Maharashtra News Live Updates : नवाब मलिक यांचं ट्विटर हँडल हॅक, निलोफर मलिक यांची एक्सच्या माध्यमातून माहिती
Maharashtra News Live Updates : आज घडणाऱ्या राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
LIVE

Background
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यभरात प्रचार शिगेला पोहोचला आहे. सभा, बैठका, कॉर्नर सभांमध्ये नेतेमंडळी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसतायत. याच टीकेला नेतेमंडळी तेवढ्याच क्षमतेने उत्तर देताना दिसतायत. दरम्यान, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. खासदार शरद पवार यांची शेवटची सांगता सभा बारामतीमध्ये होणार आहे. त्यामुळे शरद पवार नेमकी काय भूमिका जाहीर करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
नवाब मलिक यांचं ट्विटर हँडल हॅक, निलोफर मलिक यांची एक्सच्या माध्यमातून माहिती
नवाब मलिक यांचं ट्विटर हँडल हॅक
निलोफर मलिक यांची एक्सच्या माध्यमातून माहिती
निलोफर मलिक यांच कार्यकर्त्याना दक्षता घेण्याच आवाहन
मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडले
मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडले
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील विडी घरकुल परिसरात रात्री उशिरा घडला प्रकार
पैसे वाटप करणारे व्यक्ती हे सोलापूर उत्तरचे भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख यांचे बंधू असल्याचा शरद पवार गटाचा आरोप
मात्र विजयकुमार देशमुख यांच्या बंधुवर कोणतीही कारवाई न करता कार्यकर्त्यावर पोलीस कारवाई करतं असल्याचा ही शरद पवार गटाचा आरोप
या संदर्भात पोलीस आयुक्त आणि निवडणूक आयोगाला तक्रार देणार असल्याची शरद पवार गटाचे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांची माहिती
विधानसभा प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, आशिष शेलार यांच्याकडूनदेखील प्रचार रॅली
विधानसभा प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
सगळेच उमेदवार शक्तीप्रदर्शन करताना पाहायला मिळत आहेत
वांद्रे पश्चिमचे भाजपचे उमेदवार आणि मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून देखील प्रचार रॅली काढली जाणार आहे
मराठी कलाकारांसोबत आशिष शेलार प्रचार रॅली काढतील
यावेळी ज्येष्ठ गायक पं. सुरेश वाडकर, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, अभिनेते अजिंक्य देव, शरद पोंक्षे, नंदेश उमप, पुष्कर श्रोत्री, वैभव तत्ववादी, आदिनाथ कोठारे, गौरव मोरे, किशोरी शाहाणे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांची हजेरी पाहायला मिळेल
वीज अभ्यासक प्रताप होगाडे यांचे निधन..
वीज अभ्यासक प्रताप होगाडे यांचे निधन..
वीज तज्ज्ञ आणि वीज बिलांचे गाढे अभ्यासक म्हणून प्रताप होगाडे यांची ओळख.
आज सकाळी सात वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यांन इचलकरंजीत दुःखद निधन
उद्धव ठाकरे यांची आज कर्जतमध्ये तोफ धडाडणार
उद्धव ठाकरे यांची आज कर्जतमध्ये तोफ धडाडणार
मविआचे उमेदवार नितीन सावंत यांच्या प्रचारसभेला ठाकरे करणार संबोधित
आदित्य ठाकरे यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे कोणावर तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष
महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्यावर आदित्य ठाकरे यांनीसुद्धा डागले होते टीकास्त्र... त्यानंतर उद्धव ठाकरे सुध्दा काय बोलणार याकडे लक्ष
उद्धव ठाकरे यांची शेवटची सभा ठरणार लक्षवेधी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
