Maharashtra Politics : सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
Maharashtra Politics : सोलापूर दक्षिणमधून काँग्रेसचे बंडखोर असलेल्या दिलीप माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
Maharashtra Politics : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. महाविकास आघाडीत या जागेवरुन चर्चा सुरु असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेने अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर काँग्रेसचे दिलीप माने नाराज झाले होते. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, दिलीप माने यांनी अखेर आज (दि.4) अर्ज मागे घेतला आहे. मात्र, सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची अध्वर्यू धर्मराज काडादी यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. लोकसभा निवडणुकीत धर्मराज काडादी प्रणिती शिंदे यांच्या पाठिशी उभे राहिले होते. त्यामुळे धर्मराज काडादींना काँग्रेस मदत करणार, अशा चर्चाही रंगू लागल्या आहेत.
सोलापुरात सांगली पॅटर्न राबवणार - धर्मराज काडादी
दरम्यान, सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांना ‘संगणक’ चिन्ह मिळालं आहे. “मला अर्ज माघारी घेतलेल्या दिलीप माने यांचा पाठिंबा पण अद्याप कोणत्याही पक्षाने पुरस्कृत केलेलं नाही", असंही धर्मराज काडादी म्हणाले.
दक्षिण सोलापुरात तिरंगी लढत
तसेच सोलापुरात सांगली पॅटर्न होईल, असा दावा देखील काडादी यांनी केलाय. धर्मराज काडादी यांच्या उमेदवारीमुळे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे. सोलापूर दक्षिण मतदार संघात भाजपच्या सुभाष देशमुख, ठाकरे गटाचे अमर पाटील आणि बंडखोर धर्मराज काडादी यांच्यात होणार लढत होणार आहे. शिवाय प्रहारकडून बाबा मिस्त्री, मनसेकडून महादेव कोगनुरे, वंचितकडून संतोष पवार, भाजप बंडखोर सोमनाथ वैद्य हे देखोल असणार मैदानात असणार आहेत.
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांना ‘संगणक’ चिन्ह
“मला अर्ज माघारी घेतलेल्या दिलीप माने यांचा पाठिंबा पण अद्याप कोणत्याही पक्षाने पुरस्कृत केलेलं नाही“
सोलापूर दक्षिण मधील उमेदवार धर्मराज काडादी यांची प्रतिक्रिया
तसेच सोलापुरात सांगली पॅटर्न होईल असा दावा देखील काडादी यांनी व्यक्त केलंय
धर्मराज काडादी यांच्या उमेदवारीमुळे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होणार
सोलापूर दक्षिण मतदार संघात भाजपच्या सुभाष देशमुख, ठाकरे गटाचे अमर पाटील आणि बंडखोर धर्मराज काडादी यांच्यात होणार लढत
शिवाय प्रहारकडून बाबा मिस्त्री, मनसेकडून महादेव कोगनुरे, वंचितकडून संतोष पवार, भाजप बंडखोर सोमनाथ वैद्य हे देखोल असणार मैदानात
इतर महत्त्वाच्या बातम्या