PM Narendra Modi : काँग्रेसकडून एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवण्याचा खतरनाक खेळ; PM मोदींचा गंभीर आरोप, 'एक है तो सेफ है'चा दिला नारा
PM Narendra Modi in Dhule : ओबीसी समाज वेगवेगळ्या जातीत लढावे, एससी समाज वेगवेगळ्या जातीत विखुरला जावा, यासाठी काँगेस काम करत असल्याचा हल्लाबोलही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय.
धुळे : एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवण्याचा खतरनाक खेळ काँग्रेस (Congress) खेळत आहेत. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांनी दलित आणि मागासवर्गीयांसाठी आरक्षण आणले. त्यासाठी त्यांना लढावे लागले. ओबीसींना प्रतिनिधित्व न मिळावे यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले. इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्यानंतर राजीव गांधी आले, त्यांनीही ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) खून केला, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलाय. धुळे येथे आयोजित महायुती उमेदवारांच्या प्रचार सभेतून ते बोलत होते.
नरेंद्र मोदी म्हणाले की, भाजपची 'सबका साथ सबका विकास' ही भूमिका आहे. आदिवासी समाजाने देशाच्या विकासासाठी कामे केले. काँग्रेसने आदिवासी गौरवासाठी कधी काम केले नाही. जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार आले, तेव्हा पहिल्यांदा आदिवासी मंत्रालय बनले. आमच्या सरकारने बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे कार्यक्रम केले. भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती साजरी करणार आहोत. वन पट्ट्याचा लाभ आदिवासी समाजाला मिळेल यासाठी आम्ही काम केले. द्रौपदी मुर्मु या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्या. त्यांना हरविण्यासाठी काँग्रेसने ताकद लावली होती. त्यांचा अपमान केला. ही त्यांची जुनी सवय आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हरविण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले.
पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर गंभीर आरोप
एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवण्याचा खतरनाक खेळ काँग्रेस खेळत आहेत. मात्र हे पुढे गेलेले काँगेसला आवडत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित आणि मागासवर्गीयांसाठी आरक्षण आणले. त्यासाठी त्यांना लढावे लागले. ओबीसींना प्रतिनिधित्व न मिळावे यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले. इंदिरा गांधी यानंतर राजीव गांधी आले, त्यांनीही ओबीसी आरक्षणाचा खून केला. ओबीसी आरक्षण आले असते तर त्यांचे दुकानं बंद झाले असते. आता त्यांच्या घरातील चौथी पिढी तेच करत आहे. एससी, ओबीसी समाजाची एकता तुटली जावी, यासाठी काँगेस काम करत आहे. ओबीसी समाज वेगवेगळ्या जातीत लढावे, यासाठी काँगेस काम करत आहेत. एससी समाज वेगवेगळ्या जातीत विखुरला जावा, यासाठी काँगेस काम करत आहेत.
एक है तो सेफ है
भिल, कोळी, महादेव, कोकणा, कोकणी, पारधी, अशा अनेक आदिवासी जाती एकत्र धुळेमध्ये राहतात, काँग्रेस यांना एकमेकांशी लढविण्याचा प्रयत्न करत आहे. आदिवासींची ओळख तोडण्याचं काम काँग्रेस करत आहेत. देशातील आदिवासी जाती एकमेकांशी लढत राहाव्या, हा काँगेसचा अजेंडा आहे. धर्माच्या नावावर काँग्रेसने असे केले तेव्हा देशाचा फाळणी झाली होती, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक है तो सेफ है, अशी नवी घोषणा दिली.
आणखी वाचा