एक्स्प्लोर

Nana Kate: चिंचवडमधील बंडखोरी रोखण्यासाठी अजित पवार ॲक्शन मोडमध्ये; थेट पोहचले नाना काटेंच्या घरी, मनधरणी सुरू

Nana Kate: अजित पवारांकडून काटे यांना समजवण्याचा प्रयत्न सुरु आहेत. या बैठकीनंतर नाना काटे माघार घेणार की बंडखोरीवर ठाम राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

पुणे: चिंचवडमध्ये अजित पवारांचे समर्थक नाना काटे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्या बंडखोरीचा फटका महायुती किंवा महाविकास आघाडी या दोघांपैकी एकाला नक्कीच बसणार आहे. हे पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः नाना काटे यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या घरी पोहचले. थेट अजित पवारांकडून काटे यांना समजवण्याचा प्रयत्न सुरु आहेत. या बैठकीनंतर नाना काटे माघार घेणार की बंडखोरीवर ठाम राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. महायुतीतील मित्रपक्षातील भाजपकडून शंकर जगताप आणि शरद पवार गटाकडून राहुल कलाटे मैदानात आहेत. त्यांच्याविरोधात काटे यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय. पण दादांच्या मनधरणी नंतर ते काय भूमीका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

नाना काटे अपक्ष लढणार

महायुतीकडून चिंचवडची जागा भाजपला सुटली, भाजपने शंकर जगतापांना उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत असलेले नाना काटे यांना शेवटी शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. उमेदवारी न मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना काटे यांनी अखेर अपक्ष लढण्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. त्यामुळे महायुतीकडून लढत असलेले भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांना काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.

 शरद पवारांच्या पक्षांकडून राहुल कलाटेंना उमेदवारी

चिंचवडमधून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीत तिघांना एकमत करण्याच्या सूचना शरद पवारांनी दिल्या होत्या. मात्र, चिंचवडमधून राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आता नाना काटेंच्या भुमिकेकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं.

चिंचवडमध्ये चौरंगी लढत

चिंचवडमध्ये चौरंगी लढत होणार आहे. चिंचवडमध्ये महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी अर्ज दाखल केला आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बंडखोर उमेदवार नाना काटे, भाऊसाहेब भोईर यांनी देखील अपक्ष अर्ज भरला आहे. महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी असल्याने चौरंगी लढत दिसत आहे. मात्र, अजित पवारांनी नाना काटेंची भेट घेऊन समजूत घातल्यामुळे नाना काटेंच्या भुमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: निम्म्या महाराष्ट्रावर पावसाचा रुसवा कायम, जोरदार सरींची प्रतीक्षाच! विदर्भ, मराठवाड्यातील बळीराजा दुबार संकटात, तर महाबळेश्वरमध्ये विक्रमी पावसाची नोंद
निम्म्या महाराष्ट्रावर पावसाचा रुसवा कायम, जोरदार सरींची प्रतीक्षाच! विदर्भ, मराठवाड्यातील बळीराजा दुबार संकटात, तर महाबळेश्वरमध्ये विक्रमी पावसाची नोंद
Mahebub Shaikh Vs Umesh Patil: 'पक्ष स्थापन केला म्हणजे तहयात मालकी नसते'; मेहबूब शेख यांचं उमेश पाटलांना प्रत्युत्तर, म्हणाले, शरद पवारांनी...
'पक्ष स्थापन केला म्हणजे तहयात मालकी नसते'; मेहबूब शेख यांचं उमेश पाटलांना प्रत्युत्तर, म्हणाले, शरद पवारांनी...
Pune Crime news: पुण्यातील खराडीत आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं, नोएडातील बॉयफ्रेंडला पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?
पुण्यातील खराडीत आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं, नोएडातील बॉयफ्रेंडला पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?
Abhishek Sharma : 6 चौकार 7 षटकार, अभिषेक शर्माची शेर ए पंजाब टी 20 लीगमध्ये तुफान फटकेबाजी, 26 बॉलमध्ये 77 धावांची खेळी
6 चौकार 7 षटकार,26 बॉलमध्ये 77 धावांची खेळी, अभिषेक शर्माची तुफान फटकेबाजी 

