Maharashtra Politics: सोलापूरात निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का! निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांनी हाती घेतली 'तुतारी'
Maharashtra Politics: सोलापुरात ऐन निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.अजित पवार गटाचे बार्शी तालुक्यातील नेते निरंजन भूमकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
सोलापूर: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोलापुरात ऐन निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.अजित पवार गटाचे बार्शी तालुक्यातील नेते निरंजन भूमकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत गोविंद बाग येथे भूमकरांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. निरंजन भूमकर हे वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. वैराग नगरपंचायतीवर निरंजन भूमकर यांची एक हाती सत्ता आहे.
आपल्या नेत्याला तिकीट न मिळाल्याने किंवा आपल्या आवडत्या उमेदवाराला पक्षाने तिकीट न दिल्याने नेते मंडळींपासून ते पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सुर आहेत. अशामध्ये ते बंडखोरी करत पक्षांतर करत आहेत. असाच प्रकार सोलापूरमध्ये घडला आहे. सोलापूरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. निरंजन भूमकर यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवार गटामध्ये प्रवेश केला.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बार्शी तालुक्यातील नेते निरंजन भूमकर यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. शरद पवारांच्या उपस्थितीत गोविंद बाग येथे निरंजन भूमकरांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह १५ नगरसेवकांनी देखील अजित पवारांची साथ सोडत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. निरंजन भूमकर हे वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. वैराग नगरपंचायतीवर निरंजन भूमकर यांची एक हाती सत्ता आहे. त्यांच्या सोडचिठ्ठीमुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.