Maharashtra News Live Updates : अमित शाहांच्या सर्व सभा रद्द, तातडीने नागपूरला निघाले
Maharashtra News Live Updates : आज घडणाऱ्या राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

Background
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहोचला आहे. आजचा दिवस सोडला तर प्रचारासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. याच कारणामुळे सध्या राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख नेतेमंडळी दिवसारत्र एक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या राज्यातील वेगवेगळ्या भागात सभा, कॉर्नर बैठका, रॅली यांचे सत्र चालू आहे. या सभांमध्ये नेतमंडळी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसतायत. या आरोप-प्रत्यारोपांना तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले जात आहे. या प्रमुख घडामोडींचे तसेच इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर....
नायजेरियाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार जाहीर
नायजेरियाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर (GCON) हा पुरस्कार जाहीर
क्वीन एलिझाबेथ यांच्यानंतर नरेंद्र मोदी ठरले दुसरे परदेशी व्यक्ती ज्यांना नायजेरियाकडून हा पुरस्कार मिळणार आहे
1969 मध्ये हा पुरस्कार एलिझाबेथ यांना मिळाला होता
पंतप्रधान मोदींना विदेशाकडून प्रदान करण्यात येणारा हा 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असेल
हिंगोली आणि परभणी च्या सीमेवर रोकड जप्त
हिंगोली जिल्ह्यात आज सकाळच्या सुमारास मुंबईहून नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स मध्ये रोकडची वाहतूक केली जात होती तपासणी केल्यानंतर पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम एक कोटी रुपये पर्यंत असू शकते. हिंगोली पोलिसांच्या वतीने जिल्ह्याचे सीमेवर जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची झाडाझटी घेतली जात आहे. त्यानुसार ही ट्रॅव्हल्स आज सकाळच्या सुमारास मुंबईहून नांदेड च्या दिशेने जात असताना हिंगोलीच्या चेक पोस्टवर तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात रोकड असल्याचं आढळून आलं आहे. आता या प्रकरणी निवडणूक विभागाचे अधिकारी आणि पोलीस या रक्केची मोजणी करत आहेत.




