व्हिडीओ

Mohan Bhagwat on Muslim Statment : भारतात एकही मुस्लीम नको म्हणणारा हिंदू नाही Special Report
Nepal flood : घर असावं तर असं! नेपाल महापुरातही सुरक्षित Special Report
Sangli Ganpati Lezim : बाप्पाच्या स्वागताला लेझीमचा ताल, परंपरेचा ठेका | Special Report ABP Majha
Sanjay jadhav Speech Parbhani : मनोज जरांगेंवर भाष्य, माझ्यावर बोलायचा तुमचा नैतिक अधिकार
Shankar Abhyankar Majha Katta : लक्ष्मण रेषा ते रावणाची भक्ती, किती तथ्य, किती मिथ्य? दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain: निम्म्या महाराष्ट्रावर पावसाचा रुसवा कायम, जोरदार सरींची प्रतीक्षाच! विदर्भ, मराठवाड्यातील बळीराजा दुबार संकटात, तर महाबळेश्वरमध्ये विक्रमी पावसाची नोंद
निम्म्या महाराष्ट्रावर पावसाचा रुसवा कायम, जोरदार सरींची प्रतीक्षाच! विदर्भ, मराठवाड्यातील बळीराजा दुबार संकटात, तर महाबळेश्वरमध्ये विक्रमी पावसाची नोंद
Mahebub Shaikh Vs Umesh Patil: 'पक्ष स्थापन केला म्हणजे तहयात मालकी नसते'; मेहबूब शेख यांचं उमेश पाटलांना प्रत्युत्तर, म्हणाले, शरद पवारांनी...
'पक्ष स्थापन केला म्हणजे तहयात मालकी नसते'; मेहबूब शेख यांचं उमेश पाटलांना प्रत्युत्तर, म्हणाले, शरद पवारांनी...
Pune Crime news: पुण्यातील खराडीत आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं, नोएडातील बॉयफ्रेंडला पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?
पुण्यातील खराडीत आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं, नोएडातील बॉयफ्रेंडला पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?
Abhishek Sharma : 6 चौकार 7 षटकार, अभिषेक शर्माची शेर ए पंजाब टी 20 लीगमध्ये तुफान फटकेबाजी, 26 बॉलमध्ये 77 धावांची खेळी
6 चौकार 7 षटकार,26 बॉलमध्ये 77 धावांची खेळी, अभिषेक शर्माची तुफान फटकेबाजी 
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांना फटका, 1.13 लाख कोटी बुडाले, रिलायन्स आणि एअरटेलचं सर्वाधिक नुकसान, 3 कंपन्या फायद्यात
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांना फटका, 1.13 लाख कोटी बुडाले, रिलायन्स आणि एअरटेलचं सर्वाधिक नुकसान
Maharashtra Live blog updates: धनगर समाज 17 सप्टेंबरला परभणीत काढणार मोर्चा, राज्यस्तरीय बैठकीत घेतला निर्णय
Maharashtra Live blog updates: धनगर समाज 17 सप्टेंबरला परभणीत काढणार मोर्चा, राज्यस्तरीय बैठकीत घेतला निर्णय
ह्रदयद्रावक... मुंबईतील 60 पर्यटक नेपाळमधील 'त्या' इमारतीच्या ढिगाऱ्यात दबल्याची शंका; नेपाळ सरकारनं काय म्हटलं?
ह्रदयद्रावक... मुंबईतील 60 पर्यटक नेपाळमधील 'त्या' इमारतीच्या ढिगाऱ्यात दबल्याची शंका; नेपाळ सरकारनं काय म्हटलं?
पुण्यातील गणेशोत्सव, एका संस्थेनं गौतमी पाटीलला बोलावलंय, धांगडधिंगा उपयोगाचा नाही; मेधा कुलकर्णींचा संताप
पुण्यातील गणेशोत्सव, एका संस्थेनं गौतमी पाटीलला बोलावलंय, धांगडधिंगा उपयोगाचा नाही; मेधा कुलकर्णींचा संताप
Embed widget