चा नाशिककडे वळवला आहे .राज ठाकरेंनी इच्छुकांना तयारीला लागण्याच्या दिल्या सूचना दिल्या आहेत. मात्र उमेदवार कोण? यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी विलंब लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या घोषणेनंतर मनसे उमेदवारांची यादी घोषित करणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. नाशिकमध्ये शहरातील नाशिक पूर्व, मध्य, पश्चिम आणि देवळाली या चारही जागेवर मनसे निवडणूक लढणार असल्याचे समजते.
हे ही वाचा :