एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra Election Result 2024 : नात्या गोत्यांच्या लढाईत कोण जिंकलं कोण हारलं? सविस्तर माहिती एका क्लिकवर

यावेळच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी नातेसंबंधामध्येचे सामना रंगला होता, तर अनेक ठिकाणी मंत्र्यांची मुलं, दिग्गज नेत्यांची मुलं निवडणूक लढवत असल्याचं पाहायला मिळालं. यामधील सुरुवातीचे काही कल हाती आलेत.

Maharashtra Election Result 2024 : महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभेचे बहुतांश निकाल हाती आले आहेत. यामध्ये महायुतीनं जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे.  दरम्यान, यावेळच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी नातेसंबंधामध्येचं सामना रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. तर अनेक ठिकाणी भाऊ-भाऊ, मंत्र्यांची मुलं, नातेवाई निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळालं होतं. या नात्या गोत्यांच्या लढाईत नेमकं कोण जिंकलं आणि कोण हारलं? याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. 

1) अजित पवार विजयी, युग्रेंद्र पवारांचा पराभव

संपूर्ण महाराष्ट्राचं ज्या लढतीकडं लक्ष लागलं आहे, ती लढत म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघातील लढत. या मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत अजित पवार विजयी झाले आहेत. 1 लाखाहून अधिक मतांचं मताधिक्क्य अजित पवार यांनी घेतलं आहे. त्यांनी पुतणे युगेंद्र पवारांचा मोठा पराभव केला आहे. 

2) संदीप क्षीरसागर विरुद्ध डॉ. योगेश क्षीरसागर

बीड विधानसभा मतदारसंघाकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू  डॉ. योगेश क्षीरसागर हे महायुतीचे उमेदवार आहेत. ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. 

3) किशोर पाटील आघाडीवर वैशाली सूर्यवंशी पिछाडीवर 

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदारसंघातील लढत देखील महत्वपूर्ण मानली जातेय. या मतदारसंघात शिवसेनेचे शिंदे गटाकडून विद्यमान आमदार किशोर पाटील यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.  तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून त्यांच्याच भगिनी वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाऊ विरुद्ध बहीण असा सामना रंगत आहे. दरम्यान, हाती आलेल्या कलानुसार किशोर पाटील हे आघाडीवर आहेत, तर त्यांच्या बहिण वैशाली सूर्यवंशी पिछाडीवर आहेत.

4) धर्मरावबाबा आत्राम विजयी, मुलगी भाग्यश्री आत्रामांचा पराभव

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आमदार धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम हे निवडणूक लढवत होते. तर त्यांच्या विरोधात त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत होत्या. या लढतीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.  दरम्यान, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम हे विजयी झाले आहेत. त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांचा पराभव झाला आहे. 

5) विजयसिंह पंडीत विरुद्ध काका बदामराव पंडीत यांच्यात लढत

बीडच्या गेवराई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून बदामराव पंडित (UBT) हे निवडणूक लढवत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून त्यांचे पुतणे विजयसिंह पंडित निवडणूक लढत आहे. या लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

6) ठाकरे परिवारातील तिघेजण मैदानात

वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या मिलिंद देवरा यांचा पराभव केला आहे. तर मनसेकडू संदीप देशपांडे देखील निवडणूकीच्या मैदानात होते. त्याचबरोबर दुसीरकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ते शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत यांच्या विरोधात निवडणूक लढवत होते. या मतदारसंघात अमित ठाकरेंचा पराभव झाला आहे. ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झालेत. तर आदित्य ठाकरे यांचे मावस बंधू वरुण सरदेसाई हे देखील वांद्रे विधानसभा मतदारसंघातून निवडणू लढवत आहे. त्यांच्या विरोधात अजित पवार गटाचे झिशान सिद्दीकी हे मैदानात आहेत. 

7) अमित देशमुख आणि धीरज देशमुख दोघेही बंधू निवडणुकीच्या मैदानात

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे दोन पुत्र विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. लातूर शहर मतदारसंघातून विद्यमान आमादर अमित देशमुख निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात अर्चना पाटील चाकूरकर निवडणूक लढवत आहे. त्या मादी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुन आहेत. तर दुसरीकडे लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज विलासराव देशमुख निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे रमेश कराड निवडणूक लढवत आहेत.

8) आशिष शेलार विजयी, त्यांचे बंधू विनोद शेलार पराभूत 

भाजपने आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिममधून तर त्यांचे बंधू विनोद शेलार यांना मालाड पश्चिममधून उमेदवारी जाहीर केली होती. यामध्ये आशिष शेलार विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांचा पराभव केला आहे. तर विनोद शेलार यांचा पराभव झाला आहे. त्यांचा पराभव काँग्रेसचे तीन टर्म आमदार असलेले विद्यमान आमदार अस्लम शेख यांना केला आहे.

