एक्स्प्लोर

Election 2024: मतदार ओळखपत्र नसेल तर हरकत नाही, 'या' 12 पैकी कोणताही एक पुरावा द्या आणि मतदान करा 

Election 2024 : ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणूकीसाठी येत्या 20 नोव्हेबर 2024 रोजी मतदान होणार आहे. दरम्यान मतदान करण्यासाठी ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने (Election Commission) मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 12 प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

 'या' 12 पैकी कोणताही एक पुरावा द्या आणि मतदान करा

मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र नसल्यास 12 प्रकारच्या पुराव्यांमध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, पारपत्र (पासपोर्ट), निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

अनिवासी भारतीयांसाठी सूचना 

दरम्यान, अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे. एखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल, पण त्याला अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. मात्र त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे. तसेच सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या किमान पाच दिवस आधी मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या चिठ्ठ्यांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण केले जाईल. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती - चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्रासोबत घेऊन यावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025Santosh Deshmukh Wife Reaction | एक महिन्याआधी धमकी आली होती, संतोष देशमुखांच्या पत्नीचा खुलासाPriyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
Santosh Deshmukh Case : तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
Embed widget