एक्स्प्लोर

Mumbai Exit Poll Result 2024: मुंबईत कुणाची बाजी, कुणाला किती जागा मिळणार? सर्व एक्झिट पोलचे आकडे एकाच ठिकाणी

Maharashtra Election Mumbai Exit Polls Results 2024: राज्यातील मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर वेगवेगळ्या संस्थांने केलेले एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत.

Maharashtra Election Mumbai Exit Polls Results 2024 मुंबई: गेल्या अनेक दिवासांपासून राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार केला जात होता. आज (20 नोव्हेंबर) या निवडणकुसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे या निवडणुकीसाठी मतदान केले.  दरम्यान, आता राज्यातील मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर वेगवेगळ्या संस्थांने केलेले एक्झिट पोलचे (Exit Polls) अंदाज समोर आले आहेत. या एक्झिट पोलच्या माध्यमातून धक्कादायक अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. (Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024)

मुंबई जिल्ह्यात एकूण 36 मतदारसंघ येतात. त्यापैकी 10 मुंबई शहरात आणि उर्वरित 26 मतदारसंघ मुंबई उपनगरात येतात. महाविकासआघाडी आणि महायुतीने मुंबईतील 36 जागांवर उमेदवार जाहीर केले होते. यात शिवसेना ठाकरे गटाचे 22, काँग्रेस 11 आणि शरद पवार गट 2 तसेच एका जागेवर समाजवादी पार्टीने उमेदवार दिला आहे. तर महायुतीकडून भाजप 18, शिंदे गट 16 आणि अजित पवार गट 2 जागांवर उमेदवार रिंगणात होते. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत 25 उमेदवार रिंगणात उतरवले. (Mumbai Region Exit Poll Results)

एसएएस ग्रुपच्या एक्झिट पोलच्या अंदाजानूसार मुंबईत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. एसएएस ग्रुपच्या एक्झिट पोलनूसार महाविकास आघाडीला मुंबईत 18-19 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर महायुतीला 17-18 जागा मिळणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत इतरांना 1-2 जागा मिळणार असल्याचं एसएएस ग्रुपच्या एक्झिट पोलच्या अंदाजानूसार दिसून येत आहे.

एसएएस ग्रुपचा एक्झिट पोल-

मुंबई   (एकूण जागा 36)

मविआ 18-19
महायुती 17-18
इतर 1-2

लोकशाही रुद्र एक्झिट पोलच्या अंदाजानूसार-

मुंबई - (एकूण जागा 36)

भाजप - 12
शिवसेना (शिंदे गट) - 02
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 01
काँग्रेस - 02 
शिवसेना (ठाकरे गट ) 14
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 01
इतर- 04

झी एआय एक्झिट पोलचा मुंबईतील अंदाज काय?

झी एआयच्या एक्झिट पोलच्या अंदाजानूसार मुंबईत महायुतीला 15-20, महाविकास आघाडीला 15-20 आणि इतरांना 0-1 जागा मिळण्याची शक्यती वर्तवण्यात आली आहे.

कोणी किती जागा लढवल्या?

महायुतीमध्ये भाजप 148, शिंदेंची शिवसेना 81, अजित पवारांची राष्ट्रवादी 59 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 101, शिवसेना ठाकरे गट 95 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 86 जागांवर निवडणूक लढवली. यांसह, एमआयएमने 17 जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर, बहुजन समाज पक्षाने 237 जागांवर उमेदवार दिले आहेत. वंचित बहुजन आघाडी, मनसे आणि परिवर्तन महाशक्ती पक्षाकडून मोठ्या संख्येने उमेदवार देण्यात आले होते.

संबंधित बातमी:

Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: मनसे मुसंडी मारणार की नाही, राज ठाकरे किंगमेकर ठरणार? एक्झिट पोलचे आकडे समोर, किती जागा मिळणार?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget