एक्स्प्लोर

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर, सणसुद असल्यानं तारीख जाहीर नाही; निवडणूक आयोगाची माहिती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात दिवाळीनंतर विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य केंद्रीय निवडणूक आयोगानं केलं आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुंबई : लोकसभा, विधानपरिषदेच्या निवडणुकांनंतर आता संपूर्ण राज्याचं लक्ष आगामी विधानसभा निवडणुकांकडे लागलं आहे. शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत, जम्मू काश्मीर आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानं कोणतीही घोषणा केली नाही. 2019 ला हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुका एकत्रच पार पडल्या होत्या. अशातच यंदाही दोन्ही राज्यांतील निवडणुका एकत्रच पार पडणार, असं बोललं जात होतं. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगानं हरियाणातील निवडणुकांची घोषणा केली, पण महाराष्ट्रातील निवडणुका कधी? त्या लांबणीवर पडल्यात का? असा प्रश्न सर्वांच्या मनात होता. 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबाबत राजीव कुमार यांना दोनवेळा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर त्यांनी यंदा हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका एकत्र का नाहीत? यावर मौन सोडलं. महाराष्ट्रात दिवाळीनंतर विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य केलं आहे. तसेच, गणेशोत्सव, दिवाळी आणि पितृपक्ष असल्यानं अजून तारीख जाहीर झालेली नाही, असंही निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानं नेमकं काय म्हटलं? 

महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यातील विधानसभेची निवडणूक 2019 मध्ये सोबत जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी निवडणूक आयोगासमोर जम्मू काश्मीच्या विधानसभा निवडणुकीचा मुद्दा नव्हता. यावेळी पाच राज्यांच्या निवडणुकांचा विषय निवडणूक आयोगासमोर होता. महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंड आणि दिल्लीची निवडणूक आयोजित करायची आहे. सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्त याचा विचार करता हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक सोबत जाहीर करत आहोत. 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला असता तिथं पाऊस झाला होता त्यामुळं बीएलओची कामं पूर्ण झालेली नाहीत.अनेक सण आहेत हा देखील मुद्दा असून गणेशोत्सव,पितृपक्ष, नवरात्री, दिवाळी आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन दोन राज्यांच्या निवडणुका सोबत जाहीर करण्याचा घेण्याचा निर्णय घेतला, असं राजीव कुमार म्हणाले.

जम्मू काश्मीर आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर 

  • जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 24, दुसऱ्या टप्प्यात 26 आणि तिसऱ्या टप्प्यात 40 मतदारसंघात मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 29 सप्टेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला होईल. तर जम्मू काश्मीर विधानसभेचा निकाल 4 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.  
  • हरियाणातील 90 जागांसाठी एका टप्प्यात मतदान पार पडेल. मतदान  1  ऑक्टोबरला होईल. तर, मतमोजणी 4 ऑक्टोबरला होणार आहे. हरियाणात सध्या भाजपचं सरकार आहे. तिथं काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget