एक्स्प्लोर

Maharashtra Gram Panchayat Election 2022 : राज्यातील शेकडो सरपंच, ग्रामपंचायती अन् सदस्य बिनविरोध, गावगाड्यांमधील तडजोडीला यश

Gram Panchayat Election :  राज्यातील अनेक ग्रामपंचायती, सरपंच आणि सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध निवडणुकीची परंपरा अनेक गावांनी जपली आहे. 

Gram Panchayat Electionराज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या (Maharashtra Gram Panchayat Election) सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता रविवारी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचं लक्ष आहे. या निवडणुकीचा निकाल  20 डिसेंबर रोजी लागणार आहे. आता मतदानाचा उत्साह असला तरी राज्यातील अनेक ग्रामपंचायती, सरपंच आणि सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध निवडणुकीची परंपरा अनेक गावांनी जपली आहे. 

राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किती ग्रामपंचायती, सरपंच तसेच सदस्य बिनविरोध आले आहेत. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात... 

रायगडमध्ये 50 ग्रामपंचायती बिनविरोध (Raigad Gram Panchayat Election)

रायगड जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये महाडमधील 22, श्रीवर्धन 09, म्हसळा 07 आणि श्रीवर्धन येथील चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आता जिल्ह्यात सरपंच पदासाठी 531 तर सदस्यपदासाठी 3238 उमेदवार रिंगणात आहेत. रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतीसाठी आता निवडणुका होणार आहेत. 

बीड जिल्ह्यात 34 ग्रामपंचायती बिनविरोध (Beed Parli Gram Panchayat Election) 

बीड जिल्ह्यात 34 ग्रामपंचायती निवडणुकीपूर्वी बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित 670 ग्रा.पं.साठी येत्या 18 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. 670 सरपंच पदासाठी जिल्ह्यात 1 हजार 932 उमेदवार निवडणूक लढवत आहेत तर  ग्राम पंचायत सदस्यपदासाठी 2 हजार 107 जागांसाठी 12 हजार 219 उमेदवार मैदानात आहेत.  जिल्ह्यात 185 मतदान केंद्रे संवेदनशील असून अन्य काही केंद्र अतिसंवेदनशील आहेत. अशा ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे  गोपीनाथ गड असलेली परळी तालुक्यातल्या पांगरी गावची ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आली आहे. या ग्रामपंचायतीमधील 11 पैकी 10 जागा धनंजय मुंडे यांनी बिनविरोध आपल्या ताब्यात घेतल्या असून सुशीला कराड यांची सरपंच पदी वर्णी लागली आहे. बिनविरोध ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून मोठा जल्लोष साजरा केला.  

कोल्हापूर जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायती बिनविरोध (Kolhapur Gram Panchayat Election) 

कोल्हापूर जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर करवीर आणि हातकणंगले तालुक्यात जोरदार हालचाली झाल्या आहेत. चंदगड तालुक्यातील 40 पैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यातील सहा ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा फडकलाय.  सरपंच पदासाठी 93 तर सदस्य पदासाठी 601 उमेदवार रिंगणात आहेत.

सांगली जिल्ह्यातील 28 ग्रामपंचायती बिनविरोध (Sangli Gram Panchayat Election) 

सांगली जिल्ह्यातील 447 ग्रामपंचायतींमधील 28 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील उपाळावी (मायणी), शाळगाव गावच्या ग्रामस्थांनी निवडणुकीवरच बहिष्कार घातला आहे. यामुळे आता सांगली जिल्ह्यातील 419 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे.  

सिंधुदुर्गमध्ये 44 ग्रामपंचायती बिनविरोध  (Sindhudurg Gram Panchayat Election) 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 44 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यातील 30 ग्रामपंचायतींवर भाजपचे कमळ फुलले आहे. सावंतवाडी तालुक्यातील सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 

नाशिक जिल्ह्यात 14 तालुक्यातील 196 गावांमध्ये होणार निवडणुका (Nashik Gram Panchayat Election) 

नाशिक जिल्ह्यात 14 तालुक्यातील 196 गावांमध्ये निवडणुका होणार आहेत. 7 ग्रामपंचायती संपूर्ण बिनविरोध झाल्या असून 19 गावचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. तर बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य झालेल्यांची संख्या 579 इतकी आहे.  मतदान होणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य जागांची संख्या  1291 आहे तर 177 सरपंचपदासाठी मतदान होईल. 

कोल्हापूर जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतीसाठी रणधुमाळी  (Kolhapur District Gram Panchayat Election)

कोल्हापूर जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतीसाठी रणधुमाळी जोरात सुरु आहे.  उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 23 लोकनियुक्त सरपंच आणि 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. सरपंचपदासाठी 1 हजार 456 उमेदवारांनी माघार घेतल्याने सरपंचपदासाठी 1 हजार 193 उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 7 हजार 362 उमेदवारांनी माघार घेतल्याने 8 हजार 995 उमेदवार रिंगणात आहेत. 