8) नितेश राणे आणि निलेश राणे दोन्ही बंधू विजयी

कोकणात राणे कुटुंबाची ताकद पुन्हा वाढली आहे. नितेश राणे आणि निलेश राणे हे दोन्ही बंधू विजयी झाले आहेत. नितेश राणे कणकवली विधानसभा मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाने संदेश पारकर यांचा पराभव केला आहे. तप निलेश राणे यांनी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांचा पराभव केला आहे. 

9)  भाजप खासदार अशोक चव्हाणांची मुलगी भोकरमधून विजयी

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या भोकर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसचे तिरुपती उर्फ पप्पू कोंढेकर यांचा पराभव केला आहे. 

10) माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंचा पराभव

माजी मंत्री आणि राष्ट्रकवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विद्यमान आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या. या मतदारसंघात त्यांचा पराभव झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार चंद्रकांत पाटील हे पुन्हा विजयी झाले आहेतय

11) नवाब मलिकांचा परभाव तर मुलगी सना मलिक यांचा विजय

माजी मंत्री नवाब मलिक आणि त्यांची मुलगी हे दोघेही यावेळी वेगवेगळ्या मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती.  अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक निवडणूक आल्या आहेत. त्यांच्या विरोधात राजकारणात नवीन प्रवेश केलेले फहाद अहमद हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून उभे होते. पण त्यांचा पराभव झाला आहे. तर मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून नबाव मलिक निवडणूक लढवत होते. पण शिवसेना शिंदे गटाच्या सुरेश (बुलेट) पाटील यांनी त्यांचा पराभव केला आहे.

12) रावसाहेब दानवेंचा मुलगा संतोष दानवे विजयी

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा आणि विद्यमान आमदार संतोष दानवे हे भोकरदन विधानसभा मतदारसंघून विजयी झाले आहेत. त्यांनी शरद पवार राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत दानवे यांचा पराभव केला आहे.

13) येवल्यातून छगन भुजबळ विजयी तर नांदगावमधून समीर भुजबळांचा पराभव 

येवला विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ विजयी झाले आहेत. त्यांनी  शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांचा पराभव केला आहे. दुसरीकडे छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे नांदगाव विधानभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत होते. त्यांचा शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे यांनी पराभव केला आहे.  

14) ऐरोलीतून गणेश नाईकांचा विजय तर बेलापूरमधून संदीप नाईकांचा पराभव

मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गणेश नाईक विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे एम के मढवी यांचा पराभव केला आहे. तर गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक हे बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. त्यांचा भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रेयांनी पराभव केला आहे. 

15) कोटोलमधून अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख रिंगणात

नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपनं चरणसिंग ठाकूर यांना तिकीट दिलं आहे. त्याचबरोबर अनिल देशमुख यांचे चुलत बंधू माजी मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र आशिष देशमुख हे सावनेरमधून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसमधून बंडखोरी करत त्यांचेच सख्खे बंधू अमोल देशमुख हे निवडणूक लढवत आहेत, तर काँग्रेसकडून सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार निवडणूक लढवत आहेत.   

16) हितेंद्र ठाकूर वसईतून तर नालासोपारातून त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूरांचा पराभव

बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर हे वसई विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीकडून भाजपच्या उमेदवार स्नेहा दुबे आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार विजय पाटील निवडणूक लढवत होते. स्नेहा दुबे या विजयी झाल्या आहेत. तर नालासोपारातून हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर यांचा पराभव झाला आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे राजन नाईक निवडून आले आहेत.

17) जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरेंचा राहुरीतून पराभव

राहुरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांचा पराभव झाला आहे. भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांनी त्यांचा पराभव केला आहे.

18) माजी मंत्री बबनराव पाचपुतेंचे पुत्र विक्रम पाचपुते विजयी

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे पुत्र विक्रम पाचपुते हे भाजपकडून श्रीगोंदा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. त्यांनी मोठ्या मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी  शिवसेना ठाकरे गटाकडून अनुराधा नागवडे यांचा पराभव केला आहे.  

19) पारनेरमधून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंकेंचा पराभव

पारनेर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा पराभव झाला आहे. अजित पवार गटाचे काशिनाथ दाते हे विजयी झाले आहेत.  

20) माजी मंत्री मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचड अकोलेतून रिंगणात

माजी मंत्री मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचड हे अकोले विधानसभा मतदारसंघातून  अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे किरण लहामटे निवडणूक लढवत आहेत. तर शरद पवार गटाकडून अमित भांगरे निवडणूक लढवत आहेत.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Embed widget