Jitendra Awhad: आलिशान गाड्या, बंगला, दुकानं, शेत जमीनी; 5 वर्षात मालमत्ता दुप्पट, जितेंद्र आव्हाडांची संपत्ती किती?
Jitendra Awhad Wealth: जितेंद्र आव्हाडांच्या संपत्तीमध्ये २०१९ च्या एकूण संपत्तीपेक्षा २०२४ च्या एकूण संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
Jitendra Awhad Wealth: माजी मंत्री आणि मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे विद्यामान आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)चे प्रमुख शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू म्हणून माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची ओळख आहे.
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी काल (24 ऑक्टोबर) ठाण्यात उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मोठी रॅली काढत जितेंद्र आव्हाड यांनी शक्तीप्रदर्शन केले. विशेष म्हणजे शरद पवार देखील जितेंद्र आव्हाडांच्या या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. शरद पवारांचा आशीर्वाद आहे, माझ्या जनतेची मला साथ आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत विजय देखील आपलाच आहे, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं, त्यामध्ये त्यांची एकूण संपत्ती समोर आली आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या संपत्तीमध्ये २०१९ च्या एकूण संपत्तीपेक्षा २०२४ च्या एकूण संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्याकडे होंडी सिटी, बीएमडब्ल्यु गाड्या आहेत. नाशिक सिन्नर येथे दोन ठिकाणी शेत जमीनी आहेत. तसेच ठाण्यातील येऊर येथे बंगला, गाडीचे शोरुम, विवियाना मॉल येथे नाद बंगला, आदींसह इतर वास्तु आणि शॉप देखील असल्याचं समोर आलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांची संपत्ती-
२०१९ मधील एकूण संपत्ती - ४७,८९,३६,५५३
२०२४ मधील एकूण संपत्ती - १०३,५९,१६,८४३ - स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून
२०१९ मधील आकडेवारी - २०२४ मधील आकडेवारी
रोख रक्कम - १,५०,००० - २,२२,८८०
पत्नीकडे - १,२५,००० - १,५०,०००
जंगम - १३,७५,१९,५९८ - २०,६७,८७,५६६
पत्नीकडे - ५,१८,५८,८६३ - १९,४७,७७,८४३
स्थावर - २७,९१,३३,०९१ - ३२,३७,८४,७०७
पत्नीकडे - १,०४,२५,००० - ३१,०५,६६,७२७
कर्ज - ३७,५८,८१,२९९ - ८६,२७,८७,४०७
पत्नीकडे - २०२४ मध्ये कर्ज - ७६,५१,५१,७०१
वारसा हक्काने - ५,०४,१८,३१०
पत्नीकडे - ४९,७०७
दाखल गुन्हे - २५ - ८६
वाहने - जितेंद्र आव्हाड यांच्याकडे होंडी सिटी, बीएमडब्ल्यु गाड्या आहेत.
शेती - नाशिक सिन्नर येथे दोन ठिकाणी शेत जमीनी आहेत.
सदनिका - ठाण्यातील येऊर येथे बंगला, गाडीचे शोरुम, विवियाना मॉल येथे नाद बंगला, आदींसह इतर वास्तु आणि शॉप देखील आहेत.
माझा बाप एवढ्या उन्हात आला मला आणखी काय पाहिजे- जितेंद्र आव्हाड
जितेद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खुद्द शरद पवारांनी भर उन्हात उपस्थिती दर्शवली. अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या शरद पवारांना कळवा मुंब्र्यात भरघोस प्रतिसाद मिळाला. यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले की, माझा विजय निश्चित आहे पण थोडा वेळ वाट पाह लीड महत्वाचा असल्याचे आव्हाड म्हणाले. वरचा परमेश्वर बघत आहे कोणाला जिंकवायचं तो ठरवेल असे आव्हाड म्हणाले. शरद पवार माझा बाप एवढ्या उन्हात आला मला आणखी काय पाहिजे. महाराष्ट्रात फक्त माझा अर्ज दाखल करण्यासाठी ते आले आहेत असे आव्हाड म्हणाले.