अमरावती जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींची निवडणूक (Amravati Gram Panchayat Election)

अमरावती जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी 14 तालुक्यांतील 2 हजार 97 पदांसाठी 4 हजार 796 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे 257 सरपंचपदासाठी तब्बल 1279 उमेदवार झुंज देत आहेत. यंदा थेट सरपंचपदाची निवडणूक असल्याने चुरस आणखी वाढली आहे.विशेष म्हणजे यापूर्वी सहा सरपंच व 413 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.  

सोलापूरमध्ये 1418 जागांसाठी मतदान (Solapur Gram Panchayat Election)

सोलापूर निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत एकूण 189 आहेत. यामध्ये 1752 जागांवर निवडणूक होईल.  त्यापैकी 329 बिनविरोध निघाल्या आहेत. उर्वरित 1418 जागांसाठी मतदान प्रक्रिया होईल.  सरपंचपद वगळून 20 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.. सरपंचसहित 15 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात 15 सरपंच बिनविरोध (Ahmednagar Gram Panchayat Election)
अहमदनगर जिल्ह्यात जिल्ह्यात 1965 सदस्यांपैकी 301 सदस्य बिनविरोध झाले, तर 15 सरपंच बिनविरोध झाले. जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत, तर 2 ग्रामपंचायतमध्ये समोरच्या पॅनलचे सर्व अर्ज बाद झाल्याने तिथेही निवडणूक बिनविरोध झाली. म्हणजे जिल्ह्यात एकूण 13 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. आता 203 पैकी 190 ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. 

अकोला : ग्रामपंचायत निवडणूक दृष्टीक्षेप  (Akola Gram Panchayat Election)
अकोला जिल्ह्यात  266 ग्रामपंचायतीची निवडणूक लागलेली आहे. यापैकी 4 सरपंच बिनविरोध झाले आहेत तर एक संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. तर 554 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.  

आणखी काही महत्वाच्या बिनविरोध झालेल्या गावांची माहिती

Washim Gram Panchayat Election:  वाशीम जिल्ह्यातील 287 ग्रामपंचायतीची निवडणूक होऊ घातली आहे.  मानोरा तालुक्यातील हातना ग्रामपंचायतीने वेगळा आदर्श ठेवत  मागील 22 वर्षांची आदर्श परंपरा कायम ठेवली आहे. 7 सदस्य व सरपंच बिनविरोध निवडून आणले असल्यान हातना ग्रामपंचायत बिनविरोध निवडून येणारी पहिली ग्राम पंचायत ठरली आहे. निवडणूक बिनविरोध झाल्याने हातना ग्राम पंचायत राज्य शासनाच्या 25 लाख रुपये बक्षिसाची मानकरी ठरली आहे.  
 
कोळपा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध 
Latur Gram panchayat Election: लातूरमधील  कोळपा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध. पोलीस ठाण्यात विजयाचा जल्लोष. पोलिसांच्या मार्गदर्शनात झाले सामंजस्य. 60 वर्षानंतर गावात बिनविरोध निवडणूक, 24 वर्षाचा तरुण सरपंचपदी, सात सदस्य आणि एक सरपंच बिनविरोध झाला आहे. लातूर जिल्ह्यातील 351 ग्रामपंचायती निवडणूक होणार आहेत.

Dhule Gram Panchayat Election: उमेदवारी अर्ज माघारी नंतर धुळे जिल्ह्यातील शिरपूर शिंदखेडा आणि साक्री ग्रामपंचायतच्या निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे अर्ज माघारीच्या दिवशी सरपंच पदाचे 14 तर सदस्य पदाच्या जवळपास 400 जागा बिनविरोध झाल्या आहेत जिल्ह्यातील 128 पैकी नऊ ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या असून आता 119 ग्रामपंचायत साठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.  धुळे तालुक्यातील बेहेड ग्रामपंचायतीमधील सरपंच पदासह सर्व सातही सदस्य बिनविरोध झाले, तर साक्री तालुक्यातील 55 ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले असून 215 सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिंदखेडा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून येथे सरपंच पदाचे दोन सदस्य पदाचे 43 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. यामुळे आता 22 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदासाठी 52 सदस्य पदासाठी 369 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  शिरपूर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतच्या माघारीच्या दिवशी सरपंच पदासाठी 59 सदस्य पदासाठी 346 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. 
 
Dhule Gram Panchayat Election:  जालना-केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या गावात 30 वर्षाची बिनविरोध परंपरा खंडित झाली आहे. 
   
Wardha Gram Panchayat Election: वर्धा जिल्ह्यात 18 डिसेंबर ला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकामध्ये 7 ग्रामपंचायतीचे सरपंच उमेदवार बिनविरोध आहेत तर सदस्य पदासाठी158 उमेदवार बिनविरोध आहेत.  जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सदस्य पदासाठी 1 हजार 480 उमेदवार रिंगणात आहेत तर सरपंच पदाकरता 339 उमेदवार हे आपले भाग्य आजमावत आहेत.  

Buldhana Gram Panchayat Election:   बुलढाणा  जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड बुजुर्क गावात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली असून या गावात नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीत सर्वच्या सर्व नऊ महिला सदस्य व सरपंच सुद्धा महिलाच निवडून आल्या आहे. विशेष म्हणजे गावातील कमी लोकसंख्या असलेल्या समाजाला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय गावकऱ्यांनी एकमताने घेतला आणि नऊ पैकी सहा महिला सदस्य यातील अतिशय कमी लोकसंख्या असलेल्या समाजातून बिनविरोध निवडून आल्यात. 

Sangli Gram Panchayat Election: : सांगलीतील ग्रामपंचायत निवडणुकीचं चित्र

आटपाडीतील दिघंची , झरे ,खरसुंडी , पडळकरवाडी या गावांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली असून दिघंचीमध्ये शिवसेना भाजपमध्ये लढाई आहे. आमदार अनिल बाबर व तानाजीराव पाटील, भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्र देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पडलकरवाडी मध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री उभ्या असून येथे त्यांची प्रतिष्ठा पणाला  लागली

*खानापूर तालुका*

खानापूर तालुक्यात 45 ग्रामपंचायत निवडणूक.त्यापैकी 8 ग्रामपंचायती बिनविरोध.

मादलमुठी, गार्डी, धोंडगेवाडी, गोरेवाडी, धोंडेवाडी, ढवलेश्वर, वासुंबे, घोटी खुर्द.

भाळवनी, लेंगरे, आलसंद मोठ्या ग्रामपंचायती आहेत तेथे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांची सत्ता आहे.

आ. अनिल बाबर व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

*तासगाव तालुका*

एकूण 26 ग्रामपंचायत निवडणूक

2 ग्रामपंचायती बिनविरोध

मनेराजुरी, वायफळे मध्ये खासदार संजयकाका पाटील आणि रोहित पाटील यांची प्रतिष्ठा पणाला

मनेराजुरी आता राष्ट्रवादी तर  वायफळे सत्ता भाजपची सत्ता


*कवठेमहांकाळ तालुका*

एकूण 28 ग्रामपंचायत निवडणूक

एकही ग्रामपंचायत बिनविरोध नाही

 बोरगाव, कुची, घाटनाद्रे  या ग्रामपंचायत।मध्ये अटीतटी

खासदार संजयकाका पाटील, रोहित पाटील, अजितराव घोरपडे गटात चुरस


*कडेगाव तालुका*

एकुण 39 ग्रामपंचायतची निवडणूक

माजी कृषी राज्य मंत्री डॉ.विश्वजित कदम
भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची प्रतिष्ठा येथे पणाला

आसद, वांगी, कडेपुर,तडसर या गावात चुरशीची निवडणूक


*वाळवा तालुका*

 एकूण 88 ग्रामपंचायत निवडणूक

7  ग्रामपंचायत बिनविरोध 


*शिराळा तालुका*

एकूण 65 ग्रामपंचायत निवडणूक

7  ग्रामपंचायत बिनविरोध

*पलूस तालुका*

एकूण 14 ग्रामपंचायत निवडणूक

1 ग्रामपंचायत बिनविरोध 

Ratnagiri Gram Panchayat Election: राजकारण्यांचे मनोमिलन; जिल्ह्यात 67 सरपंच बिनविरोध..
रत्नागिरी जिल्ह्यातील 222 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येथे जिल्ह्यात मतदान होणार आहे.यापैकी 67 गावांच्या सरपंच पदांची निवड ही राजकीय नेत्यांच्या शिष्टाईमुळं बिनविरोध झाली आहे.तसेच जिल्ह्यातील 686 प्रभागातील 1766 सदस्यांसाठी निवडणूक होणार होती मात्र 11 सदस्यांची निवड मी विरोध झालं असल्याने आता 666 सदस्यांच्या जागांसाठी जागांसाठी 1206 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.222 गावांमधून होणार निवडणूक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्ष  ग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय झाले आहेत..

