(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Live Updates : मुंबईच्या टिळक भवन येथे काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची बैठक
Maharashtra Election Results News Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
LIVE
Background
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीला बहुमत मिळाले आहे. बहुमताचा आकडा गाठला असला तरी महायुतीने अद्याप आपल्या सरकारची स्थापना केलेली नाही. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरत नसल्यामुळे सरकारची स्थापना लांबवणीवर पडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात राज्यात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जवळपास निश्चित झालेला आहे. मात्र अद्याप त्याची घोषणा झालेली नाही. दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांमध्ये मंत्रिपदासाठी शर्यत लागलेली आहे. या प्रमुख घडामोडी तसेच राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
नाशिकच्या पंचवटी खून प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
#नाशिक खून अपडेट...
नाशिक शहर पोलिसांची मोठी कारवाई,नाशिकच्या पंचवटी येथील खून प्रकरणातील इतर तीन आरोपी पोलिसांनी घेतले ताब्यात...
नाशिकच्या पंचवटी परिसरात दोन दिवसांपूर्वी किरकोळ वादातून निशांत भोये या युवकाची डोळ्यात मिरचीची पूड टाकून घरदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली होती या संदर्भात नाशिक गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाना मोठी कामगिरी केली आहे या पुण्यातील पाच आरोपींना जेरबंद करण्यात नाशिक शहर पोलिसांना यश आले आहे. नाशिक शहर पोलिसांचे पथक दोन दिवसांपासून मारेकऱ्यांच्या मागावर होते अखेर नाशिकच्या येवला तालुक्यात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
नाशिककरांनो पाणी जपून वापरा, शहरात शनिवारी पाणीबाणी!
नाशिक ब्रेकिंग...
- नाशिक शहरात शनिवारी पाणीपबाणी, दिवसभर पाणीपुरवठा शहरात राहणार बंद...
- स्मार्ट सिटी कंपनी आणि मनपा पाणीपुरवठा वितरण विभागाच्या माध्यमातून जलशुद्धी केंद्रावर करण्यात येणार दुरुस्तीची कामे
- नाशिक शहरात बूस्टर पंपिंग, प्लास्टिक वॉल कंपाऊंड, पाणी गळती असे विविध कामे करण्यात येणार
- शटडाऊन कालावधी शनिवारी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत राहणार...
- नागरिकांनी मनपा प्रशासनाला सहकार्य करावे अधिकार प्रशासनाचे नाशिककरांना आवाहन...
भाज्यांचे दर कडाडले! आवक घटल्यानं किलोमागे गाठली शंभरी, पहा भाव
अहिल्यानगर
राज्यात थंडीचा कडाका वाढत असतानाच भाज्यांचे दरही वाढत आहेत... 40 ते 60 रुपये किलो दराने मिळणारी भाजी 100 ते 120 रुपये किलो पर्यंत पोहोचली आहे...
शेवगा तब्बल 400 रुपये किलो पर्यंत पोहोचला आहे... तर गवारीची शेंग देखील 160 ते 200 रुपये किलो पर्यंत पोहोचली आहे... भाज्यांची आवक कमी होत असल्याने ही दरवाढ झाली आहे... अहिल्यानगरच्या दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये थंडीमुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे... शेवगा, लसुन आणि गवार याच्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे.... घाऊक बाजारात लसुन 400 रुपये, शेवगा 300 रुपये, गवार 100 ते 125, वाटाणा 80 ते 90 रुपये असून इतर भाजीपाल्याचे भाव चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत स्थिर आहेत... नागपूर, पुणे, नाशिक लासलगाव, करमाळा तसेच नगर तालुक्यातील काही भागातून भाजीपाल्याची आवक होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे...आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्याला सध्या चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दहावीच्या परीक्षेला होमसेंटर यावं यासाठी शाळेला टाळे ठोकत गावबंद आंदोलन!
धाराशिव :
तडवळेकरांचा परीक्षा केंद्रासाठी रस्त्यावर ठिय्या
गावात दहावीपर्यंतची शाळा आहे मात्र मुलांना परीक्षेसाठी परगावी जावं लागतं. या विरोधात धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळा येथील ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकत गावबंद आंदोलन केलं. तसेच काही काळ ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदवला. धाराशिव जिल्ह्यातील तडवळे गावात दहावीपर्यंतची शाळा आहे. मात्र परीक्षा केंद्र नाही. परीक्षेसाठी येथील मुलांना ढोकी येथील परीक्षा केंद्रावर जावं लागतं. परीक्षेला जात असताना अनेक अपघाताच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे दहावीचे परीक्षा केंद्र गावातच असावं अशी गावकऱ्यांची मागणी आहे. मागणीची दखल घेतली जात नसल्याने संतप्त होत गावकऱ्यांनी आज शाळेला टाळे ठोकत गावबंद आंदोलन केलं. परीक्षा केंद्रासाठी लागणारी पटसंख्या शाळेची आहे. आजूबाजूच्या गावातूनही विद्यार्थी तडवळा येथे शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी दहावीची बोर्ड परीक्षा गावातच व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिक्षण विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे त्याबाबतची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय आज दिल्लीत
ब्रेक
काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय आज दिल्लीत होणार
त्यासाठी इकडे शिंदे चार वाजता दिल्लीला रवाना होणार
कालच पत्रकार परिषद घेऊन अमित शहा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचे एकदा शिंदे यांनी केले होते जाहीर
त्यानुसार आज महायुतीच्या तिन्ही नेत्यांची अमित शहा यांच्याबरोबर संध्याकाळी दिल्लीत होणार बैठक
महायुतीच्या सत्ता स्थापने संदर्भात अतिशय महत्त्वाचे निर्णय आज घेतले जाणार