Maharashtra Lok Sabha Election 2024 Eknath Shinde: उतू नको, मातू नको, घेतला जनसेवेचा वसा टाकू नको...; एकनाथ शिंदेंचं ट्विट
Maharashtra Lok Sabha Election 2024 Eknath Shinde: ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के यांना निवडून आणत ठाण्यात शिंदेचं बॉस असल्याचं सिद्ध केलं.
Maharashtra Lok Sabha Election 2024 Eknath Shinde: कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे निवडणुकीत उभे होते. या मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांना 4 लाख 39 हजार 966 मते पडली तर मविआच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना 2 लाख 34 हजार 488 मते पडली. या मतदारसंघात जवळपास 2 लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे विजयी झाले आहेत. तसेच ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के यांना निवडून आणत ठाण्यात शिंदेचं बॉस असल्याचं सिद्ध केलं.
श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे. श्रीकांत शिंदेंच्या विजयावर एकनाथ शिंदे म्हणाले की, उतू नको... मातू नको...घेतला जनसेवेचा वसा टाकू नको...कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे 2 लाख 48 हजार एवढ्या प्रचंड मताधिक्याने निवडून येत विजयाची हॅट्ट्रिक केल्यानंतर आज माझे आणि माझा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे याचे डोंबिवली शहरात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी काही फोटो शेअर केले आहेत. तसेच नरेश म्हस्के यांच्या विजयानंतर धर्मवीरांचे ठाणे...ठरले महायुतीचे खणखणीत नाणे...ठाणे लोकसभा मतदारसंघात नरेश म्हस्के यांच्या रुपाने पुन्हा एकदा भगवा फडकवल्यानंतर आज टेंभीनाका येथील आनंद आश्रमात जाऊन एकनाथ शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचे आर्शीवाद घेतले.
उतू नको... मातू नको...
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 4, 2024
घेतला जनसेवेचा वसा टाकू नको...
कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे २ लाख ४८ हजार एवढ्या प्रचंड मताधिक्याने निवडून येत विजयाची हॅट्ट्रिक केल्यानंतर आज माझे आणि माझा मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे याचे डोंबिवली शहरात मोठ्या… pic.twitter.com/1vKRudTBIH
पश्चिम महाराष्ट्रात पवारांची जादू
पश्चिम महाराष्ट्रातील यंदाची लढत निर्णायक होती. राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर जनता अजित दादांना साथ देते की शरद पवारांसोबतच राहते हे या निवडणुकीतून स्पष्ट झालं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तीन जागांवर विजय मिळाला असून त्यापैकी बारामतीमधील विजय हा सर्वात लक्षवेधी ठरला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची पॉवर असल्याचं पहायला मिळालं.
बारामतीमध्ये शरद पवारांची बाजी
राज्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या बनलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या नणंद आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवारांचे होमग्राउंड कुणाच्या बाजूने याचं उत्तर या निवडणुकीतून मिळालं असून अजित पवारांसाठी हा धक्का असल्याचं मानलं जातंय. तर पराभवानंतर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचं आवाहन केलं.
महाराष्ट्रात कोणाला किती जागा?
महाराष्ट्रात महाविकास आघाडीने 48 पैकी 30 जागा मिळवत दमदार यश मिळवले. तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानवे लागले. राज्यात काँग्रेसला सर्वाधिका 13 जागा मिळाल्या. तर उद्धव ठाकरेंना 9 आणि शरद पवार यांच्या पक्षाला 8 जागा मिळाल्या. भाजपला 9, शिंदेंच्या शिवसेनेला 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एक जागा जिंकली. सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले.