एक्स्प्लोर

Sanjay Raut : शिवडीतून पत्ता कट झाल्यानंतर सुधीर साळवींची समर्थकांना भावनिक साद, संजय राऊत म्हणाले; काही हरकत नाही...

Sanjay Raut on Sudhir Salvi : शिवडी विधानसभा मतदारसंघात अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यात उमेदवारीसाठी चुरस होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांना संधी दिली आहे.

मुंबई : शिवडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार अजय चौधरी (Ajya Chaudhari) आणि सुधीर साळवी (Sudhir Salvi) यांच्यात उमेदवारीसाठी चुरस होती. मात्र, गुरुवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अजय चौधरी यांची उमेदवारी जाहीर केली. यानंतर शिवडीतील (Shivdi Vidhan Sabha) सुधीर साळवी यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले. आता सुधीर साळवी आपल्या समर्थकांशी जाहीर संवाद साधणार आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

संजय राऊत म्हणाले की, सुधीर साळवी शिवसेनेपेक्षा वेगळे नाहीत. साळवी हे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि आमचे सहकारी आहेत. त्या मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुखांनी विद्यमान आमदार अजय चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. एखाद्या मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक असतात. मला वाटत नाही ते रागावले आहेत, इच्छा व्यक्त करणे हा काही गुन्हा नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

सगळा विचार करूनच अजय चौधरींना उमेदवारी

शिवडी विधानसभा मतदारसंघात स्थानिक शिवसैनिकांची मागणी होती की, नवा चेहरा हवा, याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अशी मागणी आमच्यापर्यंत आलेली नाही. ती तुमच्यापर्यंत आली असेल. अजय चौधरी हे ज्येष्ठ आमदार आहेत. सगळा विचार करूनच उद्धव ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली असल्याचे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले. 

बोलू द्या, काही हरकत नाही बोलायला

सुधीर साळवे यांनी आज एका मेळाव्याच्या आयोजन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की मला तुमच्याशी बोलायचं आहे. याबाबत विचारले असता 'बोलू द्या, काही हरकत नाही बोलायला. शिवसैनिकांशी जर एखादा ज्येष्ठ शिवसैनिक संवाद साधतोय तर त्याचा फायदा शिवसेनेच्या उमेदवारालाच होणार आहे', असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

सुधीर साळवी काय निर्णय घेणार? 

दरम्यान, सुधीर साळवी यांनी सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये सुधीर साळवी यांनी आपल्या समर्थकांना साद घातलीय. 'माझ्या प्रिय, शिवडी विधानसभेतील निष्ठावंत शिवसैनिकांनो, मला तुमच्याशी बोलायचं आहे!', असा मजकूर या पोस्टमध्ये लिहिला आहे. शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजता लालबाग मार्केटमधील शिवसेना शाखेजवळ सुधीर साळवी हे आपल्या समर्थकांशी जाहीर संवाद साधतील. यावेळी ते नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

Amit Thackeray: अमित ठाकरेंना उद्धव काकांबाबत काय वाटतं? म्हणाले, ते कसे आहेत तेव्हाच मला कळालं, म्हणून....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिक मध्य मतदारसंघात ठाकरेंकडून वसंत गितेंना तिकीट, काँग्रेसच्या हेमलता पाटलांना अश्रू अनावर; पक्ष श्रेष्ठींकडे केली मोठी मागणी
नाशिक मध्य मतदारसंघात ठाकरेंकडून वसंत गितेंना तिकीट, काँग्रेसच्या हेमलता पाटलांना अश्रू अनावर; पक्ष श्रेष्ठींकडे केली मोठी मागणी
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : अजित पवारांचा धमाका, दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
मोठी बातमी : अजित पवारांचा धमाका, दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
Shivadi Vidhan sabha: मोठी बातमी: अजय चौधरी आता सुधीर साळवींना भेटणार, लालबागच्या मेळाव्यापूर्वी घडामोडींना वेग
मोठी बातमी: अजय चौधरी आता सुधीर साळवींना भेटणार, लालबागच्या मेळाव्यापूर्वी घडामोडींना वेग
Sharad Pawar: मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवार पक्ष उमेदवार देणार नाही तर..., बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार?
मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवार पक्ष उमेदवार देणार नाही तर..., बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Full PC : जेवढं काम करणं शक्य होतं ते करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलाABP Majha Headlines :  1 PM : 25 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सHemlata Patil Nashik : नाशिक मध्यची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला; हेमलता पाटील नाराजHingoli Cash Seized : हिंगोलीत 1 कोटी 40 लाखांची रोकड जप्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिक मध्य मतदारसंघात ठाकरेंकडून वसंत गितेंना तिकीट, काँग्रेसच्या हेमलता पाटलांना अश्रू अनावर; पक्ष श्रेष्ठींकडे केली मोठी मागणी
नाशिक मध्य मतदारसंघात ठाकरेंकडून वसंत गितेंना तिकीट, काँग्रेसच्या हेमलता पाटलांना अश्रू अनावर; पक्ष श्रेष्ठींकडे केली मोठी मागणी
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : अजित पवारांचा धमाका, दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
मोठी बातमी : अजित पवारांचा धमाका, दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
Shivadi Vidhan sabha: मोठी बातमी: अजय चौधरी आता सुधीर साळवींना भेटणार, लालबागच्या मेळाव्यापूर्वी घडामोडींना वेग
मोठी बातमी: अजय चौधरी आता सुधीर साळवींना भेटणार, लालबागच्या मेळाव्यापूर्वी घडामोडींना वेग
Sharad Pawar: मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवार पक्ष उमेदवार देणार नाही तर..., बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार?
मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवार पक्ष उमेदवार देणार नाही तर..., बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार?
Sanjay Raut : शिवडीतून पत्ता कट झाल्यानंतर सुधीर साळवींची समर्थकांना भावनिक साद, संजय राऊत म्हणाले; काही हरकत नाही...
शिवडीतून पत्ता कट झाल्यानंतर सुधीर साळवींची समर्थकांना भावनिक साद, संजय राऊत म्हणाले; काही हरकत नाही...
Sudhir Salvi: सुधीर साळवींच्या पोस्टरमधील ठळक लाल अक्षरातील 'निष्ठावंत' शब्दाने लक्ष वेधलं, मशाल की धनुष्यबाण, आज लालबागमध्ये काय घडणार?
सुधीर साळवींच्या पोस्टरमधील ठळक लाल अक्षरातील 'निष्ठावंत' शब्दाने लक्ष वेधलं, मशाल की धनुष्यबाण, आज लालबागमध्ये काय घडणार?
अजितदादांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला,  मनोहर चंद्रिकापुरेंचा आरोप
अजितदादांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला, मनोहर चंद्रिकापुरेंचा आरोप
Balasaheb Thorat : 'बाप'नंतर 'दहशत'वरून राजकारण पेटणार, बाळासाहेब थोरातांचा सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले...
'बाप'नंतर 'दहशत'वरून राजकारण पेटणार, बाळासाहेब थोरातांचा सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले...
Embed widget