सोलापूर जिल्ह्यात ठाकरेंचा दणका, सांगोल्यात दीपक साळुंखे तर सोलापूर दक्षिणमधून अमर पाटील मैदानात, आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता
सोलापूर जिल्ह्यात ठाकरेंनी मोठा दणका दिला आहे. सांगोल्यातून दीपक आबा साळुंखे पाटलांना तर सोलापूर दक्षिणमधून अमर पाटील यांना एबी फॉर्म दिल्याची माहिती मिळत आहे.
Shiv Sena Uddhav Thackeray Candidates List : विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. भाजपनंतर शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena Uddhav Thackeray Group) देखील काही उमेदवारंना एबी फॉर्म वाटप झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जवळपास 40 उमेदवार निश्चित झाले आहेत. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात ठाकरेंनी मोठा दणका दिला आहे. सांगोल्यातून दीपक आबा साळुंखे पाटलांना तर सोलापूर दक्षिणमधून अमर पाटील यांना एबी फॉर्म दिले आहेत. त्यामुळं यावरुन आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झालीय.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने अमर पाटील यांना एबी फॉर्म दिलाय. काँग्रेस ही जागा लढवण्यावर ठाम आहे. काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने हे या मतदार संघातून इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून धर्मराज काडादी हे इच्छुक आहेत. दोन्ही दिग्गज नेते असताना ठाकरे गटाने अमर पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख विरुद्ध ठाकरे गटाचे अमर पाटील यांच्यात ही लढत होईल. यामुळं आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटापुढे दिलीप माने यांचे बंड रोखण्याचे आव्हान असणार आहे. तर सांगोलाधून दीपक आबा साळुंखे यांना ठाकरे गटाने एबी फॉर्म दिलाय. तर शेकापने बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केलीय.
शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी?
1) सुधाकर बडगुजर(नाशिक पश्चिम)
2)वसंत गिते(नाशिक मध्य)
3 )अद्वय हिरे (मालेगाव बाह्य)
4)एकनाथ पवार (लोहा कंधार)
5 )के पी पाटील, राधानगरी विधानसभा
6 )बाळ माने, रत्नागिरी विधानसभा
7) उदेश पाटेकर, मागाठाणे विधानसभा
8 ) अमर पाटील, सोलापूर दक्षिण
9) गणेश धात्रक, नांदगाव
10) दीपक आबा साळुंखे पाटील, सांगोला
11) प्रविणा मोरजकर, कुर्ला
12) एम के मढवी, ऐरोली
13) भास्कर जाधव, गुहागर
14 )वैभव नाईक, कुडाळ
15) राजन साळवी, राजापूर लांजा
16) आदित्य ठाकरे, वरळी
17) संजय पोतनीस, कलिना
18) सुनील प्रभू, दिंडोशी
19) राजन विचारे, ठाणे शहर
20) दीपेश म्हात्रे, डोंबिवली
21) कैलास पाटील, धाराशिव
22) मनोहर भोईर, उरण
23) महेश सावंत, माहीम
24) श्रद्धा जाधव, वडाळा
25) पाचोरा - वैशाली सूर्यवंशी
26) नितीन देशमुख - बाळापूर
27) किशनचंद तनवाणी - छत्रपती संभाजी नगर मध्ये
28)छत्रपती संभाजीनगर पश्चिम - राजू शिंदे*
29 )वैजापूर मतदारसंघ - दिनेश परदेशी*
30) कन्नड मतदारसंघ - उदयसिंह राजपूत*
31) सिल्लोड मतदारसंघ - सुरेश बनकर
32) राहुल पाटील - परभणी
33) शंकरराव गडाख -नेवासा
34) सुभाष भोईर - कल्याण ग्रामीण
35) सुनील राऊत - विक्रोळी
36) रमेश कोरगावकर भांडुप पश्चिम
37) उन्मेश पाटील - चाळीसगाव
38) स्नेहल जगताप - महाड
39) ऋतुजा लटके - अंधेरी पूर्व
40) केदार दिघे- कोपरी पाचपाखाडी
महत्वाच्या बातम्या: