Maharashtra Assembly Elections 2024 : मतदार यादीत नाव कसं शोधायचं? ओळखपत्र नसेल तर 'ही' 12 ओळखपत्र मतदानाला चालणार? वाचा सविस्तर
Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यभरात उद्या म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी मतदार यादीत तुमच नाव आहे का? तसेच, त्यासाठी इतर कोणते ओळखपत्र असावेत? हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तपासू शकता.
Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यभरात उद्या म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. (Vidhan Sabha Elections 2024) निवडणुकांच्या वेळी मतदार हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. मतदारांनी दिलेल्या मतांवर नेते निवडून येतात. निवडणुका जाहीर झाल्या की मतदार यादी देखील जाहीर होते आणि ही मतदार यादी प्रत्येक वेळी बदलत असते. काही वेळा अचानक बऱ्याच जणांची नावं मतदार यादीतून गहाळ होतात, त्यामुळे मतदार यादीत तुमच नाव आहे का? तसेच, मतदान ओळखपत्र नसेल तर कसं मतदान करायचं? त्यासाठी इतर कोणते ओळखपत्र असावेत? हे तुम्ही घरबसल्या देखील अगदी सोप्या ऑनलाईन पद्धतीने तपासून घेऊ शकता. यामुळे ऐनवेळी तुमचा गोंधळ होणार नाही.
मतदार यादीत तुमचं नाव कसं शोधाल?
1. मतदारांना मतदार यादीतील आपलं नाव शोधता यावं, तसेच मतदान केंद्र शोधता यावं यासाठी निवडणूक आयोगाने विशेष संकेतस्थळ उपलब्ध करुन दिल आहे. त्यासाठी सर्वात आधी तुम्ही भारतीय निवडणूक आयोगाच्या या लिंकवर क्लिक करा - https://electoralsearch.eci.gov.in/
2. आता वेबसाईटच्या वरच्या बाजूला तुम्हाला 3 पर्याय दिसतील. 'Search by Details', 'Search by EPIC', आणि 'Search by Mobile' या पैकी एका पर्यायावर क्लिक करा.
3. या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक आणि आवश्यक माहिती (Basic Information) तसेच कॅप्चा कोड सबमिट करा.यानंतर 'Search' वर क्लिक करा.
4. यानंतर आता खाली मतदार यादीतील तुमचं नाव, EPIC Number आणि सर्व माहिती दिसेल.
5. जर सर्च केल्यानंतरही तुम्हाला तुमचं नाव दिसत नसेल तर तुम्ही भरलेले तपशील पुन्हा एकदा तपासून पाहा.तरीही नाव न दिसल्यास राज्य निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधा.
मतदान ओळखपत्र नसल्यास 'ही' 12 ओळखपत्रे आवश्यक
सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या ते म्हणजे, जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल तरीही तुम्ही निवडणुकीत मतदान करू शकता. यासाठी फक्त एक महत्त्वाची गोष्ट करणं गरजेचं आहे. ओळखपत्र नसलं तरी चालेल, पण अधिकृत मतदार यादीत तुमचं नाव असलं पाहिजे. जर तुमचं यादीत नाव असेल तर तुम्ही घरी येणाऱ्या निवडणूक स्लिपची (Voter Slip) प्रिंटआउट घेऊन जाऊन मतदान करू शकता. फक्त या निवडणूक स्लिपसोबत तुम्ही खालील पैकी एक कागदपत्र मतदान केंद्रावर घेऊन जाऊ शकता. निवडणूक आयोगाने विविध 12 प्रकारची ओळखपत्रे मतदानासाठी मंजूर केली आहेत.
आधारकार्ड, मनरेगाचे जॉब कार्ड, बँकेचे किंवा टपाल कार्यालयाचे छायाचित्र असलेले पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या कार्ड, पारपत्र, पेन्शन कार्ड, केंद्र किंवा राज्य सरकारचे ओळखपत्र, दिव्यांग कार्ड किंवा खासदार-आमदारांनी दिलेले ओळखपत्र यांचा समावेश आहे.
हे ही वाचा :