लांजा तालुका
बिनविरोध - 2
वेरवली खुर्द, खावडी

निवडणूक - 17
तळवडे, कुरचुंब, सालपे, वाकेड, आरगाव, कोंडगे, रूण, बेनी बुद्रुक, वाघ्रट, आगवे, खानवली, भडे, पुनस, कुर्णे, वेरळ, निवसर, कोट

एकूण = 19

लढत - आमदार राजन साळवी यांची प्रतिष्ठा पणाला

रत्नागिरी तालुका
बिनविरोध - 6

भगवतीनगर, निरूळ, वेळवंड, सतकोडी, करबूडे, बोडये

निवडणूक - 23

गावडेआंबेरे, निवळी, साठारे, धामणसे, पूर्णगड, जांभारी, चाफेरी, गणेशगुळे, पिरंदवणे, फणसवळे, केळये, कासारवेली, चांदोर, तोणदे, मावळंगे, वेतोशी, वळके, तरवळ, विल्ये, टिके, टेम्भे, निवेंडी, मालगुंड

एकूण = 29

लढत - उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिष्ठा पणाला. शिंदे गट, भाजप विरोधात ठाकरे गट आणि महाविकास आघाडी अशी लढत

राजापूर तालुका
बिनविरोध - 9
नाणार, शिवणे बुद्रुक, तळवडे, साखर, वडवली, डोंगर, झर्ये, उपळे, कोळवणखडी,

निवडणूक - 21
मीठगवाणे, परुळे,  नाटे, वाटुळ,  कळसवली, साखरी नाटे, प्रिंदावन, शेजवली, कोतापूर देवीहसोळ, जैतापूर, हातिवले, आजिवली, ओझर,  जुगाठी, येळवण, पाचल, खरवते माडबन, विल्ये, हसोळ तर्फे सौंदळ, धाऊलवल्ली

एकूण = 30

लढत - आमदार राजन साळवी यांची प्रतिष्ठा पणाला

गुहागर तालुका

बिनविरोध - 9
कोतळुल, खोडदे, मढाळ, जांभरी, वडद, आवरे - असोरे, पालकोट - त्रिशुरा, साखरी त्रिशुळ, पाली

निवडणूक - 21
पाटपन्हाळे, आरे, धोपावे, झोंबडी, आबलोली, जानवळे, हेदवी, चिखली, कौढरकाळसुर, पोमेंडी,  पांगरी तर्फे हवेली,  वरवेली,

एकूण = 21

लढत - ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा पणाला. शिंदे गट, भाजप विरोधात ठाकरे गट आणि महाविकास आघाडी अशी लढत

चिपळूण तालुका

बिनविरोध - 13

बिवली, उमरोली, खाडोत्री, देवखेरकी, शिरवली, आंबतखोल, धामेलीकोंड, कामथे, कामथेखुर्द, डुगवे, कापरे, मालदोली

गाणे ग्रामपंचायत एकही उमेदवार गावाने दिला नाही

निवडणूक - 19
असुरडे, आबीटगाव, ओंबली, करंबवणे, कळकवणे, केतकी, खांदाटपाली, गुढे, गुळवणे, गोंधळे, ढाकमोली, नवीन कोळकेवाडी, नारदखेरकी, परशुराम, पेढे, बामणोली, भिले, वहाळ, शिरगाव

एकूण = 32

दापोली तालुका

आगरवायगंणी, आपटी, उसगांव, उंबरशेत, उंबर्ले, करजगाव, कळंबट, कादिवली, कुडावळे, करंजाणी, कोळबांद्रे, जालगाव, देहेण, टाळसुरे, पाचवली, बोडीवली, भडवळे, मुर्डी, वाझंळोली, वेळवी, विरसई, शिर्दे, शिरसाडी, सडवे, सातेरे तर्फ नातू, सारंग, सोवेली, हातीप

एकूण = 30

मंडणगड तालुका
बिनविरोध - 1
सडे

निवडणूक - 13
अडखळ, शिगवण, देव्हारे, लोकरवण, वेसवी, तिडे – तळेघर, पिंपळोली, बाणकोट, विन्हे, मुरादपूर, कुंबळे, दुधेरे – बामणघर, दहागाव

एकूण ग्रामपंचायत = 14

आमदार योगेश कदम आणि रामदास कदम यांची प्रतिष्ठा पणाला. ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत

संगमेश्वर तालुका
बिनविरोध - 15
निवळी, साखरपा, सांगवे, मेघी, बोरसूत, कुळे, माभळे, शेंभवणे, सरंद, मावळगे, गुरववाडी, पेढाबे, कासे, कुंडी, पोचरी

निवडणूक - 20
ओझरखोल, फुणगुस, शृंगारपूर, कोंडगाव, फणसट, आंबवली, पाटगांव, मुचरी, वाशी तर्फे संगमेश्वर, शिवणे, तुळसणी, किरडूवे, तांबेडी, आंबव,माखजन, कळंबुशी, शिरंबे, फणसवणे, तूरळ, राजीवली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget